आसाराम बापूला जन्मठेप घडवणारा वकील…
जब तक कुछ नहीं बदलोंगे ना दोस्त, कुछ नहीं बदलेंगा !!!
मागच्या वर्षी आलेल्या न्यूटन सिनेमातला डॉयलॉग. प्रामाणिकपणाचा गोडवे गाणं भारी असतं. लिहणं भारी असतं. जास्तीत जास्त प्रामाणिकपणाच्या कविता होतात यापलिकडं जायचं झालं तर प्रामाणिकपणाचं लोणचं घालता येतं. बास प्रामाणिकपणाच इतकच काय ते करता येत. हि कथा त्याच प्रामाणिकपणाचा गोडवा गाणारी. आपण तितकच करु शकतो म्हणून..
पि. सी. सोलंकी
नाव माहित आहे का ? कदाचित नसेल. हे वकिल आहेत. ते आसारामला जेलमध्ये पाठवणारे वकील आहेत. आज त्यांची हि ओळख झाली आहे. पण काल परवा पर्यन्त अस नव्हतं. एक प्रामाणिक अधिकारी ज्याला आपल्या प्रामाणिकपणाचा गर्व आहे अस मत सगळ्याच वकीलांच होतं. कोण विकलं जात नाही. सगळेच विकायला येतात तर हा काय जिझए… पण सोलंकी तसा माणूस नव्हताच.
सोलंकींचा जन्म राजस्थानचा. एका सर्वसामान्य कुटूंबातला. वडिल रेल्वेमध्ये मॅकेनिक होते तर आई घरीच असायची. सोलंकी जातीने शिंपी समाजाचे. त्यांची आई दिवसाला चाळीस शर्ट शिवायची. लहानपणापासून सोलंकी देखील हेच काम करायचे. सोलंकींना तिन बहिणी. आई वडलांच शिक्षण शुन्य, पण स्वप्न आपल्या चारी मुलांना शिकवायचं. सोलंकींची मोठ्ठी बहिण ३० वर्षांपुर्वी पदवीधर झालेली. यात काय विशेष तर राजस्थानसारख्या भागातून ३० वर्षांपुर्वी मुलगी ग्रॅज्युएट होणं खूप मोठ्ठी गोष्ट आहे. सोलंकीच्या तिन्ही बहिणी शिकल्या. मागोमाग पि.सी. सोलंकी वकील झाले.
काळा कोट चढवून हा माणूस आपला प्रामाणिकपणा घेवून कोर्टाची पायरी चढलां. त्यांचे जे गुरू होते त्यांनी पहिल्याचं दिवशी सोलंकींना एक कानमंत्र दिला, “ वकीली हा खूप जबाबदारीचा पेक्षा आहे, आपण आपल्या कामातून आपली प्रतिमा तयार करतो. आणि आपल्याचं कामातून ती धुळिला मिळवतो. आपल्या कमनशिबामुळे आज वकीलांची प्रतिमा चांगली नाही पण अस काम करावं की मनाला समाधान वाटेल. निदान स्वत:च्या नजरेतून तर पडता कामा नये”.
या वकीलांनी हाच मुलमंत्र मानला आणि कामाला सुरवात केली. प्रामाणिकपणाचा ओव्हरडोस म्हणून सोलंकी वकीलांच नाव माहित होतं. हेच नाव ऐकून एका दुपारी एक जिर्ण झालेला बाप आणि त्याची मुलगी वकीलांना भेटायला आली. बापाच्या नजरेत बघूनच वकीलांना बापाचा प्रामाणिकपणा समजून गेला असावा. वकिलांनी आरोपीचं नाव विचारल. त्या मुलींन आरोपीचं नाव सांगितलं, “आसाराम बापू” .
सोलंकी सांगतात, “आसाराम बापूचं नाव ऐकून मला देखील धक्का बसलेला पण हि केस लढायची आणि त्या बापाच्या नजरेला न्याय मिळवून द्यायचां हे मी ठरवलं होतं.” त्यांनी केस समजुन घेतली आणि कोर्टात केस दाखल झाली. २०१४ च्या सुरवातीस केस फाईल झाली. आसाराम बापूला अटक झाली आणि सुरू झाला एका जिद्दीचा प्रवास..
कोर्टात उभा राहून साक्षी होवू लागल्या. मुलीची साक्ष ८० पानांची होती. आईची ९४ आणि वडलांची ५६ पानांची. इतक्यावरुन लक्षात याव कशा प्रकारे साक्ष घेतली असावी. या सर्वांची साक्ष घेत असताना सोलंकी यांची जिद्द वाढतच होती. केस तगडी होत आहे लक्षात यायला लागतं आणि सोलंकींना धमक्या येवू लागल्या. केस सोडण्यासाठी दबाव वाढू लागला. आसाराम बापूचे वकिल खास दिल्लीवरुन येवू लागले.
आसाराम बापूला जमानत देण्यासाठी खास दिल्लीवरुन पहिला येणाऱ्या वकीलांच नाव होतं राम जेठमलानी, त्यानंतर आले के.टी. तुलसी, त्यानंतर आले सुब्रम्हण्यम स्वामी पण काहीच चालत नव्हतं. आसारामला जमानत मिळत नव्हती. त्यानंतर मैदानात उतरले राजू रामचंद्रन, सिद्धार्थ लूथरा, माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी, सलमान खुर्शीद, सोली सोराबजी, विकास सिंह, एसके जैन एकसे बढकर एक वकिल मैदानात उतरत होता आणि रिकाम्या हातानं परत जात होता. एकूण तीन वेळा सुप्रिम कोर्टाने जमानत याचिका फेटाळून लावली. आसाराम बापूने सहा वेळा जमानचा अर्ज केला आणि सहा वेळा त्याला रिकाम्या हातानं जेलमध्येच बसून रहावं लागलं.
सोलंकी वकीलांना विचारलं हे सर्व कस जमलं तर ते सांगतात, “ मेरी 80 साल की मां और 85 साल के पिता को भी डर नहीं लगता. जब आप सच के साथ होते हैं तो मन, शरीर सब एक रहस्यमय ऊर्जा से भर जाता है. सत्य में बड़ा बल है. आत्मा की शक्ति से बड़ी कोई शक्ति नहीं. उनके पास धन, वैभव, सियासत का बल था, मैं अपनी आत्मा के बल पर खड़ा रहा. मेरा परिवार मेरे साथ था. मेरी मां पढ़ी-लिखी नहीं हैं. वे बस इतना समझती हैं कि एक आदमी ने गलत किया. बच्ची को न्याय मिले. मुझे सच की लड़ाई लड़ता देख मेरे पिता की बूढ़ी आंखों में गर्व की चमक दिखाई देती है. वे मुझसे भी ज्यादा निडर हैं.”
वकिलांनी काय केलं हे सांगताना न्यूटनचाच शेवटचा डॉयलॉग सांगू वाटतो, “ ९ बजें का टाईम हैं ९ बजैंही आत्ता हूं लोगोंको बडीं बात लगती हैं …
👌👌👌