सिंगापूरात रात्रीचं काय चालतय, सांगतोय कोल्हापूरी भिडू.

फाॅरेन म्हटल की लोकांना काय आठवतंय तर नाइट लाइफ, थोडक्यात इथं रातचं कस असलं..? मग नाइट लाईफ म्हटलं की आठवतो पब, डान्स, दारु आणि पोरी, हे लागु झालं फक्त पोरांसाठी. (अपवादात्मक उदाहरणे असू शकतात.) 

मग पोरींचा नेहमीचा प्रश्न असतोय, आम्ही काय करायचं..? 

तर भिडू आणि भिडींनो.. 

सिंगापुर बद्दल बोलायच झालं तर आपल्याकडच्या पोरींना सिंगापुरच्या नाइट-लाईफ बद्दल वरवरनं आकर्षण आहे.

त्याच सगळ्यात मोठ्ठ कारण म्हणजे इथं असणारी सेफ्टी. तुम्ही रात्री किती वाजता पण हिंडायला जावा, तुमच्याकडं बघून कोणी शिट्टी वाजवायचं धाडस देखील करणार नाय, तुम्हाला शुक शुक सुद्धा करायची हिंमत करणार नाही.

पोरींसाठी सिंगापुरच्या नाईट-आऊटसाठी सगळ्यात भारी दिवस बुधवार, कारण अख्या सिंगापुर मध्ये त्या दिवशी पोरींना फ्री entry असते. पोरींसाठी चांगले पब म्हटले तर Raffles one चा altitude, Marina Bay चा Celavi आणि Clark quay चा zouk. सगळ्या भारतीय बायका बुधवारी शक्यतो nightout ला बाहेर पडतात. (आत्ता बुधवारचं फ्रि असतय म्हणून त्या दिवशी बाहेर पडतात असा अंदाज मांडत असला तर १०१ टक्के बरोबरचं हाय) Clark Quay ला बाकीचे पण पब भारी आहेत पण सगळीकड लोकल लोक असतेत आणि आपल्याकडच्या पोरींना तो क्राउड आवडणार नाही. आपल्याकडच्या पोरींना, बायकांना फाॅरेनमध्ये आल्यावर एक सेफ मोकळेपणा पाहीजे असतो तो सिंगापुर मध्ये नक्की मिळु शकतो.

ज्यांना सालसा किंवा बचाता सोशल डान्स मध्ये interest आहे त्यांच्यासाठी गुरुवार आणि मंगळवारी Clark quay ला senor tako आणि Cuba libre मध्ये सोय असते. काय एक एक पब्लिक डान्स करतय. ज्यांना येत नाही त्यांनी पण टेंशन घ्यायची गरज नाही कारण सगळीकड ८ ला चालु होतय आणि पहिला एक तास कस डान्स करायच ह्याच workshop घेत असतात.

आता भिडू लोकांसाठी डिटेल मध्ये .

इथं Clark quay म्हणुन एक एरिया आहे तिंथ ढिग पब आहेत. आपल्याकड एक डोक्यालिटी असत्या पब मध्ये जायच म्हणुन ९ वाजल्यापासुन तयार, पण तसं करायच नाही. नाईट लाइफ अनुभवायचे स्वस्तातले पर्याय सांगतो. Clark quay मध्ये Shiraz म्हणुन एक हाॅटेल पण आहे आणि छोटा स्टॅाल, स्टाॅलच्या इथं बसुन shawrma आणि बियर मागवायच्या (हार्ड ड्रिंक लय करायच नाही कारण अख्खी रात्र काढायची असत्या.) ते पित पित तिथल्या समोरच्या हाॅटेल मध्ये बॅले डान्स चालु असतोय तो बघायचा.

साधारण ११ पर्यंत असाच Clark quay मध्ये हिंडत टाईमपास करायचा. लयच वेळ उरला असल तर जवळच Boat Quay ला जायच तिथ इंडियन डान्स बार आहेत. आता सिंगापूरला येवुन इंडियन डान्स बार ला कोण जाईल का ? पण इथं राहणारे सगळे सिंगल लोक तिथं पडिक असतेत. क्वालिटी बद्दल म्हणाल तर आपल्याकडचे गल्ली बोळातले डान्स बार भारी होते.

