सायकल चालवून मी घरखर्चातले तब्बल दोन लाख रुपये वाचवलेत – अभिजित कुपटे

मागे मित्राची स्पिती सायकल टूरसाठी वापरायला योग्य अशी एमटीबी प्रकारातील सायकल परत द्यायला रावेत वरून हडपसर ला गेलो होतो.
परत येता येता दोन तीन मित्रांच्या भेटी गाठी आटपत थोडा उशीर झाला. एका मित्राकडे मुक्काम केला. सकाळी पब्लिक ट्रान्सपोर्टने ऑफ़िस गाठायचं ठरवलेलं.
ऑफिस पर्यंतच्या प्रवासात बी.टी.कवडे रोड ते बाणेर अशा मार्गावर मला तब्बल तीन पीएमपीएलच्या बस पकडाव्या लागल्या. त्यात मित्र बस स्टॉपला सोडायला आला होता ते वेगळच. रूपये १५+१५+१० येवढे पैसे मी पुण्यात बस प्रवासासाठी पहिल्यांदाच वापरत होतो. म्हणून कदाचीत मला हा आकडा खुपच जास्त वाटला.
बाणेर ते रावेत अशा परतीच्या प्रवासात मी बसचा वापर करायचा ठरविला. पहिले बाणेर ते पुणे विद्यापीठ बस भेटेल म्हणून वीस मिनिटे थांब्यावर बसुन राहिलो. पलिकडच्या बस थांब्यावरून भरपूर बस जातायेत हे पाहुन हायवेवरून बस भेटतील असे म्हणत हिंजवडीकडे जाणारी बस पकडली. वाकड हायवे थांब्यावरून मला डांगेचौक व नंतर रावेतकडे जाणारी बस भेटणार होती.
बसमध्ये तुरळक प्रवासी होते. कंडक्टरशी थोड्या गप्पा मारत होतो. एका प्रवासीला तो आलेल्या थांब्याची आठवण करून देत होता. त्याला मागच्या महिन्यात चंदिगड शहरात आम्ही ४० रूपयात एसी बसने तसच ३० रूपयांत नॉनएसीने दिवसभर फिरायचो सांगितल्यावर तोही म्हणाला आपल्या इकडेही परवडेल पण इकडे गाड्या कुणाच्या आहेत आणि पीएमपीएल तोट्यात का आहे हे तुम्हाला सांगाव लागेल का? पुढे बोलण्याच्या भरात, गाड्यांच जावु द्या. मला गेली पाच वर्षे आजही पाच हजार वेतनावर काम करावं लागतय, पर्मनंटच नांव नाही. अधिकारी येतात जातात, चांगल्या अधिका-याला काम कोण करू देतय? तोवर वाकड ब्रीज आला. चला येतो म्हणून मी त्याचा निरोप घेतला.
वाकड ते डांगे चौक अशी बस पकडून नंतर परत एक बस पकडून मी आत्ता डांगे चौकातून रावेत फिल्टर थांब्यावर उतरणार होतो. नवीन बीआरटी थांब्यावर तोबा गर्दी होती. कॉलेजचा एक युवक अर्धा तास त्याच बसची वाट पाहत होता. त्याला विचारलं, कधी आहे बस.तो म्हणाला आत्ता पर्यंत यायला पायजेल होती, पण अजुन नाही आली. येईल.
इथेही २० मिनिटे वाट पाहत शेवटी मला भरगच्च बस मिळाली. बस थांबा ते ऑटोने घरी पोचता पोचता रूपये १५+१०+१०+ऑटोचे ३० पकडत एका दिवसाचे भरपूर पैसे खर्ची पडले होते शिवाय परतीचा वेळही तब्बल दिड तासांहून अधीक खर्ची गेला होता. तेच मी सायकलवर रोज दररोज किमान ४५ मिनिटांतच पार करतो.
मला पब्लिक ट्रान्सपोर्टचा रोजचा प्रवास करायचाच म्हंटल्यास दररोज निदान १०० ते १२० रूपये मोज़ावे लागतील. याउप्पर वरून वेळ, बससाठी थांबणे वगैरे त्यात आलचं. आसलं गणित केल्यावर आपल्या स्वत:च्या सायकलवर मारली टांग की पोचला इच्छित स्थळी.तेही पाहिजे तेंव्हा आणि तुमच्या कारपेक्षाही, गाडीपेक्षा सुखकर.
तेंव्हा असा सगळ पुण्यातल्या सुशिक्षित, शिक्षित लोकांना पटवुन सांगितल तरी समजत नाही. रस्त्यावरून  कामावर जायला सायकली वापरणा-यांशी मी वेळ काढुन गप्पा मारत असतो त्यांचाही निष्कर्षही असाच असतो. म्हणून मी आपलं सांगत असतो आरे सायकली वापरा म्हणून. तर घाम येतो.अंतर खुप लांब आहे. ट्रॉफिक. लैपटॉप. ऊन. पावुस असे शाळेतल्या मुलांसारखी उत्तर मला आजही भेटतात.
मी एप्रिल २०१५ ते आजतागायत रोजच्या कामावर जायला फक्त सायकलच वापरतोय. सायकलवर कामावर जाण्यासाठी म्हणून जवळपास २४००० किमी आंतर एकट्या सायकलवर आटपलय. सायकल पर्यटनाचे आकडे वेगळेच आहेत.
हेच मी माझ्या मोटारीशी तुलना केल्यावर तब्बल लाख रूपयांचे इंधन बचत मी करू शकलोय हे वेगळ सांगायला नकोच. वाढत्या इंधनाच्या किंमती कुणीच रोखु शकत नाही मात्र हवेत जाणारी प्रदुषके तुम्ही आपल्या परीने नक्की रोखु शकताय. शिवाय धावपळीच्या जगतात व्यायामासाठी वेगळा वेळ काढायची तुम्हाला आवश्यकता नसते ह्याविषयी सवडीने…
1 Comment
  1. Vaibhav garud says

    एक नंबर अभिजित भाऊ
    तुमचे लेख वाचता वाचता माझा सायकल चा वापर वाढला आहे.
    Keep it up…????????????

Leave A Reply

Your email address will not be published.