निरमाच्या पॅकेटवर असणारी ही मुलगी कोण होती माहित आहे का?

निरमा पावडरची ‘वॉशिंग पावडर निरमा’ ही जाहिरात आपल्यापैकी बहुतेकांना आठवत असेलच. पण या जाहिरातीतील निरमा पावडरच्या पॅकेटवर असणारी मुलगी नक्की कोण होती आणि त्या पॅकेटवर तीचाच फोटो का वापरण्यात आला याविषयी आपल्याला माहिती असण्याची शक्यता विरळच. निरमाच्या पॅकेटवर ही मुलगी येण्यामागे एक अतिशय भावनिक स्टोरी आहे. जाणून घेऊयात ही मुलगी नेमकी कोण होती आणि निरमाच्या पॅकेटवर तीचा फोटो वापरण्यामागची गोष्ट…!!!

निरमाच्या पॅकेटवर असणारी ही मुलगी म्हणजे ‘निरुपमा पटेल’.

निरमा कंपनीचे मालक करसनभाई पटेल यांची मुलगी. प्रत्येक बापाची असते तशीच निरुपमा ही देखील करसनभाईची जीव की प्राण. आपल्या मुलीने शिकून-सवरून खूप मोठ्ठ व्हावं आणि खूप नांव कमवावं, अशी करसनभाईची इच्छा. पण नियतीला मात्र हे मंजूर नव्हतं. एका अपघातात निरुपमा हिचा मृत्यू झाला आणि करसनभाईना धक्काच बसला.

karasanbhai
करसनभाई पटेल

हळूहळू मुलीच्या मृत्यूच्या धक्यातून करसनभाई सावरले आणि त्यांनी एक निर्णय घेतला. आपल्या मुलीबाबतीत आपण जे स्वप्न पाहिलं होतं, ते सत्यात उतरविण्याचा निर्णय. मुलीचं नांव खूप खूप मोठ्ठ होईल यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय. त्यातूनच त्यांनी १९६९ साली कपडे धुण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पावडरची निर्मिती सुरु केली आणि या पावडरला त्यांनी नांव दिलं ‘निरमा पावडर’ करसनभाई निरुपमा हिला प्रेमाने ‘निरमा’ म्हणून हाक मारत असत.  म्हणूनच त्यांनी आपल्या मुलीच्या नावावरून ‘निरमा’ हे नांव ठेवलं.

कोण होती ‘लक्स’च्या जाहिरातीत झळकलेली पहिली भारतीय अभिनेत्री..?

करसनभाईनी सुरु केलेली ही कंपनी म्हणजे सुरुवातीच्या काळात तरी एकखांबी तंबुच होती. करसनभाई स्वतः पावडरची निर्मिती करत होते आणि स्वतःच आपल्या सायकलवरून लोकांच्या घरोघरी घरोघरी जाऊन निरमा पावडर विकत होते. बाजारपेठेतील महागड्या पावडरच्या तुलनेत निरमा पावडरची किंमत त्यांनी अतिशय कमी ठेवली होती. त्यामुळे अल्पावधीतच त्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळायला लागला.

त्यानंतर कंपनीच्या विस्ताराच्या दृष्टीने करसनभाई यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. सुरुवातीच्या काळात ‘एकला चलो रे’ धोरण स्वीकारलेल्या करसनभाईनी मग स्वतःची एक टीम तयार केली आणि त्यामाध्यमातून काम सुरु केलं. आता निरमा हा मोठा ब्रांड होऊ लागला होता. तो घराघरात पोहचू लागला होता. मग बाजारातल्या इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी करसनभाईनी ‘निरमा’ची टीव्हीवर जाहिरात करायचा निर्णय घेतला.

‘वॉशिंग पावडर निरमा’ ही निरमाची जाहिरात जशी छोट्या पडद्यावर झळकायला लागली तसतशी निरमाची मागणी पहिल्यापेक्षाही अधिक वाढायला लागली. यापूर्वी जिथे दुकानदारांकडे जाऊन पावडर विकायला लागत असे, तीथे या जाहीरातीनंतर थेट दुकानदारांकडूनच पावडरसाठी मागणी येऊ लागली. काही दिवसातच निरमाने बाजारपेठेवर आपला ताबा मिळवला आणि कपडे धुवण्याची पावडर म्हणजे निरमा असं समीकरणच झालं. आजही अनेकवेळा जेव्हा ग्रामीण भागात ‘सर्फ एक्सलचा निरमा’ किंवा ‘टाइडचा निरमा’ दुकानदारांकडे मागितला जातो, त्यावरूनच ‘निरमा’ नावाचा ब्रांड लोकांच्या डोक्यात किती घर करून बसलाय याची प्रचीती येते.

Leave A Reply

Your email address will not be published.