बारा पाचाचो पानी फाऊंडेशन !!!

 

त्येचा काय हा.. सीझन लग्नाचो चल्लो हा. मरे आमच्या शिंदुर्गात कित्या कोणाक कुणाची पडलेली नसा.

लग्नात जाऊचा, तर पहिल्या पंगतीन जेवूचा. आहेराच्या लाईनात ५ मिनिटांत स्टेजवर जाऊन फोटो काढून मोकळा होवूचा.

सगळा कसा फाटफाट.. फोरजीच्या स्पीडा सारखा.

ता रव्हांदे, पण हय तो आमीर बघलास?…आपल्या खानांचो आमीर, परफेक्शनीश्ट वाडीतलो, पुढल्यांचो.

व्हय, व्हय त्योच.

त्यो सत्यजीत भटकळ तुमका माहित असात. सत्यम्येव जयते करणारो,

खयच्यातरी चॅनेल वर यायचो त्यो… तुम्ही बघूक नाय?

मागच्यांचो राजगो सांगत व्हतो, त्यो भटकळ शेलिब्रिटिंका घेऊनशान ह्यो..ह्यो महाराष्ट्र पाणीदार करुचा बघता.

आता मालवणी माणसांका पाण्याची कसली कदर. शिंदुर्गात ह्यो भदाभदा कोसळता.

पण मालवण्यांका कुटं शेती करुची हा. आंबो लागतलोच, माड वाढतलोच आन् काजूची बोंडा हतच चरुक.

इषय व्हतो पानी फाऊंडेशनचो.

आता आमका खयच्यातरी व्हाळात धुऊची सवय.. घरच्या संडासाच कुणाचो जीव रमतलो?

गेल्याच महिन्यात मुंबईकरांका बसूक तरास व्हता म्हणून खूर्ची मागवल्यानी झिलान, ती पण ऑनलाईन.

ता मरांदे. माका येक गोष्ट सारखी डोक्यात येता. पानी फाऊंडेशनचो काम बघलास.

सगळी खुळ्यागत लग्ना सोडून श्रमदान कित्या करुक लागली हत मरे?

आमीरान सगळो घोळ घातलो हा. हय लागलो लगीन, थय चल्लो खणूक. आता लग्नानंतर काय खणूचा, ह्या पण आम्ही शिकवूचा ह्यांका?

खुळ्यांचो बाजार दाखवतत, टीव्हीवाले. वायझेड खयचे. कित्या ते?

हय कोकणातच नव्हं, पण सगळीकडं झाडून शान पुण्यवचना वाजीईली…

आपलो बॅन्ड हा … हय कोकणात स्टाईलच हा पुण्यवचना वाजूची.

थय गुरवान बाप्पा मोरया केलान, की कॅशियोवर नागिन मूजिक वाजलाच समजा, काय समजलास..?

माका काय वाटता, पार तिथं लातुरात, उस्मानाबादेत, हिकडं हिंथं बावडा घाट चढल्यावर पश्चिम महाराष्ट्रात पण भटकळांच्या सत्यजीतान, खानांच्या

आमीरान कंबर कसली हा, असा बोलतत. खरा खोटा रामेश्वराक ठाऊक. महाराष्ट्र पानीदार का काय करुचा बघतत मरे.

पण तुमका येक गोष्ट लक्षात ईली…?

म्हंजे बघा, आमीरान त्यो महाश्रमदान केला असात. त्या भटांची चेडू, आलीया पण ईलती म्हणत्यात.

आता तर मरे त्येचा श्रमदानात ताजो-ताजो लग्न झालेलो नवरो मुलगो नी नवरी मुलगी पण येतत. त्यांचो प्रमाण कसो वाढलो हा माहिती हा तुमका?

हल्लीच्या पोरांचा काय खरा नाय बघा.

इथं अक्षता पडल्या, आन् त्यो तिथं फावडो घेऊनशान खणता, ता बया थय मुंडावळ्या लावल्यागत घमेला घेवून घमासान करत सुटला.

भुतूर काय बी झंगाट असांदे, पण असलो अभिनय कोकणी माणसान खपवून ख्यायचो नाय बघा.

नवरोमुलगो वाईज लग्नाआधीच मांडवान चपटी मारुन येईत, पण ह्या श्रमदानाचो आणि कोकणाचो काय बी संबंध नाय बघा. असलो प्रकार कोकणात बघितल्याचो माका आठवत नाय.

