सगळ्याच बाहुल्या वाटत असल्या तरी त्यातही प्रकार असतातच की.

सिंगापुरमध्ये थोडाफार सेटल झालो होतो, दोन चार महिने झाले असतील. कोल्हापूरातनं मुंबईत आणि मुंबईतनं थेट सिंगापुर असा प्रवास होता. आत्ता बऱ्यापैकी जुळाय लागलेलं. दोन चार महिन्यांनी सुट्टी काढली ते थेट गाव गाठलं. 

गावातल्या मित्राला फोन केला आणि कोल्हापूरात आलोय म्हणून सांगितल, तर त्याचा पहिला प्रश्न होता

“सिंगापुरच्या पोरी कश्यायत ? 

माणसं पाऊस,पाणी विचारतात. काहीच नाहीत तर येताना एक्साईज फ्रि आणल्या का विचारतात पण सिंगापुरात कोण गेलं की पहिला पोरी कश्या आहेत विचारतात. गेल्या दोन वर्षात सिंगापुरच्या पोरींबद्दल हजार प्रश्न ऐकून कंटाळलो म्हणून म्हणलं, आत्ता बोलभिडूवरनच सांगू टाकावं नेमक्या पोरी कश्यात त्या. 

जस भारताच्या पश्चिमेकडचं जे काय असेल ते इंग्लडच असतय. म्हणजे पोरगी युरोपातील असो. रशियन असो की अमेरिकेतली असो आपण तिला इंग्रजच म्हणतो. तसाच प्रकार पुर्वेकडच्या पोरिंच्या बाबतीत आहे. पुर्वेचं काहीपण असो ती चायनिझ. बारीक डोळे दिसले की चायनिझ. या सगळ्याचं पोरी दिसायला म्हणजे बाहुल्याचं. बारीक डोळे, आपल्याला आवडतो तितकाच पांढरा रंग, मउशार केस, गालावर गुलाबी गुलाबी रंग. हसताना असं हसतात की वाटतं दोघी तिघींना खांद्यावर टाकावं आणि निवांत भारतात जावून संसार थाटावा. आत्ता दिसताना सगळ्या सारख्याच दिसत असल्या तरी दिसतं तस नसतय. कस ते सांगतो. 

सिंगापुरातल्या सगळ्या पोरी काय सिंगापुरातल्या नाहीत. फिलिपाईन्स, इंडोनेशिया, व्हिएतनाम, युक्रेन, मलेशिया, थायलंड अशा वेगवेगळ्या देशातल्या या पोरी. 

यात फिलिपाईन्सच्या पोरी आहेत त्या खासकरुन घरकामासाठी सिंगापूरात राहतात. त्या सर्रास भारतीय पोरांबरोबर हिंडताना दिसतात. याचं नेमकं गणित काय आहे विचारल्यावर मित्र म्हणला, भारतीय पोरं सिंगापुरमध्ये उपाशी कॅटेगरीत धरतात. फिलीपाईन्सच्या पोरींनापण अशी पोरं आवडतात. साहजिक सारख्याला वारकं म्हणून त्यांच चांगल जमतं अस म्हणतात. 

सुंदरतेचा निकष लावायचा झाल्यास, फिलिपाईन्स आणि चायनिझ मुलींची नाक बसकी असतात. म्हणजे सगळ्याचं मुलींची नाक बसकी असतात पण यांची जरा जास्तच बसकी असतात इतकच. त्यामानाने युक्रेन आणि व्हिएतनामच्या मुली सुंदर दिसतात. त्यांना पटवायचं म्हणलं तर भारतीय मुलांना स्वत:चा एक क्लास मेंन्टेन करावा लागतो. त्यांच्यासोबत फिरणं म्हणजे खाईचं काम नसतं. सिंगापुरमध्ये राहून तुम्ही स्वतची एक लाईफस्टाईल मेन्टेंन करु शकत असाल तर त्या मुलींच्या थोडं का होईना तुम्हाला जवळ जाता येवू शकतं. व्हिएतनामच्या या “क्लास” मुलींच्या जवळ जाताना एका गोष्टीची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागते ती म्हणजे ती मुलगीच आहे का याची ? पुढचं काय ते कळायला तुम्ही सुज्ञ आहातच. 

हे ही वाचा – 

आत्ता राहता राहिला प्रश्न तो मलेशियाच्या मुलींचा. मलेशियाच्या मुलीं म्हणजे आपल्या हिकडच्या शिवाजी पेठेतल्या मुलींसारखं प्रकरण आहे. नादाला लागताना शंभर वेळा विचार करावा लागतो नाहितर टमकं खायची वेळ येते. त्या हिजाब घालून असल्यानं हिजाब हेच त्यांच्या सौंदर्याच वर्णन ठरतं. हा समाज थोडासा कडवट असल्यानं अजूनतरी कोणी भारतीय मलेशियातील मुलींसोबत फिरत असल्याचं चित्र मला दिसलं नाही. 

आत्ता इतक्या मुलींमध्ये सिंगापूरमध्ये राहणाऱ्या भारतीय पोरी हा सुद्धा क्लास येतोच की, तर भारतीय पोरींच्या कॅटेगरीत साउथच्या पोरी नार्थच्या पोरी असे दोन क्लास येतात. पैंकी साउथच्या मुलींना सिंगापूर म्हणजे घरच्यासारखचं वाटतं. त्या मनमिळावू असतात. पण त्या लगेच तुम्हाला फ्रेन्डझोन करुन टाकतात. राहिल्या नार्थच्या मुली तर त्या भारतातही आपल्याला भाव देत नाहीत आणि इथही भाव देत नाहीत. 

1 Comment
  1. Sushma Zore says

    भारी लिहिलं शेखर

Leave A Reply

Your email address will not be published.