यंदाच्या ऑलिम्पिकमधली पदके जपानी लोकांनी केलेलं इलेक्ट्रॉनिक रिसायकलिंग आहे.

ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की, आपण एक तरी पदक जिंकून देशाची मान उंचावावं. सध्या टोकियोमध्ये ऑलिम्पिक २०२० चालू आहे. सगळ्या जगाचे लक्ष या ऑलिम्पिककडे लागले आहे.  स्पर्धेत कोणत्या देशांचे किती खेळाडू, पदकं जिंकतात यावर सर्वांचीच नजर आहे.

खेळाडूंचं स्वप्न असलेली हि पदकं नेमकी कुठे बनतात, त्याचा इतिहास काय ?

ही पदकं कशापासून बनलेली असतात, ती खरंच सोन्याची असतात का ? असे अनेक प्रश्न सगळ्यांनाच पडतात. ऑलिम्पिक प्रेमींना या पदकांबाबतीत खूप कमी माहिती असते मात्र आज आपण त्याच बद्दल  जाणून घेणार आहोत.

फक्त ५ हजार लोकसंख्येंच्या गावात २७ ऑलिम्पिक मेडल आहेत

आत्ता देण्यात येणारी सुवर्ण पदके हि पूर्णतः सोन्याची नसतात.

सध्याची सुवर्णपदकं चांदीची असतात आणि त्यावर सोन्याचं फक्त पॉलिश केलेलं असतं.

पण पूर्वी म्हणजेच १९१२ मध्ये स्टॉकहोममध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेपर्यंत तरी सुवर्णपदकं दिली जायची ती  पूर्णतः सोन्यापासून बनविलेली असायची. मात्र त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नियमांनुसार सुवर्णपदकांची निर्मिती केली जात आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक देण्यात येत असून ही परंपरा १९०४ मध्ये सेंट लुईस गेम्समध्ये सुरू झाली होती. अ‍ॅथेरसमध्ये १८९६ पासून ते अ‍ॅमस्टरडॅममध्ये १९२८ पर्यंत हे पदके देण्याची परंपरा पार पाडली.

प्रत्येक खेळांसाठी देण्यात येणारी पदके हि वेगवेगळी असतात.

सद्याच्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर,

यंदा टोकियो आयोजन समितीने पदकांची निर्मिती करण्यासाठी संपूर्ण जपानमधून वापरलेले मोबाईल फोन सारख्या लहान इलेक्ट्रॉनिक उपकरणे गोळा करण्यासाठी “टोकियो 2020 पदक प्रकल्प” आयोजित केला होता. हा प्रकल्प टोकियो २०२० मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील प्रथमच असा प्रकल्प ठरला जो नागरिकांचे सहभाग पदकांच्या उत्पादनात सामील झाला आहे आणि विशेष म्हणजे  वापरलेल्या जुन्या धातूंचा वापर करून या टोकियो पदकांची निर्मिती केली गेली आहे.

इलेक्ट्रॉनिकचं रिसायकलिंग करून यंदाची पदकं तयार केली आहेत.

या वर्षीच्या पदकांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे धातू हे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचं रिसायकलिंग करून मिळवले गेले आहेत.  यासाठी जपानमधून ७८ हजार ९८५ टन वजनाची इलेक्ट्रॉनिक उपकरणं गोळा केली गेली.  यामध्ये ६२ लाख मोबाईलचा देखील समावेश होता.

संपूर्ण जपानमधील लोकांनी योगदान देऊन सुमारे ५ हजार पदके तयार केली गेली आहेत.

टोकियोने  २०२० च्या पदकांसाठी डिझाईन आयडिया सादर करण्यासाठी जनतेला आमंत्रित करत पदक डिझाईनची स्पर्धा आयोजित केली होती. टोकियो २०२० च्या पदकांची रचना Junichi Kawanishi यांनी केली होती.

तर या पदकांच्या रिबनमध्ये देखील लेटेस्ट प्रकारच्या आहेत.

जपानचे इचिमात्सु मोयो आणि कासाणे नो इरोम यांनी पारंपारिक किमोनो लेयरिंग तंत्र वापरले आहेत आणि त्यावर पारंपारिक जपानी आकृत्या वापरल्या आहेत.

रिबनच्या पृष्ठभागावर सिलिकॉन उत्तल रेषा लावल्या जातात जेणेकरून कोणीही पदकाचा प्रकार त्याला फक्त स्पर्श करून ओळखू शकतील. पॉलिस्टर फायबर ला उत्पादन प्रक्रियेदरम्यान रासायनिकरित्या रीसायकल करून वापरले गेले आहे.

टोकियो २०२० ऑलिम्पिकच्या पदकांची रचना टोकियोच्या पारंपारिक प्रतीकातून प्रेरित आहे.

प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये यश मिळवलेल्या ऑलिम्पियन लोकांना त्यात आदरांजली वाहिली आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.