जॉनी सीन्सचं सोडा हा खरा जॉनी कमांडो,डॉक्टर, ऍस्ट्रॉनॉट असं सगळंच आहे

भिडूला अतरंगी शोधायची पहिल्यापासूनच सवय आहे. असंच स्क्रीन स्क्रोल करत असताना वाचण्यात आलं …’खऱ्या आयुष्यातील जॉनी सीन्स’.  आता जॉनी भाऊ जे व्हिडिओ मध्ये करतो ते काल्पनिक आहे एवढं तर पटलंय. पण आता जॉनीभाऊंना खऱ्या आयुष्यात कोणीतरी फाईट देतंय म्हटल्यावर अभिमानानं ऊर भरून आलं आणि मग लागलीच लिंक ओपन केली. आता लिंक ओपन कारण्यामागं भिडू स्वतः देखील एक माणूस आहे हे ही लक्ष्यात घ्या. 

गला सबका सुखता है प्यास सबको लगती है.

आता इथंपर्यंत काय लिहलंय यातलं तुम्हाला काडीचं पण समजलं नसंल तर टीव्हीवर पोगो चॅनेल आहे तो निवांत बघत बसा. बाकीच्यांनी पुढं चला.

तर आता ऐका लिंक ओपन केल्यावर पुढं काय झालं. पुढं जे होतं ते वाचून नुसता आ वासून उभा होतो. भिडू आता इथंच खरा ट्विस्ट आलाय आणि ट्विस्ट खरंच चांगलाय. जर टायटल वेगळं आणि खाली स्टोरी वेगळी असं  होणार असतं तर मी वेबसाईटला शिव्याच घालणार होतो. पण त्यांचं टायटल पण बरोबर होतं आणि स्टोरी पण . गंडले होते ते म्हणजे आमचे महान विचार.

सैनिक,डॉक्टर,अंतराळवीर ते अगदी प्लंबर असे सगळे रोल करताना आपण जॉनी सीन्सभाऊंना व्हिडिओत पाहिलंय. मात्र एक असा माणूस आहे त्याने हे सगळं खऱ्या आयुष्यात केलयं. त्याचं नाव आहे.

जॉनी किम. वयाच्या ३६व्या वर्षापर्यंत हा माणूस अमेरिकन नौदलात नेव्ही सील कमांडो, हावर्ड या जगप्रसिद्ध युनिव्हर्ससिटी मधून डॉक्टर आणि आता नासामध्ये ऍस्ट्रॉनॉट असं सगळंच झालंय.

जॉनी किम (३६) हा कोरियन अमेरिकन असून तो लॉस एंजेलिसमध्ये राहतो. त्यानं  पहिल्यांदा नौदलात शिपाई म्हणून काम केले. पुढे जेव्हा अमेरिकन सैन्य पश्चिम आशियामध्ये गेलं तेव्हा जॉनी इराक युद्धातही सहभागी झाला होता. युद्धातील त्याच्या कामगिरीसाठी त्याला अनेक मेडल्स सुद्धा मिळालेत.

मात्र जॉनी एवढयावरच थांबणार नव्हता.

इराक युद्धातून परत आल्यांनतर जॉनीनं मग थेट हावर्डमध्येच डॉक्टर होण्यासाठी प्रवेश घेतला. आणि मग डॉक्टर होण्याचं स्वप्नही त्याने आरामात पूर्ण केलं.

त्यांनतर जॉनीनं अमेरिकेतल्या विविध हॉस्पिटलमध्ये सेवा दिली. पण एवढयावरही भाऊंचा समाधान  कुठे होणार होतं. है जवानी है दिवाणी मधल्या कबीरा सारंखं जॉनीभाऊ उडना चाहते थे , गिरणा चाहते थे  बस्स रुकना नही चाहते थे. मग आता त्यांना थेट अवकाशात जाण्याचं वेध लागलं होतं.

मग त्या साठी जॉनी गेला नासात. जेव्हा जॉनी भाऊंचं नासामध्ये सिलेक्शन झालं तेव्हा 

जॉनी हे अमेरिकेच्या  सर्वोत्तम टॅलेंटपैकी एक आहे आणि अश्या माणसाला नासामध्ये सामावून घेणं नासासाठी अभिमानाची बाब आहे.

अशा शब्दात जॉनी किमचं नासाच्या अधिकाऱ्यांनी कौतुक केलं  होतं.    

आज जॉनी आपल्या या पराक्रमामुळं इंटरनेटवर तुफान व्हायरल झालायं. जॉनी किमच्या नावानं हजारो मोटिव्हेशनल व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील . तू एवढा सगळं अवघ्या ३६ वर्षात कसं काय मिळवलं ?असं विचारल्यावर जॉनी एकच उत्तर देतो ‘आपल्या स्वप्नांच्यामध्ये जेवढी पण संकटं येतील त्यांना फाट्यावर मारत पुढं जात राहायचं शेवटी गुलाल आपलाच असतोय’.

 

English Summary: Kim became an elite Navy SEAL team member after completing his training at Naval Special Warfare at Coronado and was assigned to SEAL Team 3. He served as a Special Operations Combat Medic, sniper, navigator, and point man spanning two deployments. Kim is also the recipient of a Silver and Bronze Star with valor. And although he may have taken a detour to college by enlisting after high school, Kim then went on to earn his bachelor’s degree in Mathematics at the University of San Diego in 2012.

Webtitle: Jony Kim a man who is navyseal doctor astronaut all this under age of 36

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.