अमिताभ यांच्या आईने मध्यस्थी केल्यामुळेच सोनिया यांचं राजीव गांधींशी लग्न होऊ शकलं
राजकारणातले गांधी कुटुंब आणि बच्चन घराण्याच्या इतिहास सर्वांनाच माहिती आहे. तेजी बच्चन आणि इंदिरा गांधी यांच्यात घनिष्ट मैत्री होती. हरिवंशराय बच्चन यांची पत्नी आणि अमिताभ बच्चन यांची आई तेजी बच्चन या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यानंतर या मैत्रीचा सीलसिला हा अमिताभ बच्चन आणि राजीव गांधी यांच्या मैत्रीने चालूच राहिला.
अमिताभ बच्चन आणि राजीव गांधी यांचे बालपण एकत्र खेळण्यात गेले. अमिताभ बच्चन यांचे वडील परराष्ट्र मंत्रालयात अधिकारी म्हणून काम करत होते. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या तत्त्वांबद्दल खूप आदर होता. ते अलाहाबादमध्ये राहत असताना दोन्ही कुटुंबात खूप जवळीक निर्माण झाली होती. त्याचदरम्यान तेजी बच्चन या नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी या डोही खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या. नंतर, जेव्हा बच्चन कुटुंब दिल्लीत स्थलांतरित झाले, तेव्हा तेजी बच्चन यांना एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
पण या दोन्ही कुटुंबाची स्टोरी कोणत्या पिक्चरच्या स्टोरीपेक्षा कमी नाही. या दोन्ही कुटुंबांच्या नात्यात अनेक चढउतार आले.
एकदा अशी घटना अशी घडली कि, एक वेळ अशी आली की दोन कुटुंबातील नात्यातील विश्वासाला तडा गेला. त्याचं कारण म्हणजे राजीव गांधी आणि सोनिया यांचे लग्न.
हे लग्न जमावं म्हणून अमिताभ बच्चन यांच्या आई तेजी बच्चन यांनी मध्यस्थी केली होती.
सोनिया आणि राजीव गांधी यांच्या लग्नात बच्चन कुटुंबाची भूमिका खूप महत्त्वाची होती. इंदिराजींचे मन वळवण्यात तेजी बच्चन यांनी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली.
या कुटुंबांचे नाते इतके घट्ट होते कि, जेंव्हा राजीव गांधी जेव्हा सोनिया गांधींशी लग्न करण्याच्या तयारीत होते तेव्हा तेजी बच्चन यांनी मध्यस्थ म्हणून काम केले. तेजी बच्चन यांच्या शब्दाखातर आणि त्यांच्या समजावण्यामुळेच इंदिरा गांधी यांनी राजीव गांधींच्या लग्नाला परवानगी दिली होती. इंदिरा गांधी आपल्या मुलाचं लग्न एका इटालियन मुलीशी होतंय हे सुरुवातीला पटत नव्हतं. पण तेजी बच्चन यांनी त्यांना समजावलं आणि त्या लग्नाला तयार झाल्या.
१३ जानेवारी १९६८ रोजी जेंव्हा सोनिया भारतात राहायला आल्या होत्या तेंव्हा त्यांना एयरपोर्टवर रिसीव्ह करण्यासाठी अमिताभ बच्चन आपल्या आईसोबत पहाटच्या कडाक्याच्या थंडीत पोहोचले होते.
त्या दिवशी सोनिया गांधी राजीव यांची मंगेतर म्हणून भारतात आल्या होत्या. त्यानंतर सोनियांना बच्चन कुटुंबीयांच्या घरी नेण्यात आले आणि तेजीने त्यांना भारतीय संस्कृती आणि चालीरीतींबद्दल समजावून सांगितले. त्यांना हिंदी बोलायला शिकवले. सोनिया आणि राजीव गांधींचे लग्न निश्चित झाल्यानंतर सोनिया आणि त्यांचे कुटुंब काही दिवस बच्चन कुटुंबाच्या विलिंग्डन क्रिसेंटच्या निवासस्थानी राहिले.
याच काळात सोनिया यांना तेजी यांनी भारतातील चालीरीती, संस्कृती इत्यादी तसेच त्यांना हिंदी बोलायला आणि येथील वेशभूषा, साडी नेसणे वेगैरे अशा गोष्टी शिकवल्या गेल्या आणि त्यांना एका प्रतिष्ठीत राजकीय कुटुंबात लग्न करण्यासाठी तयार करण्यात आले होते.
