ससूननंतर जवळपास दीडशे वर्षांनी पुणेकरांना हक्काचं वैद्यकीय महाविद्यालय मिळणार आहे

पुण्याची एकेकाळची ओळख म्हणजे पेन्शनर लोकांचं शहर. पेशवाईची राजधानी असूनही शांत निवांत पुण्याच्या सीमा विस्तारलेल्या नव्हत्या. लोकसंख्या जास्त नव्हती. इंग्रजांनी इथं आपलं कॅम्प वसवलं. अनेक सुधारणा केल्या. गावाला शहर बनवण्याचा प्रयत्न केला. या सुधारणांमध्ये होत ससून हॉस्पिटल. 

पुण्यात रेल्वेने आलात तर लक्षात येणारे बाब म्हणजे ससून हॉस्पिटल. १२ महिने २४ तास या हॉस्पिटल मध्ये गर्दी पाहायला मिळते. याच महत्वाचं कारण म्हणजे इथं एका छता खाली मिळणाऱ्या सोइ सुविधा. 

इथं पार गडचिरोली पासून ते इकडे कोल्हापूर पर्यंतचे गरजवंत येत असतात. त्यांना या सुविधा अगदी स्वस्त मिळतात. 

त्यामुळे सामान्य नागरिकांचा ओढा आपसूकच ससूनकडे असतो. त्यामुळे पुणेकरांसाठी वेगळे सोई-सुविद्या युक्त अद्यावत वैद्यकीय हॉस्पिटल असावे अशी अनेक वर्षांपासून मागणी होती. मात्र त्याला राजकीय बळ म्हणावे तसे मिळत नव्हते.

पुण्यात ससून यांच्या मदतीने रुग्णालय उभे राहिले 

१९ व्या शतकातील मुंबईतील सुप्रसिद्ध ज्यू समाजसुधारक ‘डेविड ससून’ यांनी पुण्यात रुग्णालय बांधण्यास सढळ हाताने दान दिले. १८६७ साली १४४ रुग्णांची व्यवस्था होईल असे प्रशस्त रुग्णालय पुण्यात ससून यांच्या मदतीने बांधण्यात आले. त्यामुळे या रुग्णालयाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

ससून यांच्या मदतीने व बयरामजी जीजीभॉय यांच्या अथक प्रयत्नातून पुण्यात पहिले वैद्यकीय महाविद्यालय ससून रुग्णालयाच्या आवारात १८७८ साली बांधण्यात आले. या महाविद्यालयाला बयरामजी जीजीभॉय यांचे नाव देण्यात येऊन त्याचे बी.जे मेडिकल कॉलेज असे नामकरण करण्यात आले.

१९४६ साली बी.जे मेडिकल कॉलेजला पूर्णतः वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आला.   बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून हॉस्पिटल हे संलग्न आहे.  

मधला काळ सोडला तर ५० लाख लोकसंख्या असणाऱ्या पुणेकरांसाठी हक्काचे असे वैद्यकीय महाविद्यालय उभे राहिले नाही. त्यामुळे गेल्या अनेकवर्षांपासून अशा वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे अशी मागणी केली जात होती. 

अटल बिहारी वैद्यकीय महाविद्यालयमुळे हि मागणी पूर्ण होणार आहे. ट्रस्ट स्थापन करून त्याद्वारे हे वैद्यकीय महाविद्यालय चालविण्यात येणार आहे. भारतात पहिल्यांदा २००८ मध्ये अहमदाबाद पालिकेच्या वतीने ट्रस्ट स्थापन करून वैद्यकीय महाविद्यालय स्थापन  करण्यात आले होते.

 त्याच धर्तीवर पुणे महापालिकेच्या वतीने या वैद्यकीय महाविद्यालयाची मुहूर्तवेढ रोवण्यात आली आहे. 

अखेर २०१७ मध्ये वाचा फुटली आणि वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय सुटला

२०१७ मध्ये तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची घोषणा केली होती. अगोदर सर्वसाधारण सभेची मान्यता त्यानंतर राज्य सरकार, केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या मान्यता घेण्यासाठी  मधले चार वर्ष गेले. 

अहमदाबादच्या धर्तीवर ट्रस्टच्या माध्यमातून या महाविद्यालय आणि रुग्णालयाचे व्यवस्थापन होणार आहे. या ट्रस्टमध्ये महापौरांसह सर्व पदाधिकारी व गटनेत्यांच्या समावेश असणार आहे. 

साधारण ६५२ कोटी रुपये खर्च येणार

पहिल्या टप्प्यात बाबुराव सणस विद्यालय आणि कमला नेहरू रुग्णालयाच्या जागेवर महाविद्यालयाचे वर्ग आणि ५०० खाट क्षमतेचे रुग्णालय उभारण्यात येईल. त्यानंतर नायडू रुग्णालायच्या जागेवर नवीन इमारत उभारून रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे. यासाठी साधारण ६५२ कोटी रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

केंद्र सरकारच्या एनएमसी अर्थात नॅशनल मेडिकल कमिशने मान्यता दिली आहे.

महापालिकेच्या माध्यमातून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात आले आहे. यामुळे पुणेकर नागरिकांना औषधोपचार किफायतशीर दरात उपलब्ध होणार आहे

महत्वाचं म्हणजे या निर्णयाला सर्व पक्षीय नगरसेवकांनी  एक मताने पाठिंबा दर्शवला आहे. ससून सोडले तर पुणेकरांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असणारे वैद्यकीय महाविद्यालय नव्हते. त्यामुळे अशा प्रकारचे वैद्यकीय महाविद्यालय हवे अशी मागणी अनेक वर्ष होती. ती यानिमित्ताने पूर्ण होणार आहे. ट्रस्टचे काम हे स्वतंत्र असणार असून अहमदाबाद महापालिकने अशा प्रकारचे महाविद्यालय सुरु केले आहे.

 वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेश शुल्क हे केंद्र सरकार ठरविणार आहे.

एखादी संस्था उभी करतांना सर्वांत पहिल्यांदा विचारण्यात येणार प्रश्न म्हणजे आर्थिक भार कोण सांभाळणार?

महापालिकेने ट्रस्ट स्थापन केल्यामुळे महाविद्यालय चालवण्याकरता कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा महापालिकेला सहन करावा लागणार नाही. या महाविद्यालयात प्रत्येक वर्षी १०० विद्यार्थांना प्रवेश दिला जाणार आहे. 

कुठलेही वैद्यकीय संकट उभे राहिले तर पालिकेचे स्वतःचे आणि अद्यावत सोई सुविधांनी सुसज्ज असलेले वैद्यकीय महाविद्यालय महत्वाचा घटक ठरेल असं सांगण्यात येत आहे.

मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल प्रमाणे सर्व सोई सुविधा एकाच छता खाली उपलब्ध

मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये २४ तास सर्व सुविधा उपलब्ध असतात. तान्ह्या बाळापासून ते ज्येष्ठ नागरिकांना लागणाऱ्या सर्व गोष्टी एकाच छता खाली मिळतात. इतर हॉस्पिटल मध्ये एका ठिकाणी तपासणी, दुसऱ्या ठिकाणी शस्त्रक्रिया आणि तिसऱ्या ठिकाणाहून औषधे अशी अवस्था असते. मात्र, महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालय येते सर्व सुविधा गरजवंतांना एकाच ठिकाणी येथे मिळणार आहे.

वैद्यकीय महाविद्यालयात मिळणाऱ्या सुविधा

-ओपीडी

– आयसीयु

-ऑपरेशन थियेटर

-क्स-रे, सोनोग्राफी

– विविध टेस्ट

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.