कोकणच्या सुपुत्राने राज्यातलं पहील खाजगी बंदर उभारून आपल्या मातीचे पांग फेडले होते

उच्च शिक्षण घेऊन किंवा आपल्या अनुभवाच्या जोरावर परदेशात जाऊन आरामाची नोकरी करणारे बरेच असतात. पण आपल्या देशात राहून त्याचं अनुभवाच्या जोरावर आपल्या मदतीने इथल्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणारी माणसं फार कमी पहायला मिळतात, त्यातलचं एक उदाहरण म्हणजे दिलीप भाटकर.

मरीनर कॅप्टन दिलीप भाटकर मूळच्या रत्नागिरीच्या भाटये गावचे. घरची आर्थिक स्थिती बेताची पण त्यांना एकप्रकारे दर्यावर्दी घराण्याचा वारसा होता. म्हणजे आजोबांचा शिडाच्या गलबतांमधून मालवाहतुकीचा व्यवसाय होता.

वडीलही छोट्या होडयांचं बांधकाम आणि सुतारकाम करायचे. त्यामुळे भाटकरांचा लहान पणापासूनच तांत्रिक शिक्षणाकडे कल होता.

१९७२ मध्ये रत्नागिरीच्या शासकीय तंत्रनिकेतनातून त्यांनी पदविका संपादन केली आणि त्यानंतर पदवी अभ्यासक्रमासाठी सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला.

पण आर्थिक होती तशीचं बिकट. वडील महिन्याला पन्नास रुपयांची मनिऑर्डर पाठवायचे, तर दोन आत्या अभ्यासाची पुस्तकं आणि कपडे. पण हुशार असल्यामुळे भाटकरांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवली त्यामुळे पुढच्या शिक्षणात कुठलाही अडसर निर्माण झाला नाही. मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये त्यांनी पदवी मिळवली.

पदवी मिळवलीये आता कुटुंबाला हातभार लावं, या दबावामुळे त्यांनी रत्नागिरीच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये प्राध्यापकाची नोकरी करायला सुरुवात केली. आर्थिक हातभार लागायचा, पण भाटकरांचं मन त्यात रमत नव्हतं.

शेवटी भाटकरांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि मुंबईला आले. माझगाव डॉकमध्ये ट्रेनी म्हणून जॉईन झाले. आपल्या ट्रेनी पीरीयड नंतर १९७६ मध्ये ते मोगल लाइन्स कंपनीत रुजू झाले. या कंपनीच्या जहाजांवर काम करताना भाटकरांनी बऱ्याच समुद्र आणि महासागरांमधून भ्रमंती केली. तिथे मिळालेला अनुभव हाचं त्यांचा आयुष्यात महत्त्वाचा ठरला.

१९८४ मध्ये मरीन इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भाटकरांना सेकंड इंजिनीअर या पदावर बढती मिळाली आणि ते ‘मरीनर कॅप्टन दिलीप भाटकर’ झाले.

यानंतर भाटकरांना नोकरीच्या अनेक उत्तम संधी मिळाल्या. पण त्यांना या नोकऱ्यांपेक्षा आपलं कोकण जास्त जवळचं वाटतं होतं.

१९८५ मध्ये ते गोव्याच्या चौगुले स्टीमशिप्स कंपनीत जॉईन झाले. आपल्या कामाच्या अनुभवामुळे १९९० ते कंपनीच्या जहाजांच्या मॅनेजमेंट डिपार्टमेंटमध्ये सहभागी झाले. कंपनीसाठी परदेशात जाऊन जहाजं बांधून घेणं, खरेदी करणं आणि त्यांच्या चाचण्या घेऊन भारतात आणणं या सगळ्या जबाबदाऱ्या कॅप्टन भाटकरांच्या. त्यामुळे इथं मिळालेला अनुभव त्यांच्य वाटचालीची शिदोरी ठरली.

असाचं त्यांच्या आयुष्यातला एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो. २००३ चं ते सालं. जुलै महिना सुरू असल्यामुळं पावसाला काही ब्रेक नव्हता. त्यात फेसाळेलेला समुद्र. पंधरा-वीस फूट उंचीच्या लाटांचं तांडव सुरू होतं. या सगळ्यात भाटकर छोटय़ाशा बोटीतून आपल्या मित्रांसोबत होते. खोल समुद्रात हेलकावे खात असलेलं ‘अल मूर्तदा’ हे लेबनीज जहाज किनाऱ्यावर सुखरूप आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.

गेल्या पंधरा दिवसांपासून नौदल आणि तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर या जहाजाची सुटका करण्याचं काम सुरू होतं. पण सगळेच प्रयत्न फेल गेलेले. आता भाटकरचं जणू शेवटचा पर्याय उरलेले. भाटकरांना त्या छोट्या बोटीतून जातं त्या भरकटलेल्या जहाजाजवळ जाऊन दोर टाकून त्याला किनाऱ्यावर आणायचं होतं. थोडा अंदाज जरी चुकला असता तरी जीवाशी मुकावं लागलं असतं.

पण भाटकर म्हणजे समुद्राच्या लाटांवर खेळलेला माणूस त्यांनी हे आव्हान स्वीकारलेलं होतं. शेवटी कामगिरी फत्ते होते. इतक्या भयंकर लाटांमध्ये सुद्धा जहाज सुखरूप किनाऱ्यावर आलं.

