नवाझला सेनेच्या आंदोलनामुळे स्टेज सोडावं लागलं त्यानेच बाळासाहेबांच्या भूमिकेला न्याय दिला.

उत्तर भारतातल्या गावागावात रामलीलाची नाटिका बसवली जाते. अनेक हौशी कलाकार यानिम्मिताने एकत्र येतात. रामसीता हनुमानची कथा नाटकाद्वारे सादर करतात. प्रेक्षक भक्तिभावाने तल्लीन होऊन या रामलीलेचा आनंद घेतात. रामलीला एक उत्सव असल्यासारखाच असतो.

अशीच युपीच्या बुधना गावची रामलीला. कित्येक वर्षांची या रामलीलेला परंपरा आहे. अनेक छोट्या कलाकारांना आपली कला सादर करायचा इथे संधी मिळाली आहे. आजूबाजूच्या गावातून हजारो लोक हि रामलीला बघायला येतात. 

अशातच एक छोटा मुलगा होता. दरवर्षी अनिमिष नेत्राने हा सगळा उत्सव बघायचा. त्याला सुद्धा बुधनामधल्या  रामलीलामध्ये काम करायचं होत. पण आपल्या सामान्य रुपामुळ आपण अभिनय करू असा आत्मविश्वास त्याला नव्हता. तरीही रामलीलेत काम करायचं त्याचं स्वप्न होत.

पुढे कॉलेज झालं,नोकरी शोधायसाठी दिल्लीला आला. दिल्लीमध्ये कायम सुरु असणाऱ्या नाट्यचळवळीकडे त्याला खेचून घेतलं. त्याला आपल्यामधल्या अभिनय क्षमतेचा शोध लागला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये प्रवेश मिळाला.

नवाज पुढे स्वप्नांची नगरी मुंबईमध्ये आला. बारा वर्षे कोणालाच पटणार नाही असा भयंकर स्ट्रगल केला. आणि एक दिवस बकग्राउंड आर्टीस्टपासून हिरोचा रोल मिळाला. त्याच भरपूर कौतुक झालं. अनेक मानसन्मान पुरस्कार मिळाले. मोठमोठ्या कलाकारासोबत काम करयाची संधी मिळाली. सामन्य दिसणारा हा पोरगा बॉलीवूडचा स्टार झाला. सगळ्यांना वाटलं बेट्याच स्वप्न पूर्ण झालं.

पण त्याच स्वप्न अपूर्ण होत. भारतातले नामंकित दिग्दर्शक आपल्या बिग बजेट सिनेमामध्ये त्याला साईन करण्यासाठी त्याच्या दाराबाहेर उभे होते आणि त्याला काम करायचं होत आपल्या गावातल्या रामलीलेत. तुम्हाला अंदाज आलाच असेल कथा आहे नवाजुद्दीन सिद्धीकीची.

नवाज स्टार झाला होता पण त्याचं रामलीलेमध्ये काम करण्याच स्वप्न अधुर होत. एक दिवस त्याला ही संधी चालून आली. बुधना रामलीला कमिटीने त्याला यावर्षीच्या रामलीलामध्ये मारीच राक्षसाचा रोल करणार का विचारले.  नवाजचे हात स्वर्गाला टेकले. तो फक्त तयार झाला नाही तर शुटींगच्या तारखा अॅडजस्ट करून तो नाटकाच्या तालमीला सुद्धा हजर झाला.

आपलं स्टारपण मुंबईत ठेवून रामलीला मंडळीबरोबर मेहनत घेऊ लागला.

पण रामलीला सादर करायच्या दिवशी एक गोंधळ झाला. शिवसेना आणि बजरंग दलच्या सैनिकांनी मुसलमान कलाकाराला रामायणासारख्या पवित्र कथेत काम करू देणार नाही म्हणून निदर्शने दिली. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश शर्मा यांनी सांगितलं,

“गेली पन्नास वर्षे कधीच कोण मुस्लीम रामलीलेच्या स्टेजवर चढला नाही आणि यानंतरही आम्ही असे होऊ देणार नाही.”

दुर्दैवाने रामलीला कमिटीला शो कॅन्सल करावा लागला. नवाजला माध्यमांनी विचारलं असता त्याने संयत प्रतिक्रिया दिली. “शांतेतेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे यावर्षी मला प्रशासनाने माघार घ्यायला सांगितलं आहे.”  परत रामलीला मध्ये काम करणार का अस विचारलं असता तो म्हणाला,

“मुझे फिल्म इंडस्ट्री में काम मिलने के लिये बारा साल लगे. रामलीला तो मेरा बचपनसे सपना रहा है. मै हार मानने वाला नहीं.अगले साल जरूर आऊंगा और काम करुंगा . “

बुधनाच्या असंख्य प्रेक्षकांना जगभर झेंडा गाड्णाऱ्या आपल्या सुपुत्राला रामलीलेत पाहता आले नाही म्हणून हळहळ वाटली.

आता मात्र पुलाखालून बरच पाणी गेलं. नवाझुद्दीन चक्क बाळासाहेब ठाकरे भूमिकेच चमकला. तरिही एक गोष्ट आठवतच राहते ते म्हणजे, ज्या नवाजला एकेकाळी शिवसेनेच्या आंदोलनामुळ स्टेज सोडायला लागलं होत तोच नवाज आज शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेत अख्खा महाराष्ट्र हलवून सोडला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.