टी-२० किक्रेटमध्ये दादा असलेल्या भारत, पाकिस्तान, वेस्टइंडिजला जमलं नाही ते नेपाळने केलं..

टी-२० क्रिकेट म्हणलं की भारत, इंग्लंड, ऑस्ट्रोलिया, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, साऊथ ऑफ्रीका, न्यूझीलंड, श्रीलंका या दादा संघाचं नाव समोर येत. पण, मागच्या अनेक वर्षांपांसून स्वत:ला क्रिकेटच्या सर्वच फॉरम्याटमध्ये बादशहा समजणाऱ्या टीमला जे आत्तापर्यंत जमलं नाही, ते नेपाळच्या क्रिकेट टीमने करून दाखवलं. नेहमी खेळात सातत्य असणाऱ्या या काही टीम सोडल्या तर, क्रिकेटमध्ये इतर टीमानां लिंबू-टींबू समजलं जातं आणि त्यांना फारसं गांभीर्यानेही घेतलं जात नाही. असचं लिंबू टींबू समजली जाणारी टीम नेपाळ, नेपाळने टी-२० क्रिकेटमध्ये असे काही विश्वविक्रम केलेत ज्यामुळे जगभर नेपाळच्या क्रिकेट टीमची चर्चा सुरू  आहे.

नेपाळ क्रिकेट टीमची चर्चा का होत आहे? नेपाळ टीमने कोणते रेकॉर्डस आपल्या नावावर केले आणि कोणते रेकॉर्डस मोडले  जाणून घेऊया.

चीनमध्ये आशियाई गेम्सचं बिगुल वाजलं. आशियाई गेम्सच्या पुरुष टी-२० क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांची सुरवात झाली नेपाळ विरूध्द मंगोलिया. मंगोलियाने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात जर मंगोलियाच्या बाजुने कोणता निर्णय गेला असेल तर ते फक्त टॉस जिंकण्याचा. नेपाळकडून ओपनिंगला कुशल भुर्तेल आणि आसिफ शेख आले.

कुशल भुर्तेलने २३ बॉलचा सामना करत फक्त १९ रन्स केले आणि जमयनसुरेन याच्या बॉलवर अल्तानखुयाग याच्याकडे कॅच देत आऊट झाला. पहिली विकेट ४२ रन्सवर पडली आणि मंगोलियाचे ग्रहचं फीरले. त्यानंतर वनडाऊला आला कुशल मल्ला. कुशल मल्ला आणि आशिफ शेख चांगली बॅंटीग करत होते. पण, सातव्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला असिफ शेखही १७ बॉलमध्ये १६ रन्स करत एर्देनेबुल्गानच्या बॉलवर कॅच आऊट झाला आणि ६६ रन्सवर दुसरी विकेट गेली. त्यानंतर आला रोहीत पॉडेल. रोहीत पॉडेल आणि कुशल मल्लाने

सुरवातीपासुनच आक्रमक बॅटींग करत, कुशल मल्लाने आपली आक्रमक शैलीत छक्के आणि चौक्यांचा पाऊस पाडाला.

१८ बॉलमध्येच त्याने ५० रन्स पुर्ण केले. त्यानंतर तो असा काही खेळत होता, बॉलरला त्याची विकेट घ्यायची नव्हती. तर, फक्त त्याच्यासमोर आपली चांगली ओव्हर टाकुन बाजुला व्हायचं होतं. पण, शेवटी रेकॉर्ड करायचं मल्लाने मनावरच घेतलं होतं असचं म्हणावं लागेल. कारण फक्त ३४ बॉल खेळत त्याने आपलं शतक पुर्ण केलं. २७४ स्ट्राईक रेटने ५० बॉलमध्ये ८ चौके, १२ सिक्स मारत नाबाद १३७ रन्स पुर्ण केले.

मल्लाने टी-२० अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात फास्ट शतक करण्याचा रेकॉर्ड बनवला.

हा रेकॉर्ड बनवत त्याने रोहीत शर्मा, डेविड मिलर या दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं. याआधी हा रेकॉर्ड रोहीत शर्माच्या नावावर होता. रोहीत शर्माने २०१७ मध्ये श्रीलंका विरूध्द ३५ बॉलमध्ये शतक करण्याचा रेकॉर्ड केला होता. तसेच २०१७ मध्येच बांग्लादेश विरोधात डेविड मिलरनेही ३५ बॉलमध्ये आपलं शतक पुर्ण केलं होतं.

त्याच्या बरोबर खेळत असलेल्या रोहीत पॉडेलकडूनही मंगोलियाच्या बॉलरची धुलाई सुरू होती. २६ बॉलमध्ये ६ सिक्स, २ चौके मारत ६१ रन्सवर खेळत होता. १८ व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर अल्तानखुयागने त्याला ओल्गाोनबयारच्या हाताने कॅच आऊट केलं. १८ ओव्हरमध्ये २५९ एवढा विशाल स्कोर उभा राहीला. रोहीत पॉडेलच्या विकेटने थोडाचा सुटकेचा श्वास मिळाला असं मंगोलियाच्या टीमला वाटत असतानाचा, क्रीजवर आला दीपेंद्र सिंह ऐरेन.

दिपेंद्र सिंह ऐरेनने पहिल्या बॉल पासुनच सिक्स मारायला सुरवात केली. ५२० च्या स्ट्राईकरेटने फक्त १० बॉलमध्येच त्याने ५२ रन्स केले.

