ब्रिटिश सरकारचा असा रिपोर्ट ज्यामुळे “भांग” बंद होण्यापासून वाचली !!! 

भांग बबुवा भांग !!!
सिवजी का प्रसाद हैं भैय्या !!!

तर थोडक्यात भांग जी उत्तर भारतात आग्रहानं पिलीच जाते, खाल्ली देखील जाते. होळी असो का महाशिवरात्र भांग प्यायला कारण लागत नाही. आत्ता नशेची गोष्ट म्हणल्यावर भांगवर देखील बंदीची कुऱ्हाड आलीच होती.

पण भांगेवरची ही बंदी वाचली ती ब्रिटीशांच्या एका अभ्यासू रिपोर्टमुळं.

ब्रिटन ने चीन विरुद्धच दुसरं युद्ध जिंकलं होत आणि या युद्धामागील कारणच अफू या अंमली पदार्थाच्या व्यापारावर प्रभुत्व मिळवणे हे होत. त्यामुळे अफूच्या तुलनेत कमी धोकादायक असलेल्या गांजावर ब्रिटिश सरकार बंदी आणण्याची शक्यता देखील कमी होती. गांजा लावणीवर असलेल्या कराद्वारे १८७३ ते १८९३ या वीस वर्षात बंगाल सरकारला एक कोटी एवढा कर मिळालेला होता. 

यासर्व गोष्टींचा विचार करून भारतीय अंमली पदार्थ समितीने १८९३ मध्ये एक सर्व्हे करायला सुरु केला ज्यात मुख्यतः या पदार्थांचे शरीरावर होणारे विघातक परिणाम तपासले जाणार होते. यामध्ये या समितीने वर्षभरात देशभरातील ३० शहरांतील ११९३ लोकांची मुलाखत घेतली. 

वाचा काय होता तो रिपोर्ट –

या समितीने बऱ्याच वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेतल्या. ज्यामध्ये अंमली पदार्थांचे विक्रेते, खरेदीदार, गांजाचे उत्पादन घेणारे शेतकरी, वेड्याच्या दवाखान्यातील लोक यांचा समावेश होता.

यातल्या बऱ्याच लोकांचं म्हणणं असं होत कि जास्त प्रमाणात घेतलेलं चरस, गांजा शरीराला धोकादायक ठरू शकत परंतु समितीने सरकार पुढे मांडलेल्या रिपोर्ट मध्ये असा निष्कर्ष दिला कि जर मर्यादेत प्रमाणात हे पदार्थ सेवन केले तर त्यापासून कोणताही धोका नाही. तसेच या पदार्थांवर संपूर्ण बंदी न घालता यावर कर लावावा जेणेकरून ते महाग होतील व त्याचा वापर कमी होईल. परंतु या समितीतील दोन सदस्य जे भारतीय होते ते याच्या विरोधात होते. त्यांच्या मते या पदार्थांवर टॅक्स न लावता यावर बंदी आणली जावी.

यातील एक बंगाली सदस्य राजा सोशी शिखरेश्वर रॉय यांच म्हणणं होत की, ब्रिटिश फायदा मिळवण्यासाठी हा निर्णय घेत आहेत. त्यांनी भारताचा मादक पदार्थ वापराचा इतिहास ब्रिटिशांसमोर मांडला, तसेच मनुस्मृती आणि मुघल साम्राज्याचा दाखल देऊन त्यांनी सांगितले कि या पदार्थांवर याआधी कधीही कर लावण्यात आलेला नव्हता. त्यांची मागणी होती कि या पदार्थांचा धोका लक्षात घेता यावर कर न आकारता पूर्ण बंदी घालण्यात यावी. परंतु त्यांची हि मागणी पूर्ण होऊ शकली नाही.

याच रिपोर्ट मध्ये हे पदार्थ मर्यादित प्रमाणात घेतले तर जास्त धोकादायक नाहीत असं मांडण्यात आलं तसेच, वेड्याच्या हॉस्पिटल मध्ये गांजाचा वापर औषध म्हणून करण्यात येत हे हि दाखवण्यात आला. 

“ अंमली पदार्थ समितीने १८९४ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडलेल्या या रिपोर्ट ने युनायटेड किंगडम मध्ये देखील अंमली पदार्थांवरील विरोध थोडासा शिथिल करायला मदत केली होती.”

Leave A Reply

Your email address will not be published.