खयो पाणी काढत्यात, ही मराठवाडा आन पश्चिम महाराष्ट्रातली पोरं. लग्न असांदे नायतर श्राद्ध, श्रमदानात फर्श्ट..

नाक्यावर रिक्षा गावली की, बारमध्ये पटकन बियर मारून येणारो आमचे कर्तव्यदक्ष कोकणी माणूस रातच्याला येळेत घराकडं येता. तोंडाचो वास घरभर पसरण्याच्या आत अंथरुणात तंगड्या पसरता. अन् तिथं सांगली साताऱ्यात बघा. रातच्याला १२-१२ वाजल्यापासनं पाणीदार होण्यासाठी झटतत. कशापाई?

म्हणजे कोकणी माणसाच्या काळजातला पाणी संपत इला, तरी आमका पाण्याचो हिम्पोरटन्स कळूक नाय. दोन दोन गुंठ्यावर रांडेच्यांनी इहिरी खणल्यानी.

ज्यांका पाणी लागला, थय मीटर बसवल्यानी. आंबो, तांदूळ, काजू, माडाची झाडा जगवल्यानी. गाववालो फारफार तर रिक्षा घेतलो, ज्यादातर सुमो.. त्यातबी घेतलीच तर वडाप. त्याच्या पुढं जायचो कधी इचार करुक नाय मालवणी माणसान. अशांका पानी फाऊंडेशनच्या स्पर्धेशी काय देणंघेणं असात?

चाकरमन्यांच्या जीवावर दिवस काढयचे बी दिवस गेले आता. कोकणात ह्यो भलोमोठो समुद्र. ह्यांचो रामेश्वर, कुणकेश्वर आणि रवळनाथ, भरभरून ह्यांका पाणी देता.

खारी हवा गोड आंबो देता. ढगाक भिडणारे माड देता. पर्यटनाचो इषय वेगळो हा… खोल विषय हा त्यो.

पण पाण्यासाठी मालवणी माणूस भांडलेलो कधी पाहिलास काय हो. त्यो जागेवर भांडतलो. थोरल्याक ४ गुंढे अन् धाकट्याक ३ दिल्यानी तर तांडव करतलो. पण

पाणी कुणाक कितीबी द्या, त्याका कायो फरक पडूचो नाय. तसो त्याचो दिल दरीया हा.

म्हणूनच सांगतंय, मराठवाड्यानं-पश्चिम महाराष्ट्रान खुळ्यागत श्रमदान सुरु केल्यानी. तेव्हा मालवणी माणूस गावाकडं इलेल्या चाकरमन्यांचे बिस्किटांचे पुडयो गोळा करण्यात बिजी व्हतो. सिझन आलोच हा, रिक्षावाल्यांचो धंदो जोम धरतलो हा. रिटर्न भाडी मारुची स्पर्धा लागतली हा. चाकरमन्यांका फिरवता फिरवता, यंदा आंबोच नाय रे, असो रडतलो हो शिंदुर्गातलो खुळो..

ता का. बी असांदे. पाणी एकवेळ त्येका कमी पडात. पण म्हणून काय तो नवरा मुलाक आणि चेडूक लग्नातून घेऊन शान खुळ्यागत वागूचो नाय. तसो शानो हा मालवणी मानूस. त्येका खुळ्यात काढूचा काम नाय.

पण उद्या पाण्यासाठी नाय तर टीव्हीवर झळकूक का होईना, थोरल्याच्या झिलान लग्नाच्या वेशात, बाशिंग-मुंडावळ्या घालान, धेड्याक घेत थयो श्रमदान केल्यानी, त, त्यो पाणी फाऊंडेशनचो नाय, तर मालवणी माणसाचो मोठो विजय असल्याचो कुणी सांगितल्यानी, तर त्यावर कोण विश्वास ठेवतलो?

येळ झाली हा… जाऊचा. पुण्यवचनाच्या ऑर्डरी हत..

डीजे इले हस, तरी शिंदुर्गात कॅशिओ जिवंत हाय, हे विसरायचं नाय. काय समजलास?

  • सिद्धेश सावंत 
1 Comment
  1. संजय आघाव says

    माका लय आवडता असला गावाकडचा मनातलो गोष्टी
    मग भाषा कुंणती भी राव्हन्दे फरक पडायचो नाय.

Leave A Reply

Your email address will not be published.