दूसरं महायुद्ध चैन्नईत पण झालं होतं ! हिटलरची शप्पथ खरय !!

१९१४ साली लढल्या गेलेल्या पहिल्या महायुद्धाच्या वेळी भारतावर ब्रिटीश साम्राज्याचा अंमल होता. ब्रिटन या महायुद्धात सहभागी देशांपैकी एक महत्वाचा देश होता. पहिल्या महायुद्धाशी असलेला भारताचा संबंध फक्त इतकाच. याव्यतिरिक्त या महायुद्धाशी भारताचा थेट संबंध आला नव्हता आणि त्यामुळे भारतीय भूमीवर हे युद्ध लढलं गेलं नाही, असंच आपण इतिहासात शिकलेलो असतो.

आपल्यापैकी खूप कमी लोकांना याची कल्पना असेल की भारतात एक शहर असंही होतं, ज्या शहरात पहिल्या महायुद्धातील एक छोटीशी लढाई पार पडली होती.

हे शहर म्हणजे आजकाल आपण ज्याला चेन्नई म्हणून ओळखतो ते शहर. त्याकाळी ते मद्रास या नावाने ओळखलं जायचं.

karl
कॅप्टन कार्ल मुलर

रशिया, ब्रिटन, फ्रांस, जपान ही दोस्त राष्ट्रे आणि जर्मनी, हंगेरी, ऑस्ट्रिया, बुल्गारिया या केंद्रीय सत्ता या दोन गटांमध्ये युद्धास सुरुवात झाली होती. भारताचा युद्धाशी थेट संबंध नसला तरी भारतावर ब्रिटीशांचं साम्राज्य असल्याने जर्मनीने भारतावर हल्ला करण्यासाठी एक जहाज पाठवली होती. भारतातील ब्रिटीश साम्राज्य कमकुवत करणं हा यामागचा हेतू होता.

जहाजाचं नांव होतं ‘एसएमएस एम्डेन’ आणि जहाजाचं नेतृत्व होतं कॅप्टन कार्ल वॉन मुलर याच्याकडे.

२२ सप्टेंबर १९१४. ‘एसएमएस एम्डेन’ मद्रासच्या किनाऱ्यावर येऊन धडकलं आणि मद्रासवर बॉम्बवर्षाव सुरु केला. या जहाजाने मद्रासच्या किनाऱ्यावर प्रचंड दहशत माजवली. मोठ्या प्रमाणात नासधूस केली. अनेक बंदरांवर हल्ले केले आणि किनारपट्टीवर २ जहाज उध्वस्त केले. ‘मद्रास जनरल पोस्ट ऑफिस’ आणि ‘मद्रास सेलिंग क्लब’ यांच्या इमारती देखील ‘एम्डेन’च्या हल्लात जमीनदोस्त झाल्या.

हिटलरची सर्वात मोठ्ठी चूक ?

वर्ल्डकप चोरण्याचं जे काम हिटलरला जमलं नाही ते एका भुरट्या चोरानं करुन दाखवलं.

‘एम्डेन’च्या मद्रासवरील हल्ल्याच्या बाबतीत अजून एक रंजक किस्सा असा आहे. असं मानण्यात येतं की ‘एम्डेन’ला मद्रासच्या किनाऱ्यावर घेऊन येण्यात भारतीय क्रांतिकारक ‘चंपाकारमण पिल्लई’ यांची फार महत्वाची भूमिका होती. त्यांनीच ही जहाज मद्रास किनाऱ्यावर आणून मद्रासवर हल्ला केला होता. जर्मनीच्या मदतीने भारतावरील ब्रिटीश साम्राज्य उध्वस्त करण्याच्या त्यांच्या योजनेचा हा एक भाग होता. अर्थात याबाबतीत देखील इतिहासकारांमध्ये एकवाक्यता नाही. काही इतिहासकारांना हा दावा मान्य करण्यास नकार देतात.

कोण होते चंपाकारमण पिल्लई…?

pillai
चंपकारमण पिल्लई

सप्टेबर १८९१ साली केरळच्या तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील एका खेडेगावात जन्मलेले चंपाकारमण पिल्लई हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. लोकमान्य टिळकांकडून त्यांना भारतीय स्वातंत्र्यात उतरण्याची प्रेरणा मिळाली होती. त्यांचा जन्म जरी भारतात झाला असला तरी विदेशात राहून भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक महत्वाचं नांव म्हणजे चंपाकारमण पिल्लई.

तारुण्यात असतानाच आपले ब्रिटीश मित्र सर वाल्टर स्टिकलँड यांच्यासोबत ते युरोपात आले होते. युरोपात त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतानाच तिथे राहून भारतीय स्वातंत्र्यासाठी काय करता येईल यादृष्टीने प्रयत्न सुरु केले.

युद्धामुळे लागला बिकीनीचा शोध ! 

दुसऱ्या महायुद्धात तीन वेगवेगळ्या देशांकडून लढलेला एकमेव सैनिक !

पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांनी ‘इंटरनॅशनल प्रो इंडिया कमिटी’ची स्थापना केली. ही संघटना पुढे ‘इंडियन ईंडीपेंडन्स’ या संघटनेत विलीन करण्यात आली. युरोपातील भारतीय स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या लोकांचा या संघटनेत समावेश होता. जर्मन सरकारकडून देखील ब्रिटीश विरोधी कारवायांसाठी संघटनेला मदत मिळत होती.

डिसेंबर १९१५ साली राजा महेंद्र प्रताप आणि मोहोम्मद बरकतुल्लाह यांनी अफगानिस्तानची राजधानी काबुलमध्ये भारताचं हंगामी सरकार स्थापन केलं होतं. राजा महेंद्र प्रताप राष्ट्रपती होते आणि बरकतुल्लाह पंतप्रधान. चंपाकारमण पिल्लई यांच्यावर या सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी होती.

साधारणतः २०००० जर्मन आणि टर्किश सैनिकांना अफगानिस्तानमध्ये आणून ब्रिटीश सरकारविरोधात युद्ध पुकारण्याची या सरकारची योजना होती. परंतु हे सरकार फार काळ टिकू शकलं नाही. पहिल्या महायुद्धातील जर्मनीच्या पराभवानंतर ब्रिटिशांनी क्रांतिकारकांचं हे सरकार बरखास्त करून टाकलं.

champak
चंपाकारमण पिल्लई यांचा पुतळा

१९३३ साली चंपाकारमण पिल्लई आणि सुभाषचंद्र बोस यांची भेट झाली. याच भेटीत पुढे सुभाषबाबूंनी स्थापन केलेल्या ‘इंडियन नॅशनल आर्मी’ या संघटनेच्या स्थापनेची कल्पना समोर आली. पुढे १९३४ साली विषप्रयोग झाल्याने पिल्लई यांचा नाझी जर्मनीमध्ये मृत्यू झाला.

पिल्लई यांचं भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान विस्मरणात जाऊ नये यासाठी २००८ साली तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी अड्यार येथील ‘गांधी मंडपम’मध्ये पिल्लई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.