पब मध्ये जायच तर ११:३० नंतर जायच कारण तेव्हा खरा क्राउड यायला चालु होतो. सगळ्याची काय नाय काय तर स्पेशालिटी असते.

Get juiced नावाचा एक पब आहे त्यात सगळे लोकल काॅलेजची पोर पोरी दिसतील international चेन असलेला zouk आहे त्यात सगळ्या देशांचे लोक असतात, ह्या पब ने त्यांची स्वत:ची ५० लोकांची security फोर्स ठेवल्या, जरा कुठ काय आगावुपणा दिसला की लगेच बाहेर. इथं I card बघितल्याशिवाय सोडत नाही मग ते आधार कार्ड पण चालतय, आमचा एक मित्र ST मध्ये आहे, तो आलेला तेव्हा आम्ही त्याच ST च ओळखपत्र दाखवलेल ते पण चालल. सगळ्यात रेकमेंडेड zouk आहे.

बाॅलिवुड म्युझिक पाहीजे असेल तर तर बाॅलीवुड lah किंवा Moshi Moshi आहे. बाॅलीवुड lah ला सगळे भारतीय पोर पोरी जे सिंगापुरला काॅलेजला आहेत ते दिसतील आणि Moshi Moshi ला सगळा फॅमिली क्राउड.

Marina Bay sandz चा celavi आहे, जिथ शुक्रवार आणि शनिवार तुफान राडा असतोय आणि इथं चप्पल किंवा shorts चालत नाहीत. फाॅरेनचा म्हणजे UK, US चा क्राउड.

सर्व्हिस बार पाहीजे असतील तर Orchard Tower ला जायच तिथ सगळे सर्व्हीस बार आहेत, सर्व्हिस साठी ग्लोबल पोर पोरी आहेत. जर तुम्ही जास्त दिवस सिंगापुर मध्ये राहणार असाल आणि एखादा पब आवडला तर सिंगापुर मध्ये एक सोय आहे , तुम्ही बाटली विकत घेवुन ठेवु शकता, जेवढी प्यायची तेवढी प्यायची आणि उरलेली ठेवुन द्यायची. पुन्हा याल तेव्हा कार्ड दाखवुन उरलेली बाटली मिळु शकते. किमान एखादा महिना ठेवु शकता.

सिंगापुरच्या नाइट लाइफच सगळ्यात भारी आवडलेली गोष्ट काय तर इथ राहणारी लोक. इतके वेळा नाइटआऊट केल्या पण कधीच कुणी कुठ भांडताना दिसलं नाही की मारामारी नाही. रात्री ३-४ ला पिवुन पण लोक गपगुमान टॅक्सी साठी लाईन मध्ये थांबलेले दिसले आणि टॅक्सी ड्रायव्हर स्वत:हुन प्लास्टिक पिशव्या कुठ ठेवलेत ते सांगतो, ह्या अशा वातावरणात कोणी कितीपण आऊट झाला तरी माणसात राहतोय.

बाकी मी आत्ता सिंगापूरातच असतो, मुळचा कोल्हापूरचा असल्यानं तुम्ही सिंगापूरात आला तर आपल्या भाषेत डिटेल पत्ता सांगेल. पाहूणचारात आपण हयगय करतच नसतो. 

  • चंद्रशेखर श्रीखंडे. 

आत्ता इतकं वाचून तुम्हाला, कवातरी सिंगापूरला जायला पाहीजे टाईप गोव्याच्या प्लॅनिंगसारखं फिलिंग आलं असेल तर आर्टिकल स्पॉन्सर करणाऱ्यांचा फोटो देतो,

IMG 20181220 WA0022

TIPSY TURTLE. पुलसाईट लॉन्ज अॅन्ड बार.

पत्ता : चांदणी चौकातून जवळ पडतय. दौलत पेट्रोल पंपाजवळच आहे. मुळशी रोड भूगाव-बावधन. हे जमल नाही तर डायरेक्ट फोटोतल्या नंबरवर फोन मारा. बोलभिडूवरचा लेख वाचून आलोय अस थेट मालकांना सांगा. VIP ट्रिटमेंट दिली जाईल. 

Leave A Reply

Your email address will not be published.