भिडू ! भारतीय वंशाचा एक माणूस आता थेट चंद्रावर दिसू शकतो.
अलीकडेच ट्वीटरच्या सीइओ च्या पदासाठी भारतीय रितेश अग्रवाल यांची निवड झाली आणि लगेगच आपला उर अभिमानाने भरून आला..पण मित्रानो आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे आजच नासाने भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन यांची येत्या चंद्र आणि मंगळावरील मोहिमेसाठी निवड केली आहे.
होय. यूएस स्पेस एजन्सी नासाने आपल्या नेक्स्ट टार्गेट म्हणजेच मून मिशन साठी अलीकडेच १० नव्या अंतराळवीरांची निवड केली. ज्यामधील अर्धे लष्करी पायलट आहेत. एकूण सहा पुरुष आणि चार महिला या मोहिमेत असणारेत. यामध्ये भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन हे देखील आहेत. ४५ वर्षीय अनिल नासाच्या २०२१ च्या वर्गाचा भाग असतील. अनिल हे यूएस एअर फोर्समध्ये लेफ्टनंट कर्नल आहेत आणि स्पेसएक्समध्ये फ्लाइट सर्जन देखील होते.
आतापर्यंत एकही भारतीय अंतराळवीर चंद्रावर गेलेला नाही. तसं तर आत्तापर्यंत भारतातील ३ लोकं अंतराळात गेले आहेत. राकेश शर्मा हे भारतातील पहिले अंतराळवीर होते. त्यांच्या नंतर कल्पना चावला, सुनीता विल्यम्स आणि राजा चारी यांचा देखील समावेश आहे.
अनिल मेनेन जर नासाच्या मून मिशनचा भाग बनले तर ते चंद्रावर जाणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती ठरतील.
तर बघूया हे भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन कोण आहेत?
तर अनिल मेनन यांचा जन्म मिनेसोटाच्या मिनीपोलिसमध्ये झाला. अनिल मेनन यांचे आई-वडील युक्रेनी आणि भारतीय वंशाचे होते.
अनिल मेनन यांनी १९९९ मध्ये केंब्रिजमधील हार्वर्ड विद्यापीठातून न्यूरोबायोलॉजीमध्ये डिग्री मिळवली. आणि २००४ मध्ये मध्ये कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून मेकॅनिकल इंजीनियरिंगची डिग्री मिळवली आहे. याचसोबत त्यांनी स्टॅनफोर्ड मेडिकल स्कूलमधून डॉक्टर ऑफ मेडिसिनचं शिक्षण देखील घेतलं आहे…म्हणजेच हा अवलिया अंतराळवीर ठरणारच आहे शिवाय डॉक्टर देखील आहे…
अनिल मेनन यांनी रोटरी राजदूत म्हणून काही काळ भारतात घालवला आहे. त्या दरम्यान त्यांना पोलिओ मोहिमेचा अभ्यास करण्यासाठी भारतात पाठवण्यात आले होते.
२०१४ च्या सुरुवातीला, मेनन NASA मध्ये सामील झाले. आणि त्यांच्या प्रगतीचा आलेख वाढतच गेला. त्यांनी विविध मोहिमांमध्ये फ्लाइट सर्जनची भूमिका बजावली. मेनन यांनी २०१० मध्ये हैती भूकंप आणि २०१५ मध्ये नेपाळ भूकंप आणि २०११ मध्ये रेनो एअर शो या गंभीर अपघातादरम्यान डॉक्टर म्हणून आपली भूमिका बजावली दिली होती.
तसेच अनिल मेनन यांनी २०१८ मध्ये इलोन मस्क यांच्या प्रसिद्ध कंपनी SpaceX मध्ये देखील काम केले होते. त्यांनी डेमो-२ या मिशन दरम्यान मानवाला अंतराळात पाठवण्याच्या मोहिमेत अनिल मेनन यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. तसेच त्यांनी भविष्यात मानवी प्रणालीला वैद्यकीय मदत करणारी वैद्यकीय संस्था तयार केली.
अनिल मेनन यांनी हवाई दलात फ्लाईट सर्जन ४५ व्या स्पेस विंग आणि १७३ व्या फ्लाईट विंगमध्ये सेवा दिली आहे. तर १०० हून अधिक उड्डाणांमध्ये ते सहभागी होते. दरम्यान आता ते चंद्र आणि मंगळ मोहिमेचा भाग असणार आहेत. थोडक्यात हे मिशन म्हणजेच चंद्रावर आणि मंगळावर जाण्यासाठीच्या अंतराळवीरांना जे ट्रेनिंग दिलं जातं त्यासाठी मेनन सिलेक्ट झाले आहेत. हे ट्रेनिंग २०२२ च्या जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि ते सलग दोन वर्षे सुरू राहणार आहे.
या मून मिशनसाठी १० हजार लोकांनी अर्ज केले होते, त्या १० हजार लोकांमधून फक्त १० व्यक्तींची या मिशनच्या ट्रेनिंगसाठी निवड झाली आहे.
हे लोकं पुढील वर्षी जानेवारीमध्ये टेक्सासमधील जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये रिपोर्ट करणार आहेत. त्यानंतर त्यांना २ वर्षांचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर हे सर्वजण नासाच्या आर्टेमिस जनरेशन प्रोग्रामचा भाग असतील. या कार्यक्रमांतर्गत NASA 2025 मध्ये चंद्राच्या जमिनीवर एक महिला आणि एक पुरुष पाठवण्याचा प्लॅन अखात आहेत.
त्यामुळे त्यांचा हा प्लॅन सक्सेसफुल झालाच तर अनिल मेनेन हे चंद्रावर जाणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती ठरतील…यातच आपल्याला आनंद आहे.
English Summary :
Indian-origin physician Anil Menon, a lieutenant colonel at the US Air Force, has been selected by NASA along with nine others to be astronauts for future missions, the American space agency has announced.
Web Title: Indian origin Anil Menon selected by NASA for Future moon mission.