“हिजाब” चूक की बरोबर ? हि दोन उदाहरणं वाचली की उत्तर मिळेल..

त्या दोन्ही महिलाच. एक अमेरिकेत राहणारी आणि एक इराकमध्ये राहणारी. दोघींना हिजाब/बुरखा मुळे प्रश्न निर्माण झाला. दोघींने वेगवेगळी उत्तरे शोधली. 

पहिली गोष्ट अमेरिकेच्या नजमा खानची. 

वयाच्या ११ व्या वर्षी बांगलादेशातील असंतोषामुळे ती कुटुंब सोबत आपल्या चांगल्या भविष्यासाठी अमेरिकेला आली. तेव्हा तिच्या वडिलांकडे फक्त १० डॉलर होते. नजमा च्या शिक्षणावर काही परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी तिला शाळेत पाठवायला सुरुवात केली. तेव्हा तिला नीट इंग्लिश हि बोलता येत  नव्हतं. बांग्लादेशातून अमेरिकेत आलेली नजमा हि तिच्या शाळेत हिजाब घालून जाणारी एकमेव मुलगी होती. हिजाब घालून शाळेत येणाऱ्या मुलींनी तिला एक नवीन नाव पाडलं,

“बॅटमॅन”

ती शाळेतील मुलींसाठी चेष्टेचा विषय झाली. शाळेतील शिक्षकांनी वेगवेगळ्या प्रकारे मुलांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. शाळेच्या गेटवर नेहमीच दहा-पंधरा जणांना ग्रुप तिची वाट बघत बसायचा ती आली की तिला सर्वजण एकत्र येवून चिडवण्यास सुरवात करायचे. 

अशा वेळी आपल्या डोक्यावरुन हिजाब काढण्याचा विचार तिच्या मनात यायचा पण नजमा खान धार्मिक प्रवृत्तीची होती. तिला स्वत: हिजाब वापरणं हे योग्य वाटतं होतं. त्यामुळे तिने हिजाब सोडण्याचा निर्णय घेतला नाही. 

शाळेपासून कॉलेजपर्यन्त तिला हाच अनुभव येत होता. ती कुठेही गेली तरी तिला हिजाब वरुन टोमणे ऐकून घ्यायला लागत होते. अशातच अमेरिकेत 9/11 चा आत्मघाती हल्ला झाला. संपुर्ण जग या हल्यामुळे हादरलं होतं. या हल्यामुळे अमेरिकेसारख्या देशात लपून असणारा द्वेष बाहेर पडू लागला. तिच्या हिजाबमुळे तिचा धर्म ओळखला जावू लागला. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी तिला “लादेन” म्हणून हाक मारण्यात येवू लागलं. ती सांगते एका रात्री माझा हिजाब पाहून काहीजणांनी माझा पाठलाग केला. त्या रात्री मला हिजाब सोडू वाटला होता पण मला हिजाब माझ्या धर्माप्रमाणेच प्रिय वाटू होता. 

कॉलेज नंतर १ ऑक्टोंबर २०१० ला स्टनिंगहिजाब.कॉम नावाचं एक ऑनलाईन स्टोर चालू केलं. तिला प्रिय असणारा हिजाब विकण्यासाठी तीने हे ऑनलाईन स्टोअर सुरू केलं होतं. ऑनलाईन स्टोअरची जाहिरात झाली आणि तिला वेगवेगळ्या ठिकाणावरुन फोन येवू लागले. अशातच तिला एक मेल आला होता. १४ वर्षांची एक मुलगीने हिजाबमुळे शाळेत होणारा त्रास आपल्या मेलमधून मांडला होता. हळुहळु तिला वेगवेगळे मेल येवू लागले. एका महिलेने हिजाबमुळे आपल्याला जॉबवरुन काढून टाकल्याचं सांगितलं. 

सोशल माध्यमातून ती हिजाबमुळे येणाऱ्या अडचणींवर आवाज उठवू लागली. हळुहळु जगभरातून तिला मेल येवू लागले. यावर काय करता येवू शकत याच्या विचारात असतानाच तिला एक आयड्या सुचली. ती आयड्या होती, 

“जागतिक बुरखा दिनाची”

तिने २१ जानेवारी २०१३ ला worldhijabday. com अशी एक वेबसाईट बनवली आणि फेसबुक वर पेज बनवलं, आणि तिने महिलांना विनंती केली कि त्यांनी एक दिवस हिजाब घालावा. फक्त आठ दिवसामध्ये वेगवेगळ्या धर्मातील ६७ देशांमधून प्रतिसाद मिळाला. त्यात ज्यू, ख्रिश्चन,हिंदू, नास्तिक अशा अनेक धर्मांच्या महिलेचा त्यात समावेश झाला. त्यांनी डच, कुरेशियन, इंडोनेशियन अशा जगातल्या वेगवेगळ्या २३ भाषांमध्ये वर्ल्ड हिजाब डे चे पोस्टर्स बनवले.

१ फेब्रुवारी २०१३ पासून जागतिक हिजाब दिनाची घोषणा करण्यात आली. मला हिजाब घालायला आवडतं आणि त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही हे नजमाला सांगायचं होतं. 

आत्ता दूसरी गोष्ट इराणच्या शॉपरक. 

इराणमध्ये सौदी अरेबियाप्रमाणेच हिजाब वापरणं गरजेचं आहे. सार्वजनिक ठिकाणी एखाद्या महिलेनं हिजाब वापरला नाही तर दंड आणि शिक्षा अस स्वरुप इराणमध्ये आहे. शॉपरक इराणचीच. इराणमध्ये लादण्यात आलेल्या प्रथा तिला पटत नव्हत्या. पण यातूनही काहीतरी मार्ग निघेल या विचारात ती असायची. शॉपरकचं कुटूंब देखील होतं. नवरा आणि मुलगा अस ते छोटसं कुटूंब. 

हिजाब घालणाऱ्या शॉपरकने इराणच्या चौकात दोन मिनिटांची क्रांन्ती घडवून आली. 

नेहमीप्रमाणे ती तिच्या शहरातल्या एका चौकात गेली. तीने आपला हिजाब काढला आणि एका हाताने तो हवेत धरला. दूसऱ्या मिनिटाला पोलीस त्या ठिकाणी आले. तिला अटक करण्यात आली. समज आणि दंड ठोठावून तिला सोडण्यात आलं. पुढे तिने याचगोष्टीवरुन सोशल मिडीयावर आवाज उठवण्यास सुरवात केली. एकमागून एक महिला तिच्याशी जोडल्या जावू लागल्या. पोलीसांनी तीला पुन्हा अटक केली. तीन वेळा तिला अटक करण्यात आली. 

तिच्यावर खटला दाखल करण्यात आला. तिच्या अनुपस्थितीच तिला दोन वर्षाचा कारावास ठोठावण्यात आला. त्या वेळीच तीने इराणमधून पळून जाण्याचा निर्णय घेतला. एका रात्रीत आपल्या छोट्याशा पर्समध्ये जे बसेल ते घेवून तीने देश सोडला. ती तुर्कीत आली. तिच्यामागोमाग तिचा मुलगा देखील आला. आत्ता तिला कॅनडात जायचं आहे. बुरखा/ हिजाब मधून मोकळं व्हावं म्हणून तिची लढाई चालू आहे. 

आत्ता मुद्दा राहतो तो बुरखा/ हिजाब चुक की बरोबर या विचारांचा. या दोन उदाहरणांमधून इतकच दिसतं की स्वत:ला जे वाटतं ते त्यांनी केलं.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.