पोरांच्या क्लास फी साठी कर्ज देऊन बायजुने मोठा फ्रॉड केलाय..

क्लासवाले शाळेला कधी पर्याय झाले हे कळलंच नाही. बाजूची ताई खूप हुशार आहे ,जा तिझ्याकडं! ती सांगेल समजवून इथून प्रवास सुरु झाला. मग ताईकडे हळू हळू अजून पोरं पण शिकायला येऊ लागली. मग ताईंनं पैसे घ्यायला सुरवात केली. इथून माझी खाजगी ट्युशनची सुरवात झाली.

आता तर कळतंय क्लासच्या फी एवढ्या वाढल्यात की क्लासवालेच फी भरायला कर्ज द्यायला लागलेत. 

BYJU’S ऑनलाईन क्लास घेणारी कंपनी हि असंच कर्ज देते.  होय बरोबर वाचताय तुम्ही हि कंपनी चक्क त्यांचा कोर्से घायला कर्ज देते.

या कंपन्यांवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाहीए. काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम याबाबतीतच संसदेत प्रश्न विचारले होता.

” काही ऑनलाइन शैक्षणिक कंपन्यांची किंमत अब्जावधी डॉलर्सच्या घरात गेली आहे. त्यातील काहींची किंमत तर भारताच्या संपूर्ण शैक्षणिक बजेटपेक्षाही जास्त आहे.  मात्र या कंपन्या जे ऑनलाइन कोर्सेस ऑफर करतात त्याची कोणीच तपासणी करत नाही”

असा आरोप कार्ती चिदंबरम यांनी संसदेत केला. त्यांनी या कंपनीचे काही एजन्ट लोकांना कसे कोर्स घेण्यासाठी गंडवतात, त्यांना पूर्ण माहिती न देता कोर्सेला ऍडमिशन घ्यायला लावतात याचा पाढाच वाचला. त्यांनी आपल्या भाषणात या कंपन्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या काही जणांची नावे घेतली त्यातील एक नाव होते निधी बहुगुणा.

निधी बहुगुणा यांनी असंच एक BYJU’Sचं प्रकरण बाहेर काढला होतं.त्यांनी ट्विटर यावर मोठा थ्रेडच लिहला होता.  त्यांनी लिहलं होता मसुरीमध्ये BYJU’S ने गरीब मुलांना बरोबर ओळखून त्यांच्यासाठी दिवसभर एक शिबिर आयोजित केले होते. माझ्या घरातील मोलकरीण जी तिच्या मुलीसाठी शाळेचे  400 रुपये फी भरू शकत नाही तिनंही या कार्यक्रमला हजेरी लावली होती. 

शाळा आपल्या मुलीला लॅपटॉप देणार आहे अशी ती मोलकरीण या कार्यक्रमांनंतर घरी परतल्यांनंतर निधी यांना सांगत होती.

त्या शाळेतील शिबीरात आलेल्या व्यक्तीन माझ्याकडून  नवऱ्याचे बँक अकाउंट डिटेल्स , पॅन कार्ड डिटेल्स आणि ब्लॅक चेक जमा करून घेतले असा हि घरकाम करणाऱ्या बाईनं निधी याना सांगितलं. मग निधी बहुगुणा यांनी पुढे चौकशी केली असता BYJU’Sच्या एजन्टनं त्या बाईच्या नवऱ्याचा नावानं कर्ज घेतल्याचंही निधी यांच्या लक्षात आला. पुढे मग निधी यांनी प्रयत्न करून हे कर्ज रद्द करायला भाग पाडलं. 

निधी यांच्यकडे घर काम करणाऱ्या बाईच्या नवऱ्याचा नावावर थोडा थोडकं नव्हे तर ३५००० हजार रुपयांचा कर्ज काढण्यात आलं होता. हे कर्ज त्यांना २२०० रुपये महिना हफ्त्याने २४ हफ्त्यात म्हणजे दोन वर्षात फेडायचा होता. त्यांना २ वर्षांत ३५हजार रुपयांचे ५२हजार ८०० रुपये द्यावे लागणार होते. मात्र निधी यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांची पिळवणूक वाचली होती. 

पुढे BYJU’S न कर्ज रद्द करून त्यांच्या मोलकरणीच्या मुलाचं ऍडमिशनही रद्द केलं.

मात्र अशी निधी बहुगुनांसारखी मदत सगळ्यांनाच भेटत नाही. त्यामुळं अशा लोकांची पिळवणूक टाळण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी आता करण्यात येत आहे. कोरोनामुळं लागलेल्या लॉकडाऊनमुळं शाळा बंद झाल्या होत्या त्याचाच फायदा घेऊन या ऑनलाईन क्लासवाल्यानी आपला व्यवसाय वाढवलाय. शाहरुख खान  ब्रँड अँबेसेडर असलेल्या  BYJU’S चा लोगो तर भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर हि झळकला होता. त्यामुळं बिलियन डॉलर भांडवल झालेल्या कंपन्यांना आता कायद्याच्या चौकटीत आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 

Webtitle : Byjus loan fraud : Kartik Chidambaram raised issue about Byjus loan fraud

Leave A Reply

Your email address will not be published.