आणि त्यामुळे विचार आला आपल्या कोकण किनारवरचं बंदरांमध्ये जहाजदुरूस्ती प्रकल्प उभा करण्याचा, हा प्रस्ताव त्यांनी चौगुले कंपनीच्या संचालक मंडळापुढे मांडला. त्यासाठी रत्नागिरी, जयगड, विजयदुर्ग या ठिकाणी स्वत: ही जबाबदारी स्वीकारण्याची तयारीही दाखवली.

भाटकरांची ही कल्पना चौगुले मंडळींना जास्तचं आवडली आणि त्यांनी यावर कान करायला सुरुवात केली. रत्नागिरीतील सांडेलावगण गावच्या किनाऱ्यावर बारमाही बंदर उभारण्यासाठी चौगुले कंपनीने सुमारे ३०० एकर जमीन खरेदी केली आणि १९९९ पासून आंग्रे पोर्टची उभारणी सुरूझाली. ‘चौगुले स्टीमशिप्स’ या बंदर प्रकल्पात स्थानिक मंडळींनी एकत्र येऊन युनायटेड उद्योगसमूहाच्या बॅनरखाली जहाजदुरुस्तीची कामं सुरू केली. त्याबरोबर या बंदरातून मालाची निर्यातही सुरू झाली.

आता चौगुले घराण्याची तिसरी पिढी व्यवसायात आली होती. पण या पिढीने बंदराच्या कामासाठी स्थानिकांना संधी न देता परदेशी तंत्रज्ञ नेमायचं ठरवलं. त्यामुळे कॅ.भाटकरांनी तिथून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आणि २००५ पासून जयगड खाडीतल्या काताळे गावच्या किनाऱ्यावर ‘युनायटेड डॉकयार्ड’ या नव्या बंदर प्रकल्पाची उभारणी केली.

या बंदरातून कोल्हापूरातून बॉक्साईट आणि कोकणातून जांभा दगडाची निर्यात व्हायला लागली. पण पश्चिम घाट विकास अभ्यास समितीच्या शिफारशींमुळे या खनिजांच्या उत्खननावर बंदी आली. त्यामुळे त्यांच्या निर्यातीवर सुद्धा बंदी आली. त्यामुळे भाटकरांनी जहाजदुरुस्तीच्या कामांवर लक्ष केंद्रित केलं आणि थोड्याचं वेळात त्यात यश सुद्धा मिळवलं.

दरम्यान या जहाजांच्या दुरूस्तीसाठी ‘फ्लोटिंग ड्राय डॉक’ची गरज असायची. याआधी देशातल्या काही कंपन्यांनी परदेशातून अशा प्रकारची डॉक बांधून आणली होती. पण आपल्या देशात असा प्रकल्प नव्हता. तेव्हा कॅ. भाटकरांनी हे आव्हान स्वीकारलं आणि देशातला पहिला ‘फ्लोटिंग ड्राय डॉक’ तयार झाला.

सगळ्या जहाजांची पाण्याखाली तळाची दुरुस्ती करण्यासाठी सुक्या गोदीची गरज असते. ही जहाजं या गोदीमध्ये घेऊन, पाण्याबाहेर सगळं जहाज उचलून त्यांची दुरुस्ती केली जाते. मुंबई बंदरात अशा दुरुस्तीच्या कामासाठी ब्रिटिशकालीन गोदी आहे. पण स्वतंत्र भारतात असा प्रकल्प पहिल्यादाचं उभा राहिला.

रत्नागिरीच्या जयगड खाडीतील काताळे बंदरात हा प्रकल्प असून, या गोदीची लांबी ८० मीटर, रुंदी २४ मीटर, तर उंची ९.२ मीटर आहे. १२५० टन वजनाच्या या गोदीवर १८०० टन वजनापर्यंतची जहाजे उचलून दुरुस्ती करणं शक्य आहे.

जुनी जहाजं तोडून त्यांचे सुट्टे भाग भंगार म्हणून विकली जातात. हा मोठा व्यवसाय आहे. पश्चिम किनारपट्टीवर अशी जहाजं तोडण्याची सुविधा माझगाव डॉक आणि गुजरातमध्ये अलंग इथे आहे. पण कोकण किनारपट्टीवर अशी सुविधा नव्हती, त्यामुळे जयगडच्या या बंदर प्रकल्पामध्ये ही सुविधेसाठी सुरू झाली.

या बंदराच्या प्रकल्प उभारणीत रत्नागिरी आणि गुहागर मधल्या स्थानिक तंत्रज्ञ, वेल्डर, फिटर यांच्यासह कंपनीतील तंत्रशिक्षण घेतलेल्या मुलींनीही महत्त्वाची कामगिरी केली. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झालेत.

 

English Summary: In the meantime, floating dry docks were needed to repair these ships. Earlier, some companies in the country had built such docks from abroad. But there was no such project in our country. When ca. Bhatkar accepted the challenge and built the country’s first ‘floating dry dock’

web title: Marine Captain Dilip Bhatkar built first private port in Konkan

2 Comments
  1. Sairaj devrukhkar says

    We kokankar are lucky to have this project in our place, special thanks to capt.dilip bhatkar sir.
    Also we are proud of you sir,i have been hear about your whole struggling life.
    Thank you.

  2. Rupesh Rahate says

    माझ्या गावाजवळ आहे ते तरंगत डॉक

Leave A Reply

Your email address will not be published.