कोरियातून आलेला “काळा पैसा” – किस्सा नोटबंदीचा

वोन सब कीम हा माझा दक्षिण कोरियाचा मित्र. साधारण दोन वर्षांपुर्वी तो भारतात रहायला होता. वर्षभर भारतात राहिलं की माणूस भारताचा होवून जातो. म्हणजे कस, हितलं सगळं मोकळं ठाकळं जगणं त्याला भारी वाटू लागतं. येताना नमस्ते पासून झालेली सुरवात चार सहा महिन्यात आची कुची काना पर्यन्त घेवून जाते. आणि कुठलाही परदेशी माणूस खऱ्या अर्थाने भारतीय होतो.

असाच माझा वोन सब कीम. वाचायला नाव अवघड वाटत असलं तरी माणूस स्वभावानं खूप चांगला. तर झालं अस की माझ्या या मित्राचा फोन आला की तो भारतात येतोय. साहजिक दूनियादारी करायची म्हणून आमची गाडी रात्रीच मुंबई विमानतळावर पोहचली.

इतक्या वर्षांनंतर मित्रानं भेटल्याभेटल्या पहिला प्रश्न टाकलां, तो म्हणजे प्रचंड भूक लागलेय काहीतरी खावूया का ? झालं आमच्या दोघांचा मोर्चा KFC कडे वळाला. चिकन विंग्ज आणि कोक अशी ऑर्डर दिली आणि खिश्यात हात घातलां. कार्ड काढलं आणि KFC मध्ये असणाऱ्या सुंदरीला ते कार्ड अलगत दिलं. नेमकं त्या ठिकाणची मशीन खराब असल्यानं कार्ड चालत नव्हतं. आत्ता आमच्या मित्राने चटकन खिश्यातून पाचशे आणि हजारची नोट काढली आणि ती काऊंटर वरील सुंदरेच्या हातात दिली.


तिने नोटां घेवून आत टाकणार तोच अंगावर पाल पडल्यासारखी ती किंचाळू लागली. लगेच जोरजोरात हसू लागली. नेमकं काय झालं ते मी बघितला आणि आश्चर्य कम दूख: कम सुख: असे एकाच वेळी हजारो वर्षांभराच्या भावभावना तोंडावर आल्या.

मित्रानं जुन्या नोटा दिलेल्या. दोन वर्षांपुर्वीच्या त्याच्या भारताच्या सहवासात त्यानं जाताना जून्या नोटा नेलेल्या. त्याचं नोटांचा आत्ता सदुपयोग करायचा म्हणून घेवून आला ते ही नोटबंदीच्या दिडएक वर्षांनं.

नोटा अशा कशा बंद होवू शकतात हे त्याच्या आकलनाच्या बाहेरचं होतं. मग त्याला चांगल तासभर नोटाबंदी ती अचानक आली. येताना किती क्रांन्तीकारी होती. जाताना नोटबंदी नेमकं काय घेवून गेली, आज कस वाटतं.. याचं सविस्तर विवेचन त्याला दिलं. एवढ सगळ ऐकून तो KFC च्या म्हाताऱ्याकडे बघत म्हणतो की, या नोटा मी जपून ठेवणार आहे. का ठावून तुमच्या जशी आत्ता जून्या शासनाची आठवण येतेय तशीच जुन्या नोटांची आली तर लिलावात चांगली किंमत तरी मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.