तेलंगणाचे मुख्यमंत्री आपला पक्ष वाचवण्यासाठी लग्नाला हजेरी लावतायेत.

तेलंगणाचे सलग दोन वेळा ठरलेले मुख्यमंत्री सद्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. 

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा  ‘तेलंगाना राष्ट्र समिति’ हा पक्ष अलीकडच्या काळात पक्षाचे नुकसान झालेले पाहता ‘रिपेअर मोड’मध्ये गेलेला दिसत आहेत….असं आम्ही नाही तर, तेलंगणा राष्ट्र समितीचे मित्रपक्ष राज्यात चर्चा करत आहेत. पक्षाच्या संस्थापकांनाच स्वतःच्या पक्षातल्या सदस्यांना भेटायला वेळ नाही अशी टीका वारंवार  त्यांच्यावर टीका होत आली आहे….

आणि म्हणूनच गेल्या काही आठवड्यांपासून के. चंद्रशेखर राव आता ऍक्शन मोडवर गेले आहेत आणि मागच्या काही काळात त्यांनी बर्‍याच लोकांशी संवाद साधण्याचा सपाटा लावलाय. आता त्यांचं आणि पक्षाचं शेड्युल टोटली व्यस्त झालं आहे. 

आता पक्षाच्या आणि चंद्रशेखर राव शेड्युल मध्ये केवळ आमदार, खासदारांच्या भेटी आणि बैठकाच नाहीत तर अनेक लग्नांदेखील हजेरी लावायची असंही शेड्युल आहे..

आता पक्ष रिपेअर मोड’मध्ये गेल्यावर काही तर्क-वितर्क लावले जातायेत, ते म्हणजे काही चर्चा अशाही आहेत कि, तेलंगणा मध्ये भारतीय जनता पक्ष चांगलाच सक्रिय झाला आहे, भाजप नेत्यांच्या अनेक ‘मोठ्या’ बैठका चालू आहेत. राज्यात  भाजप टीआरएसच्या वर्चस्वाला आव्हान देणारा म्हणून  भाजप पक्ष उदयास येत आहे. 

कारण त्याचंच एक ताजं उदाहरण म्हणजे, गेल्या महिन्यातच हुजुराबाद विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने टीआरएसचा पराभव केला आणि गेल्या वर्षी ग्रेटर हैद्राबाद महानगरपालिका निवडणुकीतही भाजपने प्रभावी कामगिरी केली होती. गेल्या वर्षी दुब्बका विधानसभा पोटनिवडणुकीतही टीआरएसचा भाजपकडून पराभव झाला होता…त्यामुळे टीआरएससाठी हे पराभव चांगलेच जिव्हारी लागले आणि म्हणून टीआरएस पक्ष आणि मुख्यमंत्री आता ऍक्शन मोडवर आहेत. 

काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे कि,  “ज्या अर्थी आत्तापर्यंत के. चंद्रशेखर राव यांची राजकीय घौडदौड पाहता त्यांची प्रत्येक हालचाल आणि कृतीमागे काहींना काही अर्थ दडलेला असतो, त्यामागे काही रणनीती असते. ते अतिशय हुशार राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांचे असे सक्रिय होणे हे तर त्यांची नवी रणनीती असू शकते किंव्हा असाही असू शकते कि, भाजपच्या अलीकडच्या वाढत्या ताकदीला ते घाबरून स्वतःच्या पक्षातील नेत्यांना टिकवू पाहाण्यासाठी काहीतरी हालचाल करत असणार, पक्षासाठी खबरदारी घेत असणार हे मात्र नक्की.  

सोबतच आणखी एक कारण म्हणजे, स्पष्ट आहे. निवडणूक थोड्या काळाने जवळ आल्या कि, नेते जनतेमध्ये जास्तीत दिसतात, म्हणजेच त्यांना दिसणं भागच असतं म्हणा, तेंव्हा नेत्यांची देहबोली, कामाची शैली लगेच बदलते.’ असो तर अशीच काहीशी रणनीती चंद्रशेखर राव देखील फॉलो करत असणार. 

आणि याच रणनीतीचा भाग म्हणजे लग्नांना हजेरी लावणे.

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेमध्ये दिसावं म्हणून आता लग्नांना हजेरी लावण्याचा सपाटा लावला आहे. गेल्याच बुधवारी त्यांनी टीआरएस खासदार प्रभाकर रेड्डी यांच्या मुलाच्या लग्न समारंभालाही हजेरी लावली होती. केसीआर नोव्हेंबरमध्ये उपसभापती पद्माराव गौर यांच्या मुलीच्या लग्नालाही उपस्थित होते.

१७ नोव्हेंबर रोजी, चंद्रशेखर राव यांनी तीन विवाह समारंभात सहभाग नोंदवला होता.  एक पक्षाचे आमदार मायामपल्ली हनुमंत राव यांच्या मुलाचा विवाह.  दुसरा तेलंगणा राजपत्रित अधिकारी संघाचे अध्यक्ष व्ही. ममता यांच्या कुटुंबातील सदस्याचा. तिसरा म्हणजे, तेलंगणा मागासवर्ग आयोगाचे सदस्य जुलुरी गौरीशंकर यांच्या मुलीच्या लग्नालाही ते उपस्थित होते. तेच जुलुरी गौरीशंकर ज्यांनी २०१९ मध्ये चंद्रशेखर राव यांच्यावर तीन पुस्तके लिहिली होती. 

कारण काहीही असो ते आमदारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटायची संधी सोडत नाहीत.

गेल्या महिन्यात, चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्य खादी आणि ग्रामोद्योगचे अध्यक्ष मोहम्मद युसूफ जाहिद यांची भेट घेतली, जे त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी आले होते. त्याच दिवशी पाच आमदारही मुख्यमंत्र्यांना भेटायला आले आणि त्यांनी विधान परिषदेवर निवडून आल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

या महिन्याच्या सुरुवातीला पक्षातल्या आमदार बंदला कृष्ण मोहन रेड्डी यांच्या वडिलांच्या निधनानंतर  त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी हैदराबादपासून सुमारे २०० किमी लांब असलेल्या जोगुलांबा-गडवाल जिल्ह्यात पोहोचले होते.  नोव्हेंबरच्या सुरुवातीला चंद्रशेखर राव यांनी महबूबनगरमध्ये कॅबिनेट मंत्री श्रीनिवास गौर यांची भेट घेतली होती आणि त्यांच्या आईच्या निधनानंतर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी ते आले होते.

चंद्रशेखर राव यांनी केवळ त्यांच्याच पक्षाच्या किंवा सरकारच्या लोकांनाच भेटी घेतल्या नाहीत तर, गेल्या आठवड्यात त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार कोमातीरेड्डी राज गोपाल रेड्डी यांचीही भेट घेतली होती, जे त्यांच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण चंद्रशेखर राव यांना देण्यासाठी आले होते.

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.