टोक्यो ऑलिम्पिकमध्ये खरंच मॅच फिक्सिंग झालंय का ?

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताची आघाडीची टेबल टेनिसपटू मनिका बत्रा ला पराभव स्विकारावा लागला होता. मात्र तिचा हा पराभव लोकांच्या जास्त लक्षात राहिला नाही मात्र एक विषय मात्र चांगलाच चर्चेत आला आणि अजूनही चर्चेतच आहे. 

तर मनिका आणि भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांच्यातील वाद हा हे खरं कारण होतं चर्चेत येण्याचं.. चालू सामन्यात मनिकाने रॉय यांचा सल्ला ऐकण्यास नकार दिला होता आणि प्रकरण समोर आलं ..

तिने असं का केलं म्हणत तिला चौकशीला देखील सामोरे जावे लागतं आहे तेंव्हा तिने झालेला प्रकार सर्वांसमोर आणला. 

मनिका बत्राने आरोप केला आहे की,

राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांनी तिला मार्चमध्ये झालेल्या ऑलिम्पिक पात्रता दरम्यानच्या सामन्यात हरण्यास सांगितले होते, असा धक्कादायक खुलासा तिने केला होता.  आणि म्हणूनच तिने टोकियो ऑलिम्पिकमधील एकेरी स्पर्धेत रॉयची मदत घेण्यास नकार दिला होता.

टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या कारणे दाखवा नोटीसला मनिकाने उत्तर दिलं,

मनिकाने म्हणतेय कि, ” रॉयची मदत नाकारून मी खेळाच्या प्रतिष्ठेला कसल्याही प्रकारचा धक्का पोहचवला नाही. मला ज्या व्यक्तीने मॅच फिक्सिंगसाठी विचारले त्याचं व्यक्तीसोबत मी प्रशिक्षक म्हणून बसले असते तर मी माझ्या सामन्यावर फोकस करू शकली नसती”.

“शेवटच्या क्षणी राष्ट्रीय प्रशिक्षकाशिवाय खेळण्याचा माझा जो निर्णय होता त्यामागे आणखी एक गंभीर कारण होते.” राष्ट्रीय प्रशिक्षकाने मार्च २०२१ मध्ये दोहा येथे पात्रता स्पर्धेत त्याच्या प्रशिक्षणार्थीविरुद्धचा सामना हरण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला होता, जेणेकरून तो ऑलिम्पिकसाठी पात्र होऊ शकेल…

थोडक्यात रॉय यांनी मॅच फिक्सिंगसाठी दबाव टाकला आणि मी त्यांना बळी पडले नाही.

मनिका म्हणाली, मी त्यांना कोणतेही उत्तर दिले नाही आणि लगेच रॉय यांच्या अशा वागण्याचा मी वेळीच या प्रकारची माहिती फेडरेशन च्या अधिकार्यांना सांगितली होती. मात्र, त्यांच्या दबावामुळे आणि धमक्यामुळे माझ्या खेळावर परिणाम झाला.

रॉय आपली बाजू मांडतील.

खेळाडूपासून प्रशिक्षक बनलेल्या रॉय यांना सध्याच्या राष्ट्रीय शिबिरापासून दूर राहण्यास सांगितले आहे. टीटीएफआयने रॉय यांना आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. रॉय हे कॉमनवेल्थ गेम्स सांघिक स्पर्धा सुवर्णपदक विजेते आहेत ज्यांना अर्जुन पुरस्कारही मिळाला आहे.

रॉय यांच्यावर आरोप आहेत. त्यांना उत्तर देऊ द्या. त्यानंतरच आम्ही पुढचा निर्णय घेऊ. टीटीएफआयचे सचिव अरुण बॅनर्जी म्हणाले. 

“माझ्याकडे या सर्व घटनेचे आणि मी जे काही सांगितले त्याचे पुरावे आहेत जे मी योग्य वेळी सादर करेन”

पुणे मानिकाने असंही सांगितलं आहे कि, “राष्ट्रीय प्रशिक्षक माझ्या हॉटेलच्या रुममध्ये आले आणि मला सामना हरण्यास सांगितले.  आणि याच विषयावर माझ्याशी त्यांनी सुमारे २० मिनिटे बोलले. त्यांनी अनैतिकरित्या त्यांच्या प्रशिक्षणार्थीला समोर नेण्यासाठी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला जी त्यावेळी त्यांच्यासोबत आली होती”

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.