ज्यात त्याने आठ सिक्स मारले. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात फास्ट फीप्टी करणारा एकमेक खेळाडू म्हणून दिपेंद्र सिंह ऐरेनने आता पुढे आला आहे. या अगोदर युवराज सिंगचा सर्वात फास्ट १२ बॉलमध्ये फीप्टी करण्याचा रेकॉर्ड होता. २००७ च्या टी-२० विश्कवप दरम्यान त्यांनी हा विश्वविक्रम केला होता. याच सामन्यात युवराजने स्टुअर्ट ब्रॉडला एकाच ओव्हरमध्ये सलग ६ सिक्स ठोकले होते. पण, ऐरीनच्या धमाकेदार खेळामुळे युवराजचा फास्ट फीफ्टीचा रेकॉर्ड मोडला आहे.

कुशल मल्ला, रोहीत पॉडेल, दिपेंद्र सिंह ऐरेनने या तिघांच्या धमाकेदार खेळाच्या जोरावर ३१४ धावांचा विशाल डोंगर मंगोलियाविरुद्ध उभा केला. आत्तापर्यंत टी-२० अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगानिस्ताने आर्यलंड विरूध्द २७८ रन्स केले होते. जे आत्तापर्यंतचा सर्वात हाईस्ट स्कोर केला होता. पण, हा रेकॉर्ड मोडत नेपाळने आपल्या नावावर केलाय.

नेपाळने केलेल्या रन्सचा पाठलाख करण्यासाठी जेव्हा मंगोलियाची टीम मैदानात उतरली. तेव्हा फक्त ४१ रन्समध्येच त्यांची टीम ऑल आऊट झाली. नेपाळने हा सामना अनेक रेकॉर्डस आपल्या नाववार करत विजय मिळवला.

नेपाळने कोण कोणते रेकॉर्ड केले आणि कोणते रेकॉर्डस मोडले हे जाणून घेऊ.

टी-२० अंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जास्त सिक्स 

या सामन्यात नेपाळ संघाने मिळून तब्बल २६  सिक्स मारले. त्यामुळे एकाच आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात एकाच मॅचमध्ये मारण्यात आलेले हे सर्वाधिक सिक्स आहेत. यापूर्वी हा विक्रम अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्या नावावर होता. अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्ध २०१९ मध्ये, तर वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०२३ मध्येच प्रत्येकी २२ सिक्स मारले होते.

टी-२० मॅचमध्ये सर्वाधिक रन्स

नेपाळने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्याही उभारली. त्यांनी अफगाणिस्तान आणि चेक गणराज्य संघाचा विक्रम मोडला. अफगाणिस्तानने २०१९ मध्ये आयर्लंडविरुद्ध ३ बाद २७८ रन्स केल्या होत्या, तर चेक गणराज्यने २०१९ मध्ये तुर्कीविरुद्ध ४ बाद २७८  रन्स केल्या होत्या.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्सने विजय

नेपाळने २७३ रन्सने विजय मिळवत आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये रन्सच्या तुलनेतील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. यापूर्वी हा विक्रम चेक गणराज्य संघाच्या नावावर होता. त्यांनी २०१९ मध्ये तुर्कीविरुद्ध २५७ धावांनी विजय मिळवला होता.

सर्वात फास्ट शतक आणि अर्धशतकाचा रेकॉर्ड

दरम्यान, याच मॅचमध्ये दिपेंद्र सिंग ऐरेने केवळ ९ बॉलमध्ये त्याने अर्धशतक पूर्ण केल. त्यामुळे त्याने तब्बल १६ वर्षांपूर्वीचा युवराज सिंगचा आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील सर्वात फास्ट फिफ्टीचा विक्रम मोडला. युवराजने २००७ टी-२० वर्ल्डकपमध्ये १२ बॉलमध्ये फिफ्टी केली होती.

तसेच कुशल मल्ला याने ३४ बॉलमध्ये शतक केल्याने त्याने डेव्हिड मिलर, रोहित शर्मा आणि सुदेश विक्रमसेकरा यांच्या आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात फास्ट शतक करण्याच्या विक्रमाला मागे टाकले. यापूर्वी मिलर, रोहित, सुदेश यांच्या नावावर शतकाचा विक्रम होता. या तिघांनीही ३५ बॉलमध्ये शतक केलं होतं.

आता तुम्ही म्हणाल सर्वात फास्ट फिफ्टी करून युवराजचा रेकॉर्ड मोडला, सर्वात जास्त रन्स टी-२० अंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये करण्याचा रेकॉर्ड केला, सर्वात फास्ट टी-२० शतक केलं, सर्वाधिक सिक्स मारले पण, समोरची टीम कोणती होती तर, तीच लिंबू-टींबू असणारी मंगोलिया. पण, मंडळी टीम कोणतीही असुद्या क्रिकेटमध्ये चर्चा होते ती रेकॉर्डसची आणि इतिहासात नोंद होते, तीही रेकॉर्डसचीच. त्यामुळे नेपाळने खेळलेल्या गेमची दखल तर इतिहासाने घेतली आहे. बाकी क्रिकेट म्हणलं कि रोज नवे रेकॉर्डस बणणार आणि मोडणारही.

हे ही वाच भिडू: 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.