श्रीराम सेनेच्या विरोधात लढण्यासाठी सनी देओल धावून जाणार !!!

 

  • तारिख  २४ जानेवारी २००९

    मंगलोरच्या अॅम्नेसिया पबवर श्रीराम सेनेच्या सदस्यांनी हल्ला केला. भरदिवसा तरुणींना रस्त्यावर खेचून आणत मारहाण करण्यात आली.

  • तारिख  २५ जानेवारी २००९

    काही लोकांनी या घटनेचे व्हिडीओ सोशल साईटवर प्रसिद्ध केले. देशभरातून या घटनेचा निषेध करण्यात आला. संपादकांनी संपादकिय लिहलं. न्यूज चॅनेलवाल्यांनी मुक्तचर्चा घडवल्या. भारतीय नागरिकांनी डिपी बदलले. भावनिक पोस्ट टाकून योग्य प्रतिउत्तर देण्यात आलं.

  • तारिख २६ जानेवारी २००९

    या घटनेत प्रमुख आरोपी म्हणून श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांच नाव समोर आलं. त्यांच्यासह ३० जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला. प्रमोद मुतालिक यांचा निषेध करण्यात आला.

  • तारिख २७ जानेवारी २००९

    नव्या घटनां समोर आल्या. दिवसभराचं काम केल्यानंतर मंगलोरच्या घटनेच्या काही बातम्या निर्देशनास आल्या त्या दुर्लक्षीत करण्यात आल्या. लोक आपआपल्या दैंनदिन कामात स्थिरस्थावर झाली.

  • तारिख २३ मार्च २०१४

    प्रमोद मुतालिक यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यात आला. प्रमोद मुतालिक हे लोकसभा इलेक्शन लढतील अशी चर्चा चालू झाली.

  • तारिख २३ मार्च २०१४

अवघ्या काही तासातच BJP चे आमआदमी मनोहर पर्रिकर यांनी पार्टी हायकमांडकडे मुतालिक यांच सदस्यत्व रद्द करावं म्हणून प्रस्ताव दाखलं केला. हा प्रस्ताव मान्य करत मुतालिक यांची काही तासातच पक्षातून उचलबांगडी करण्यात आली.

  • तारिख १२ मार्च २०१८

    मंगलोरच्या अॅम्नेसिया पबवर श्रीराम सेनेच्या सदस्यांनी हल्ला करुन मुलींना मारहाण केल्याबद्दल प्रमोद मुतालिक यांची निर्दोष मुक्तता. भरदिवसा या तरुणींना रस्त्यावर खेचून मारहाण करण्यात आली होती. पैकी मार खालेल्या एकाही मुलींन कोर्टात साक्ष दिली नाही. मार खातानां पाहिलेल्यांनी आम्ही तिथ नव्हतोच म्हणून सांगितल. कोर्टाने सांगितलं व्हिडीओ हा दुय्यम पुरावा आहे. प्रत्यक्ष घटनेचे साक्षीदार उपलब्ध नाही सदर आम्ही सर्व २४ आरोपींची मुक्तता करत आहोतं.

  • १३ मार्च २०१८ 

    आमच्या मनात प्रश्न उत्पन्न झाला, हल्ला तीस जणांनी केला मुक्तता २४ जणांची. उर्वरीत सहा जण गेले कोठे. तेव्हा अस समजल की त्यातील दोन जण दरम्यानच्या कालावधीत देवाघरी गेले तर उर्वरीत चारजण सध्या नीरव मोदि, विजय मल्यासारखं ऐषआरामी आयुष्य जगत आहेत.

  • १४ मार्च २०१८

    मुंबईतून जोरदार आवाज आला….
    तारिख पैं तारिख….तारिख पैं तारिख…. औंर मुतालिक….
    गरिबांचा वकिल कम सोल्जर कम पोलिस कम गुप्तहेर कम रॉबिन हूड सनी देओल यांने आवाज दिला.

“तारीख पे तारीख.. तारीख पे तारीख…तारीख पे तारीख और तारीख पे तारीख मिलती रही है…लेकिन इंसाफ़ नही मिला माई लॉर्ड इंसाफ़ नही मिला…मिली है तो सिर्फ़ ये तारीख ”

Leave A Reply

Your email address will not be published.