मोदींची जाहिरात कशी झाली ?

जुलै २०१३ मध्ये CNN IBN या चॅनेलमार्फत देशभरात एक सर्व्हे घेण्यात आला होता यामध्ये भारतातील लोकांच बहूमत हे कोणाच्याच पारड्यात स्पष्टपणे नसल्याचं जाणवत होतं. भारतीय जनता पक्ष अर्थात भाजप या सर्व्हेत आघाडीवर असला तरी भाजपला स्पष्टपणे बहूमत देण्याकडे लोकांचा कल नव्हतां.

ऑगस्ट २०१३ मध्ये मोदींनी गुजरातच्या लालन कॉलेज येथे लाल किल्याची प्रतिकृती उभारून राजकिय भाषणं दिलं. या भाषणाद्वारे भाजपचं नेतृत्व आत्ता आपल्याकडे सोपवण्याची चर्चा त्यांनी उत्तमरित्या सांभाळली.

७ सप्टेंबर २०१३ रोजी भाजपने नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील हे जाहिर केलं. हे नाव जाहिर करत असताना ते भाजपप्रणित आघाडी सरकारचे नाही तर फक्त भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील व भाजपच्या सर्व जाहिरातींवर फक्त मोदींचा चेहरा दिसेल अशी मांडणी करण्यात आली.

त्यानंतरच्या टप्यामध्ये मोदींची जाहिरात नेमकं कोण करणार याची चर्चा करण्यात आली व एकमताने पियूष पांडे “ऑगिल्वी” कंपनीचा विचार करण्यात आला. पियूष पांडे यांनी याअगोदर कॅडबरी, फेविकोल, राजस्थान टुरिझम, वोडाफोन झूझू अशा अनेक लोकप्रिय जाहिराती केल्यानं त्यांना जनतेची नस बरोबर लक्षात येईल यावर अनेकांच एकमत होतं. पियूष पांडे यांच्या एक्झुकिटिव्ह चेअरमन आणि क्रियेटिव्ह डायरेक्टर असणाऱ्या कंपनीसोबतच साम बलसारा यांच्या मॅडिसन कंपनीला या जाहिरातींची जबाबदारी देण्यात आली होती. पियूष पांडे हे जाहिरात क्षेत्रातलं मात्तबर नाव असल्यानं त्यांनी मोदींच्या जाहिरातींची दिशा स्पष्ट केली. ही जाहिरात तीन टप्यांमध्ये राबवण्याचं नियोजन त्यांनी केलं.

 

१) UNHAPPINESS.

यात जनता माफ नहीं करेंगी या वाक्याचा वापर पुरेपुर करण्यात आला. कशाप्रकारे देशातील वातावरण योग्य नाही हे ठासवण्याचा प्रयत्न या जाहिरातीतून करण्यात आला. भ्रष्टाचार, महागाई यांच्यासारख्या मुद्यांमुळे जनता नाराज आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करण्यासाठी सर्व जाहिराती या ब्लॅक अॅण्ड व्हाईट रुपात मांडल्या गेल्या जेणेकरून सर्वत्र अंधकार आहे ही भावना लोकांच्या मनात तयार होईल.

Screen Shot 2018 03 23 at 2.07.10 PM
source – bjp

 

२) HOPE

दूसऱ्या टप्यात लोकांच्या या नाराजीला काहीतरी चांगल होईल अशी आशा दाखवणारं कॅम्पेन उभा करण्यात आलं. त्याची टॅगलाईन अच्छे दिन आनेवाले हैं ठरवण्यात आली. काहीतरी चांगल होईल हा विश्वास दाखवत असताना जास्तित जास्त कलरफुल जाहिराती करण्यावर भर देण्यात आला.

 

३) CALL OF ACTION

अबकी बार मोदी सरकार हे वाक्य तिसऱ्या टप्यामध्ये लोकांच्या मनावर ठासवण्यात आला. पहिल्या टप्यात लोकांची नाराजी मांडण्यात आल्यानंतर दूसऱ्या टप्यात आशा जागवण्यात आल्या आणि तिसऱ्या टप्यात लोकांना प्रत्यक्ष मत देण्यासाठी कृती करण्याचं ठासवण्यात आले. जाहिरात करत असताना अनेक लोकांचा समूह आणि गर्दीचा पुरेपुर वापर करत आला लोकं संघटित होतं आहे हे बिंबवण्यात आलं.

Screen Shot 2018 03 23 at 1.52.13 PM

याबाबत अधिक माहिती देताना पियूष पांडे म्हणतात, “ माझ्यासमोर लोकांच्या भाषेत जाहिरात सादर करणं हे प्रमुख उद्दिष्ट होतं. आजपर्यन्त राजकिय कॅम्पेन हे प्रमाण हिंदी मध्ये होतं होती ती भाषा सोडून आपण लोकांच्या भाषेत जाहिरात करणं माझ्यासाठी महत्वाचं होतं म्हणूनच मी देव तुम्हाला माफ करणार नाही या शब्दाला जेवून जनता माफ करणार नाही किंवा मित्राला वापरण्यात येणारी काळजी करु नकोस ही ओळ आम्ही अच्छे दिन आनेवाले हैं अशी घेतली त्याचा नक्कीच फायदा आम्हाला लोकांपर्यन्त पोहचण्यासाठी झाला.

थोडक्यात सांगायचं झालं तर फेसबुक कडून मिळवलेला डेटा किंवा इतर गोष्टींच्या आरोपांची पार्श्वभूमी पाहता लोकांच्यापर्यन्त पोहचण्यासाठी नेमकी कशी जाहिरात करण्यात यावी यासाठी मोदी कॅम्पेनला जाहिरात विश्वास अभ्यासाचं स्थान आहे. या जाहिराती करत असताना प्रत्येक राज्यातील समस्यांचा विचार करुन तिथल्या लोकांना घेण्याचं प्राधान्य ठेवण्यात आलं होतं. अवघ्या ७५ दिवसात २०० जाहिराती, १५० रेडिओ जाहिराती आणि १००० मुद्रित आणि जाहिरातीफलकांद्वारे प्रचंड मोठ्ठे कॅम्पेन उभा करण्याचं कामं पियूष पांडे यांना केलं.

मात्र जाहिरातील करत असताना अजून एक महत्वाचा मुद्दा विचारात घ्यावा लागतो. तो म्हणजे प्रोडक्ट आणि जाहिरात यांची बरोबरी. जितकी चांगली जाहिरात होईल तितकचं प्रोडक्टला क्रिटिसाईज करण्यात येतं. आणि प्रोडक्ट वाईट असेल तर कालांतराने ही जाहिरात पुर्णपणे फेल म्हणून गणली जाते. अच्छे दिन चा आज उठलेला बाजार पाहता उत्तम जाहिराती केल्या पण ग्राहकांना तो माल नाही दिला तर काय होतं हे सांगण्यासाठी पुरेसं आहे…

Leave A Reply

Your email address will not be published.