३० वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केलेल्या जहाजानं भारत-पाक युद्धात महत्वाची भूमिका बजावलेली

आपल्या देशाच्या संरक्षणात जितकी महत्वाची भूमिका आपल्या सैनिकांची असते, तितकीच महत्वाची भूमिका असते ती युद्ध सामग्रीची. अर्थात आपली लढाऊ शस्त्रे, विमान, जहाज यांची. त्यामुळेच आपल्या देशात एक पद्धत आहे कि, जेव्हा ती युद्ध सामग्री देशाच्या सेवेत दाखल होते,  तेव्हा मोठ्या सन्मानाने त्यांची एन्ट्री होते, आणि जेव्हा ती आपल्या सेवेतून रिटायर होतात तेव्हा तितक्याच सन्मानाने त्यांना निरोप दिला जातो.

नुकताच मेड इन इंडिया असलेलं म्हणजे स्वदेशी बनावटीचे मिसाईल कॉर्वेट्स मधलं पहिलं जहाज INS खुकरी ३२ वर्षांच्या आपल्या सेवेनंतर गुरुवारी निवृत्त झाले. आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये नौदल परंपरेचे पालन करत हा सोहळा पार पडला. या परंपरेनुसार सूर्यास्ताच्या वेळी राष्ट्रध्वज आणि नौदलाचे ध्वज उतरवून जहाजाला सेवेतून निरोप देण्यात आला.

‘इंडियन नेव्हल शिप खुकरी’ असं या INS खुकरीचे पूर्ण नाव होते. जवळपास ३२ वर्षांपूर्वी म्हणजे २३ ऑगस्ट १९८९ साली आयएनएस खुकरी या मिसाईलचा आपल्या नौदलात समावेश करण्यात आलेला. Mazagon Dock Shipbuilders ने जहाज बांधले होते. जे पश्चिम आणि पूर्व दोन्ही फ्लीट्सचा भाग आहे.

त्यावेळचे  संरक्षण मंत्री कृष्णचंद्र पंत यांनी मुंबईत या जहाजाचा नौदलात समावेश केला होता. दिवंगत कॅप्टन महेंद्र नाथ मुल्ला यांच्या पत्नी सुधा मुल्ला आणि संजीव भसीन यांना जहाजाचे पहिले कमांडिंग अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली. नंतर संजीव भसीन व्हाईस अॅडमिरल म्हणून निवृत्त झाले. देशाच्या सेवेदरम्यान जवळपास २८ कमांडिंग ऑफिसर्सनी या जहाजाचे नेतृत्व केले होते.

आपल्या या सेवेदरम्यान जहाजाने ६,४४,८९७ समुद्री मैलांपेक्षा जास्त अंतर कापलेय. जे पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतराच्या ३० पट असल्याचं बोललं जातंय. एका माहितीनुसार या जहाजाने ३० पेक्षा जास्त वेळा पृथ्वी प्रदक्षिणा घातलीये.

दरम्यान, १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ९ डिसेंबर १९७१ ला पाकिस्तानी पाणबुडी पीएनएस हँगोरने या जहाजाला जवळपास नष्टच केलं होत. १८ अधिकारी आणि १७६ नावाड्यांसोबत दीवच्या किनाऱ्यापासून ४० नॉटिकल मैल अंतरावर हे जहाज बुडाले. जहाजात असलेल्या सगळ्यांचीच मोठी तारांबळ उडाली होती. पण जहाजाचे तत्कालीन कॅप्टन कमांडर महेंद्र नाथ मुल्ला यांनी स्वत:ला वाचवण्याऐवजी आपल्या संपूर्ण क्रूला साथ दिली.

त्यांनी आपले लाईफ जॅकेट ज्युनियर अधिकाऱ्याला दिले आणि सर्व साथीदारांसह जहाजातून उतरण्याचे आदेश दिले. नंतर कॅप्टन मुल्ला यांना मरणोत्तर महाबीर चक्र प्रदान करण्यात आले. दोन्ही जहाजाचे कमांडर मनू शर्मा आणि लेफ्टनंट कुंदनमल यांना देशातील दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार मिळाला होता.

आयएनएस खुकरी बुडाल्यानंतर भारतीय नौदलाने ४८ तासांत कराची बंदर ताब्यात घेऊन बदला घेतला. या सर्व शूर योद्ध्यांच्या हौतात्म्यासाठी दीव येथे स्मारक उभारण्यात आलेय. या स्मारकाजवळ आयएनएस खुकरीचे छोटे मॉडेल काचेत ठेवण्यात आले आहे.

१५ डिसेंबर १९९९ रोजी भारतीय नौदलाचे तत्कालीन कमांडिंग-इन-चीफ, व्हाइस अॅडमिरल माधवेंद्र सिंग यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. या आयएनएस खुकरीचे नाव जिवंत ठेवण्यासाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्सने आयएनएस खुकरी या मिसाईलची निर्मिती केली होती.

दरम्यान, नुकताचं या INS खुकरीने आपल्या सेवेतून निवृत्ती घेतली. या निरोप समारंभात ईस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस अॅडमिरल बिस्वजित दासगुप्ता प्रमुख पाहुणे होते. यावेळी जहाजाचे काही सेवानिवृत्त आणि निवृत्त माजी कमांडिंग अधिकारीही उपस्थित होते. जहाज भारतीय लष्कराच्या गोरखा ब्रिगेडशी संलग्न होते. त्यामुळे  गोरखा ब्रिगेडचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल पीएन अनंतनारायण सुद्धा या निरोप समारंभात सहभागी झाले होते.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.