शाही इमामांची इच्छा आहे, जामा मशिदीच्या दुरुस्तीचा खर्च खाजगी कंपन्यांनी उचलावा..

भारतात आजही जामा मस्जिदच्या शाही इमामांनी चाँद दिसला असं जाहीर केल्याशिवाय ईदच्या सणाला सुरवात होत नाही. आजची जुनी दिल्ली म्हणजेच शहाजहांपूरची उभारणी करताना १६५०-५६ दरम्यान शहाजहांनी हि मशीद बांधली होती.

अरबांकडे तेलाचे पैसे येइपर्यंत जगातल्या सगळ्यात मोठ्या मशिदीचा मान भारताच्या जामा मशिदीलाच होता.

जवळपास १ लाख लोक जमा मशिदीच्या परिसरात नमाज अदा करू शकतात. ताजमहाल, लाल किल्ला यांचप्रमाणे जामा मशिदीवरही पर्यटक गर्दी करत असतात.

मात्र आज ६५०वर्षे डौलाने उभी असणारी हे मशीदिला आता मात्र डागडुगीची गरज आहे.

त्यातच वादळी वारे आणि पाऊस याने मागच्या आठवड्यात जामा मशिदीच्या एक मिनाराची पडझड झालीय.

मशिदीच्या तिन्ही घुमटातून मशिदीत पाणी झिरपतंय त्यामुळे मशिदीची हालत दिवसेंदिवस अजूनच खराब होतेय. मशिदीचे दरवाजे, भिंती, घुमत यांमधून दगडांचे कोसळणे आता रोजचंच झालंय.

आता ६५० वर्षे जुनी असल्यामुळं जामा मशिदीची दुरुस्ती पुरातत्व खात्याने करायला पाहिजे अस म्हणत असाल तर पुरातत्व खातंही टेक्निकली यासाठी बांधील नाहीए.

कारण मशीद पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येत नाही ती तर ती आहे दिल्ली वक्फ बॉर्डच्या ताब्यात.

तरी हि पुरात्तत्व विभागाने कोरोनाच्या आधी मशिदीची डागडुजी सुरु केली होती मात्र करोनानंतर ती हि बंद झालीय.

आता एवढया मोठ्या मशिदीच्या दुरुस्तीचा खर्च पण काय छोटा मोठा नाहीए.  मशिदीच्या रोजच्या देखभालीसाठी दर महिन्याला  जवळपास २० ते २५ लाखांची गरज आहे. एवढंच नाही तर मशीद आहे तशी किमान १०० वर्षे उभी राहायची असेल तर तिची ७ ते ८ वर्षे दुरुस्ती करणं गरजेचे आहे. त्यासाठी किमान १० करोड रुपयांची गरज आहे.

एवढंच नाही तर मशिदीचे रचना , सौंदर्य अबाधित ठेवून तिची दुरुस्ती करण्यासाठी विशेष कारागीर आणि एक्स्पर्ट यांची गरज असणार आहे. पुरात्तव विभागाने याची काळजी न घेता साध्या सिमेंटचा उपयोग केल्यानं चांगलाच वाद झाला होता.

त्यातच मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी मशिदीच्या मिनारांची मागच्या ५० वर्षात संवर्धनची कोणतीच कामे झाली नसल्याचा दावा केलाय.

आता मशिदीच्या दुरुस्तीच्या कामात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी आता शाही इमाम बुखारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. मशिदीत वारंवार होणाऱ्या पडझडीचा उल्लेख इमामांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

त्याच बरोबर बुखारींनी अजून एक आयडिया शोधून काढलीय. खाजगी कंपन्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नावाच्या आपल्या उत्पन्नाचा काही टक्का समाजउपयोगी कामांसाठी दान करत असतात.

 याच खाजगी कंपन्यांनी मशिदीच्या डागडुगीसाठी निधी दयावा अशी बुखारांची इच्छा आहे.

 मात्र असा निधी पुरातन वास्तूंच्या दुरुस्तीसाठी देता येतो का याबद्दल  साशंकता आहे.  

तसंच निधी तो या वास्तूंच्या दुरुस्तीसाठी वापरता येतो का याबाबद्दलही कायद्यात स्पष्टता नाही. त्यामुळे बुखारींनी याची परवानगी द्यावी अशी मागणी पंतप्रधान आणि पुरातत्व खात्याकडे केली आहे .

नुसतं एका धर्माचं प्रार्थनास्थळ एवडीचं जामा मस्जिदीची ओळख नाहीए .  ताज महाल, लाल किल्ला यांसारखंच देशाच्या पुरातन वैभवांपैकी एक असलेली हि वास्तू आहे. त्यामुळं आता हा घोळ मिटेल तेव्हा मिटेल  पण तोपर्यंत ६५० वर्षे जुना असलेल्या ठेव्याचं  नुकसान होऊ नये म्हणजे झालं.    

 

Leave A Reply

Your email address will not be published.