कुंबळेचा विक्रम होईल म्हणून वकार रनआऊट होणार होता पण…

बरोबर वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे. १९९९ चा पाकिस्तानचा तो सुप्रसिद्ध भारतातला कसोटी दौरा सुरु होता. पहिला कसोटी सामना सचिनच्या जबरदस्त शतकानंतर ही गमवावा लागला होता. या पराभवामुळ देशाची मान खाली घालायला लागली होती. आधीच देशातल्या वेगवेगळ्या संघटना ही मालिका रद्द व्हावी म्हणून निदर्शने करत होते. त्यात शिवसेनेन पुढची मॅच जिथे होती ते दिल्लीचं फिरोजशहा कोटला स्टेडियमचं पीच उखडून टाकलेलं. पुढे काय होणार ही अनिश्चितता होती.

वाजपेयीजी म्हणाले, मॅच रद्द होणार नाही आणि सिरीजसुद्धा रद्द होणार नाही. ठरलेल्या शेड्युल प्रमाणे दुसरी टेस्ट फिरोजशहा कोटलावरच खेळवली गेली.

मागच्या कसोटीचा बदला घ्यायचा म्हणूनच सगळे खेळाडू जिद्दीने मैदानात उतरले. कोटलाची खेळपट्टी आधीपासून फिरकीला साथ देणारी आहे हे ठाऊक होत त्यामुळे अझरुद्दीनने टॉस जिंकल्यावर पहिल्यांदा बॅटिंग निवडली. पहिल्या डावात पाक ऑफ स्पिनर सकलेन मुश्ताकने भारतीय फलंदाजांना चांगलेच दमवले. तरी सदागोपन रमेश आणि अझरनी काढलेल्या हाफ सेंच्युरीमुळे भारताचा स्कोर २५२ झाला.

पाकिस्तानची पहिली इनिंग सुरु झाली तेव्हा त्यांची सुद्धा अवस्था काही वेगळी नव्हती. कुंबळे आणि हरभजन नी आपल्या फिरकीच्या जोरावर त्यांना नाचवलं. त्यांच्या तर फक्त १७२ धावा झाल्या. भारताच्या दुसऱ्या इनिंग मध्ये मात्र बॅट्समननी चांगली कामगिरी केली. सदागोपन रमेश याही डावात चांगला खेळला. पण त्याच शतक ४ धावात हुकलं. गांगुलीने सुद्धा फिफ्टी मारली आणि सर्वात विशेष म्हणजे  जवागल श्रीनाथने नवव्या क्रमांकावर येऊन ४९ धावा बनवल्या.

पाकिस्तानला जिंकायला ४२० धावाचा डोंगर पार करावं लागणार होता. क्रिकेटचा अभ्यास असणारा कोणीही सांगेल की हे टारगेट पूर्ण होण अवघड असत. आणि त्यात शेवटच्या इनिंग मध्ये कोटलाच्या टर्निंग ट्रॅकवर तर अशक्यचं. पण हा सामना भारत पाकिस्तान होता. इथे काहीही घडू शकत होत. पाकिस्तानचे खेळाडूसुद्धा जोर लावून खेळत होते.

सईद अन्वर आणि शाहीद आफ्रिदीने भारी सुरवात केली.

हे दोघे सुद्धा बॅटसमन भारताच्या राशीला लागलेले ग्रहण होते. एकदा ते सेट झाले की मॅच गेली. दोघांची शतकी भागीदारी झाली. मॅच बघत असणाऱ्या कोट्यावधी प्रेक्षकांचा धीर खचू लागला होता. ज्याच्याकडून आशा होती असा मेन बॉलर कुंबळेला चांगलाच मार पडला होता. अझरुद्दीन त्याला बदलत का नाही असे टीव्ही बघणारे घराघरातले तज्ञ आपलं मत देत होते.

आणि तेवढ्यात आफ्रिदी कुंबळेच्या जाळ्यात सापडला. त्याच्या बटची कड घेऊन बॉल नयन मोंगियाच्या हातात जाऊन विसावला. शांत असलेलं स्टेडियममध्ये एकच दंगा झाला. आफ्रिदीच्या विकेटनंतर काय जादू झाली काय माहित एकापाठोपाठ एकएक सगळे फलंदाज कुंबळेच्या फिरकीपुढे नांगी टाकू लागले. फॉर्मात असलेला अन्वर, इंजमाम उल हक पण काही करू शकले नाहीत. इजाज अहमद, युसुफ योहाना तर डकवर आउट झाले. वसीम अक्रम एकटाच एका साइडने लढा देत होता.

कोणालाही वाटलं नव्हत की त्या दिवशी काही तरी चमत्कार होणार आहे. दुसऱ्या बाजूने श्रीनाथ, हरभजन वेंकटेश प्रसाद सुद्धा विकेट काढायचा प्रयत्न करत होते. पण यश फक्त कुंबळेला मिळत होते. त्याला आपली यापूर्वीची बेस्ट फिगर म्हणजेच ७/४९ पेक्षा चांगली कामगिरी डोळ्यासमोर दिसत होती.

सलीम मलिक आउट झाला तेव्हा त्याने तो विक्रम मोडला. त्याच्या नंतर मुश्ताक अहमद आणि सक्लेन मुश्ताक हे अनिलच्या सलग दोन बॉलवर आउट झाले. त्याच्या खात्यात ९ विकेट झाल्या.

एखाद्या टीमचा सगळ्याच्या सगळ्या खेळाडूना आउट काढण्याचा विश्वविक्रम अगदी टप्प्यात आला. पण समोर होते पाकिस्तानी .

सगळे खेळाडू अनिलचा विक्रम व्हावा म्हणून प्रयत्न करू लागले. श्रीनाथ त्याच्या बॉलिंगवेळी चुकून आपल्याला विकेट मिळू नये म्हणून मुद्दामहून स्टंपपासून दूर बॉल टाकू लागला. पाकिस्तानी कॅप्टन वासिम अक्रम आणि त्याचा जोडीदार  वकार युनुस.

वकारला अनिलचा विक्रम होऊ द्यायचा नव्हता. मैदानात आल्या आल्या अक्रमला म्हणाला की कुंबळेचा विक्रम होऊ द्यायचा नसेल तर मी रन आउट होतो. अक्रम त्याला म्हणाला,

“देख अगर कुंबलेकी किस्मत में दस विकट है तो वो उसको मिलेंगे अगर नही है तो नही मिलेंगे. मगर मै तो उसको आउट होगा नाही “

वकार युनुस गप्प बसला. मात्र कुंबळेच्या पुढच्या ओव्हर मध्ये अक्रमच्या बटची इनसाईड एज पकडून बॉल शोर्टलेग वर असणाऱ्या लक्ष्मणच्या हातात गेला. अख्खं स्टेडियम नाचू लागलं. अनिल कुंबळेन एकाच डावात दहाच्या दहा विकेट घेण्याचा विश्वविक्रम केला होता. जाता जाता गंमत- एव्ही जयप्रकाश नावाचे अंपायर या सामन्यात होते. कुंबळेने काढलेल्या दहाच्या दहा विकेटचा निर्णय या जयप्रकाशनी दिला होता.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.