आम्ही ढिंच्याक पुजाचं गाणं ऐकून पाहिलं, त्यानंतर काय झालं हे सांगतो…

एक धक्कादायक बातमी…..ढिंच्याक पूजाचं डोकं सुन्न करणारं नवीन गाणं आलंय मित्रांनो…त्या गाण्याचं नाव आहे “मैं हूं बाइकर, मोटे थोड़ी डाइट कर” 

“ढिंच्याक पूजा, नाम तो सुना ही होगा???? यह संगीत की दुनिया का वो नाम है, जिसके गाने सुनने से लोग खौफ खाते हैं। जी हां, जब बच्चा रोता है ना, तो मां कहती है बेटा सो जा, वरना ढिंच्याक पूजा का गाना सुना दूंगी! फिर क्या बच्चा सो जाता हैं…”

पूजाचं गाणं म्हणजे सुरेल, सुमधूर आवाजाचा संगम… ‘सेल्फी मैने लेली आज’, ‘दिलो का स्कूटर’ आणि ‘आफ्रीन फातिमा बेवफा है’ आणि यानंतर नवीन आलेल्या गाण्याचं नाव आहे “मैं हूं बाइकर, मोटे थोड़ी डाइट कर”. 

असो आत्ता नवीन आलेलं  “मैं हूं बाइकर, मोटे थोड़ी डाइट कर” हे गाणं ऐकून माझा मानवी जन्म कृतकृत्य झाला असं वाटलं…

आय ऍम अ बायकर, जैसे कोई टायगर.

मोटे थोडी डाएट कर… (बॉडीशेमिंग?)

तू भी मुझे लाइक कर…

जिम जाया कर.. जंकफूड मत खाया कर, बॉडी बनाया कर, दोस्तो को मिलाया कर,

रेड लाईट पे रोका कर पीछे से ना ठोका कर… (ट्रैफिक रुल्सच्या पक्क्या आहेत पूजा मॅडम)

आधीच कोरोना, डेल्टा, ओमिक्रॉनचं संकट कमी होतं का कि त्यात मी हे गाणं ऐकलं..तुम्ही पण हे गाणं सुरुवातीपासून ते शेवट्पर्यंत ऐका मग तुम्हाला ना कोरोनाची भीती वाटेल ना ओमिक्रॉनची.. 

तुम्ही देखील हे गाणं बघा त्याची लिंक आम्ही खाली दिली आहे. पण या गाण्याचा व्हिडीओ स्वतःच्या जबाबदारीवर पहा काही बरं वाईट झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही ! 

ढिंच्याक पूजाने १५ जानेवारीला हा व्हिडीओ आपल्या युट्युब चॅनेलवर अपलोड केला होता. पण मॅडमांनी व्हिडीओवरील लाईक, डिसलाईक आणि कमेंट सेक्शन बंद केलेला आहे. या गाण्यात ढिंच्याक पूजा एखाद्या कुल बाईक रायडरसारखं ब्लॅक लेदर जॅकेट, गळ्यात पितळेच्या चैनी फूल स्वॅगमध्ये बाईकवर स्वार झालेली दिसतेय. आजूबाजूला मुलं तिच्या बाजूने बाईक चालवत आहेत.

मागे तिचं १५ सप्टेंबर २०२१ ला आणखी एक गाणं आलेलं, 

Image

जाऊ मैं प्लेन में,  हा, हा, जाऊ मैं प्लेन में,

प्लेन मैं दो द्वार आगे, पीछे भी दो द्वार है,

पायलट उड़ाता प्लेन है, एयर होस्टेस उसमें तीन है.

जाऊ मैं प्लेन में, प्लेन की सवारी मस्त है

ढींचक पूजा मेरा नाम है, गाना सुनाके सबको पकाना मेरा काम है। हान हान…. जाऊ मैं प्लेन में…

कोण आहे हि ढिंच्याक पूजा ???

ढिंच्याक पूजाचं खरं नाव पूजा जैन….. तिने स्वतःच स्वतःचं नाव ‘ढिंच्याक’ या शब्दाची निवड खुद्द पूजानेच केली असून, यातून तिने एक वेगळी ओळख मिळवली आहे. तिला कुणीतरी म्हणालं ती चांगली गाते आणि मग काय तेंव्हापासून पूजा पॉप संगीतप्रकारात ‘ढिंच्याक’ क्रांती घडवण्यासाठी मैदानात उतरली. तिच्या गाण्यात ना अर्थ असतो ना सूर ना ताल…. तरीही सोशल मीडियावर तिच्या नावाची हवा खूप आहे. त्यातून ती बक्कळ कमवते, फक्त ‘सेल्फी मैने ले ली आज’ या एका गाण्याने तिला सात लाख रुपये मिळवून दिले होते.

सोशल मीडियावर ढिंचॅक पूजा म्हणून प्रसिद्ध झालेली तिला इतकी प्रसिद्धी मिळाली होती की, तिला बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती.

पण पूजासारख्या कलाकार व्यक्तीच्या यशामध्ये अनेक अडचणी आल्या होत्या…कोणत्या ?

तर मागे एकदा पूजा सोबत एक अशीही घटना घडली कि, तिच्या युट्युब वरून तिच्या गाण्याचे सगळे गाणे डिलीट झाले होते. एका कटप्पा सिंग (नाव बदललेले) नावाच्या माणसाने ढिंच्याक पूजा विरोधात रिपोर्ट केल्यानंतर हे सगळे व्हिडीओ युट्युब वरून ताबडतोब उडवण्यात आले होते. पूर्ण प्रकरण जरी समोर आलं नसलं तरी अशी सोशल मीडियावर चर्चा होती कि, युट्युबच्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार, जर कुणीही तुमच्या परवानगी शिवाय तुमचा व्हिडीओ युट्युबवर अपलोड केला तर तुम्ही त्याविरोधात तक्रार करू शकता. तसेच काहीतरी या कट्टप्पा सिंग ने तक्रार केली असावी कदाचित कट्टप्पा सिंग ढिंच्याक पूजाच्या व्हिडीओमध्ये कुठे तरी अनावधानाने दिसले असावे…

एवढंच नाही तर तिच्या ‘दिलो का शुटर है मेरा स्कुटर’ या फेमस गाण्यावरून ती ट्रोलही झाली होती. या गाण्यात ती व्हेस्पा स्कुटर चालवताना दिसतेय. पण झालं असं कि, या गाण्यात स्कुटर चालवताना तिनं हेल्मेट घातलंच नाही. त्यात पूजा दिल्लीच्या रस्त्यावर मोठ्यामोठ्यानंदंगा करत गाणी म्हणतेय अन हीच बाब ध्यानात घेऊन मोहित सिंह नावाच्या एका भल्या गृहस्थांनी दिल्ली पोलिसांकडे ट्विटरवर ट्विट करून तक्रार केली  होती. 

असो यशाच्या मार्गात अशा अनेक अडचणी येत राहिल्या पण पूजा ने त्यावर मात करत एक आत्ममग्न गायिकेचा पुरस्कार मिळवला तेही श्रोत्यांच्या कानावर पाय देऊन..

तुम्ही पण पूजाचे फॅन्स असाल तर तिच्यासाठी काही प्रतिक्रिया असतील आमच्या कमेंटबॉक्स मध्ये नक्की लिहा…पण अगदी सभ्य भाषेत.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.