पाक अंपायरने मुद्दाम आउट दिलं पण त्यातूनही गावस्करने ब्रॅडमनचा विक्रम मोडला.

पाकिस्तान देशाच्या निर्मितीपासूनच भारत पाक संबंध कायम ताणले गेलेले.काश्मीर चा प्रश्न असो का कारगिल चा आणि त्यात क्रिकेट चा सामना म्हणल कि त्यालाही युद्ध असल्याप्रमाणे लोक पाहत असतात. आणि क्रिकेट प्लेअर म्हणजे सैनिक अस सामन्याच स्वरूप असत. खेळाडूंनाही तेवढचं प्रेशर हँडेल कराव लागत.

१९७८ मधील सामना १७ वर्षाच्या बिघडलेल्या संबंधानंतर आयोजित करण्यात आला होता.

या सामन्यात लाहोर कसोटीत चेतन चौहान आणि सुनील गावस्कर यांनी पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळं बाद देण्यात आल. कारण,त्या काळात मुळात तटस्थ पंच नेमण्याचा नियम नव्हता. त्या काळात कसोटी सामन्यासाठी पंच त्या देशाच्या क्रिकेट नियामक मंडळाकडून नेमले जात असत आणि आता पाकिस्तान ने नेमलेले पंच पाकिस्तान च्या बाजूने निर्णय देणार हे उघड होत.

तो काळच असा होता कि, भारतीय क्रिकेट प्लेअर पाकिस्तानी पंचाच्या निर्णयावर कायम नाराज असायचे. कारण पाकिस्तानी पंचाच कामच चुकीचे निर्णय देणं होत. आता यात शककुर राणा आणि खिजार सारखे पंच म्हणल कि विषयच संपला !!

या लाहोर कसोटीत सुनील गावस्कर फार चांगला खेळला होता आणि त्याची चेतन चौहान बरोबर भागीदारी चांगली  होती आता आघाडीच्या फलंदाजांची भागीदारी चांगली झाली म्हणल्यावर पाकिस्तानी टीम चांगलीच भेदरली. पाकिस्तानी कर्णधार मुश्ताक मोहमदच्या गोलंदाजीवर गावस्करच्या पॅडवर लागून उडालेला चेंडू सर्फराजने पकडला.

आता पंचाला चांगलीच संधी आली. मग काय भाऊंनी उचलाच हात वर आऊट नसतानाही आऊट करार दिला. ९७ रन करत १०० रन च्या जवळ पोहचला गावस्कर बाद घोषित झाला आणि काही वेळातच ९३ धावा झालेला चेतन चौहान सुद्धा बळी पंचानी घेतला.

मग काय?? गावस्कर भाऊ चांगलेच तापले.

सामन्याच्या नंतर  भारतीय हायकमिशन ने एक पार्टी आयोजित केली होती या पार्टी सगळ्या भारतीय क्रिकेट टीम ला आमंत्रण होत. सुनील गावस्कर हि तिथे उपस्थित होते. सुनील भाऊंच्या चेहऱ्यावर रागाचा पारा चढलेला स्पष्ट दिसत होता. एका आकडेतज्ञानी भाऊंना विचारलं दुपारचं प्रकरण डोक्यातून गेल नाही वाटत.

सुनील गावस्कर म्हणाले,

“खोट आऊट दिवून परत खुन्नस द्यायची काय गरज होती त्या सर्फराजला?”

मग त्या आकडेतज्ञानी सुनील गावस्करांना एक  भारी गोष्ट सांगितली.

” तू आता नाईंटी मध्ये बाद झालास ना, हा एक जागतिक विक्रम तुझ्या नावावर झाला आहे क्रिकेट चा शहेनशहा डॉन ब्रॅडमन ला ५२ कसोटी आणि ८० इंनिंग मध्ये देखील जे जमल नाही ते तू करून दाखवल आहेस.”

पाकिस्तानी पंचाच्या करामतीमुळे सुनील गावस्करच्या नावावर असा आगळावेगळा नवीन विक्रम झाला होता. नर्व्हस नाईंटी मध्ये जास्तीत जास्त कसोटी सामने खेळ्यानंतर अशा प्रकारे आऊट होण्याचा तो जागतिक विक्रम सुनील गावस्कर ने केला होता .

या आकडेतज्ञानी दिलेल्या माहिती मुळे गावस्करचा मूडच बदला त्याचा राग अचानक गायब झाला तो आनंदाने नाचू लागला या आपल्या नवीन रेकॉर्ड बद्दल सहकार्यांना सांगू लागला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.