मुलींनो जंगल सफारीसाठी जाताय ? काळजी घ्या…

तशीही महाराष्ट्रात जंगल कुठ आहे असा प्रश्न पडण्यापुर्वी आपणास सांगू इच्छितो महाराष्ट्रात घनदाट अरण्य आहेत. यात जंगली प्राणी आहेत. झरे आणि नद्या आहेत. अस्वल आहेत वाघ आहेत. बिबळ्या बिबट्या तर पोत्यानं आहेत. इतके की ते त्यांच जेवण झालं की शतपावली करण्यासाठी रात्री शहरात येतात. महाराष्ट्रातल्या जंगलात टारझन सोडून सगळं काही आहे. तर अशा या घनदाट अरण्यात तुम्ही जंगल सफारीचा प्लॅन केला असेल तर हि माहीती खास तुमच्यासाठी आहे. जंगल सफारीस नेमक कसं जावं याचा परिपुर्ण प्लॅन..

  • जंगल सफारीस जाताना सर्वप्रथम आपले मुलायम केस आपण बांधण्याबाबत काळजी घ्यावी. विचार करा तुम्ही जंगलाच चालत आहात आणि पाठीमागून एखादा वाघ जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा, माझा न राहतो मी हरवून हा किनारा गाणं गुणगुणत आला तर आपलं काय होईल. थोडक्यात काय तर आपले लांबसडक केस हे सडकेवर येवून देवू नका. गोल हॅटखाली त्यांनी सुरक्षीत ठेवा.
  • जंगलात फिरताना तोंडास स्कार्फ बांधणे टाळावे. (हा सल्ला पुण्याच्या मुलींसाठी असून इतर मुलींना तो स्किप केला तरी चालेल) याचं महत्वाच कारण म्हणजे झाडांमुळे आद्रतेच प्रमाण अधिक असतं. अशा वेळी तुम्हास डिहायड्रेशनचा त्रास होण्याची शक्यता असते. श्वास घेण्यास अडचणी निर्माण होवू शकतात. आणि तोंडावर स्कार्फ असेल तर आपणास श्वास घेण्यास अडचण निर्माण होतेय हे समजण्यास देखील उशीर लागतो त्यामुळे आपण स्कार्फ बांधणं टाळावे.
PIC- Adventure Trekking Club
  • शॉर्ट घालावी का नको, तर ते परस्थितीजन्य आहे अस आम्हाला वाटतं. म्हणजे जंगलात जाताना शॉर्ट घालावी का नको याहून अधिक महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे इतर वेळी तरी शॉर्ट घालावी का नको. तर आम्ही त्यावर काहीच सांगू शकत नाही. मात्र जर या विचारात असाल की जंगलात जाताना शॉर्ट घालावी का तर आमचे उत्तर असेल, नाही. कारण चालता चालता आपला पाय कशावरही पडू शकतो. त्यावेळी पायाला काही चावलं तर खूप अवघड काम होईल त्यामुळे हलकेफुलके कापड वापरावे पण गुडख्याच्या खाली खास करुन लक्ष द्यावे.
  • हाय हिल्स घालावेत का ? मुळात हा प्रश्नच कसा पडू शकतो असा प्रश्न काहींना पडला असेल. असू शकतो एखादीला वाटू शकतं कालच मी नविन पेअर घेतलेल तर ट्राय करते ना. तर तस काही जंगलात नकोच. जंगलात असताना आपण मस्तपैकी शूज वापरा जे निसरडे नसतील.
PIC- Adventure Trekking Club
  • कोणत्या रंगाचे कपडे वापरावेत ? जंगलाच्या रंगाशी मिळतेजुळते.. म्हणजे यातही हजारो प्रकार असू शकतात हे आम्हास माहित आहे म्हणूनच आम्ही समोर जे आपणास दिसतं तशा रंगाचे कपडे वापरा सांगत आहोत. याचा अर्थ निर्जीव गोष्टी आहे. म्हणजे तुम्हास समोर वाघ दिसतोय म्हणून वाघासारखे कपडे वापरू नका इतकचं..
Leave A Reply

Your email address will not be published.