नेमाडेंचा देशीवाद गुजरातमधल्या मच्छिमारांना पाकिस्तानपासून वाचवतोय !!!

 

“च्या आयला हे साहित्यिक हूशार झाले की, हं स्टोरी काय आहे पटकन सांगा. कसय सिंध, हिंदू, नेमाडे, खंडेराव असलं काही असेल तर आधीच सांगा आम्ही लगेच बाहेर पडतो”

अशा अक्राळविक्राळ नजर फिरवणाऱ्यासाठी सामाजिक आव्हान अस आहे की थांबा, पाणी प्या आणि समजून घ्या प्रकरण काय आहे ते. तर सुरवात करण्याअगोदर मला आपणास सांगू वाटतं, ते म्हणजे देशीवाद म्हणजे नेमका काय प्रकार आहे. तर देशीवाद म्हणजे आपल्या आजूबाजूचा भूगोल आणि आपली संस्कृती. थोडक्यात या लोकांच म्हणणं अस आहे की, कोणत्याही प्रथा, परंपरा अशाच नसतात त्यांना कारणे असतात. म्हणजे दारापुढे तुळस लावायचं देखील एक शास्रीय कारण असत. हा झाला थोडक्यातला देशीवाद.

Pic – Jayantkumar Sonawane

आत्ता मुळ विषय गुजरातमधील मच्छिमारांचा. गुजरात मधल्या मासेमारी करणाऱ्या लोकांचा मुख्य प्रश्न कोणता, तर हे लोकं मासे पकडत पकडत पाकिस्तानात जातात !!!

पाकिस्तान हा आत्ता गेल्या पन्नास वर्षात निर्माण झालेला प्रश्न त्या अगोदर काहीच समस्या नव्हती का ? तर होती अजूनही असतात.

“वादळवारो सुटलगौं टाईप” समस्या तिथही असतात. आणि त्यापासून संरक्षण म्हणून तिथे बोटींवर मुखवटे चढवले जातात. हे मुखवटे काय करतात ? तर काहीच नाही. नुसते टांगलेले असतात. पण प्रथा अशी की त्या वाईट शक्तींना रोखतात.

आत्ता या देशीवादाचं काय करायचं हा विचार मुंबईतल्या WII या स्वयंसेवी संस्थेला पडला. त्यांनी मग एक आयडीया वापरली. आयडीया अशी होती की, या मुखवट्यांना GPS लावुया. या GPS मुळे काय होईल तर हे या मच्छीमारांनी भारताची बॉर्डर क्रॉस केली की मुखवट्याचे डोळे चमकतील. मोठ्ठा आवाज येईल. यासाठी मुखवटेच का ? तर या अगोदर देखील GPS लावण्याचे प्रयत्न झाले, पण लोकांची श्रद्धा महत्वाची आहे. GPS न सिग्नल दिला तरी मच्छीमार तो मनावर घेत नसत. शिवाय त्यासाठी वेगळ काहीतरी बोटीवर बसवुन घ्यायची त्यांची उत्सुकता पण नव्हती. अशा वेळी उपयोगी आला तो देशीवाद. प्रत्येक बोटीवर मुखवटे तर हमखास असतात. मग त्या मुखवट्यांनाच अलार्म जोडण्यात आला. मुखवट्यातून आवाज येतोय म्हणल्यानंतर भितीने का होईना हे मच्छीमार लगोलग मागे फिरू लागले.

थोडक्यात काय तर प्रथा आणि परंपरेला जरासा विज्ञानाचा तडका दिला आणि खूप मोठ्ठ काम पुर्ण झालं. अस असत हे सगळं, पृथ्वी गोल आणि नेमाडेंचा विषय खोल !!!