तेजी यांनी सोनियांसाठी आईचीच भूमिका निभावली होती, अशी आठवण दोन्ही कुटुंब काढत असतात.
अमिताभ आणि राजीव गांधी यांच्यातील संबंध १९८४ मध्ये एका नवीन उंचीवर पोहोचले होते. तेंव्हा अमिताभ बच्चन यांना राजीव गांधी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर अलाहाबादमधून निवडणूक लढवायला लावली होती. ते निवडूनही आले होते. त्यानंतर अमिताभ बच्चन दिल्लीतील काँग्रेसच्या युवा ब्रिगेडचा भाग बनले.
पण जेंव्हा बोफोर्स घोटाळ्यात त्यांचा सहभाग असल्याची बातमी एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केली आणि त्यांनी अमिताभ यांनी राजकारण सोडून राजीनामा दिला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून अमिताभ बच्चन यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली.
पण या बोफोर्स घोटाळ्यामुळे दोन जुन्या मित्रांमध्ये मतभेद सुरु झाले आणि दोन्ही कुटुंबांमध्ये जिव्हाळ्याचे सबंध राहिले नव्हते. जेंव्हा जेंव्हा दोन्ही कुटुंबात वाईट-चांगले प्रसंग आले तेंव्हा त्यांनी जगाला दाखवण्यासाठी आपल्यात सगळं काही चांगलं असल्याचं ढोंग देखील केलं. त्यात प्रियंका गांधींच्या लग्नाच्या वेळेस अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावली होती.
१९९१ मध्ये जेंव्हा राजीव गांधी यांची हत्या झाली त्यानंतर आणखीनच दोन्ही कुटुंबात दुरावा आला. त्यांचे ठीकठाक असलेले संबंध बिघडले. अमिताभ बच्चन यांनी वाईट काळात त्यांना एकटे सोडल्याची जाणीव गांधी कुटुंबाला होत होती तर असंच काहीसं अमिताभ यांचीही भावना होती. अमिताभ बच्चन एकदा म्हणाले होते की, गांधी घराण्याने त्यांना राजकारणात आणले आणि अडचणीच्या काळात त्यांना मध्येच सोडून दिलं. यासोबतच जेव्हा बच्चन यांची कंपनी ABCL दिवाळखोरीत निघाली आणि अमिताभ आर्थिक संकटात सापडले तेंव्हा देखील गांधी परिवाराने त्यांना मदत केली नाही. या संकटाने दोन्ही कुटुंबांचे नाते बिघडवले आणि अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन यांना आपली निराशा लोकांपासून लपवता आली नाही..त्यामुळे हे नंतर उघड झाले कि, आता दोन्ही कुटुंबात काही आलबेल नाही.
बच्चन हे एकमेव कुटुंब होतं ज्यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानी कधीही येण्याची परवानगी असायची. मात्र अचानक बच्चन कुटुंब अस्पृश्य’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
मात्र आजही गांधी कुटुंब बच्चन कुटुंबाची आठवण काढत असते.
प्रियांका गांधी बच्चन कुटुंबाची आठवण काढत असतात. प्रियांकाला जेंव्हा जेंव्हा बालपणीच्या काही विसरलेल्या गोष्टी आठवतात तेंव्हा त्या ट्वीट करून आपल्या भावना शेअर करत असतात.
श्रीमती तेजी बच्चन बड़ी हनुमान भक्त थीं। अक्सर मंगल को दिल्ली के हनुमान मंदिर में मुझे ले जाकर मेरे लिए काँच की चूड़ियाँ खरीदतीं और हनुमानजी की कथा सुनातीं। उनसे ही मैंने हनुमान चालीसा के कई छंद सीखे। आज वह नहीं रहीं मगर उनकी भक्ति का प्रतीक ह्रदय में बसा है।1/2#HanumanJayanti
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 8, 2020
त्या त्यांच्या ट्वीटमध्ये तेजी आणि हरिवंशराय बच्चन या दोघांच्याही आठवणीबद्दल लिहित असतात.
हरिवंशराय बच्चन जी जिन्हें हम अंकल बच्चन के नाम से जानते थे, इलाहाबाद के एक महान पुत्र थे। एक वक्त था जब मेरे पिता की मृत्यु के बाद बच्चन जी की रचनाओं को मैं देर-देर तक पढ़ती थी। उनके शब्दों से मेरे मन को शांति मिलती थी, इसके लिए मैं उनके प्रति आजीवन आभारी रहूँगी। pic.twitter.com/eOIgaF0Z4J
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 27, 2019