मणिकर्णिकाने बाणेदारपणे उत्तर दिलं, एकच काय १० हत्तींची मालकीण होऊन दाखवेन

दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या बिठूरच्या वाड्यात आपल्या वडिलांसोबत मनू आली होती. त्या वाड्यातल्या वातावरणात मनु म्हणून मोठी होत होती. तिच्या हसण्या-खेळण्यावर बागडण्यावर कोणीही रोख लावणार नव्हतं. आई नसल्यानं ती आपल्या वडिलांच्या मागंमागं अखंड वाड्यात सगळीकडे फिरायची. त्यामुळे बाजीरावांच्या भोवतीच्या पुरुषांमध्ये तिचा वावर असायचा.

तिच्या निरागस आणि पाणीदार डोळ्यांकडं पाहिल्यावर वाड्यातल्या प्रत्येक एका व्यक्तीला आनंद वाटायचा. सगळेच तिच्यावर अपार माया करायचे. तिच्यात चपळपणा होता. तिची सतेज कांती वृत्ती पाहून लोक तिला कौतुकाने छबिली म्हणत. बाजीरावांची तर ती फारच लाडकी होती. त्यामुळे तिला वाड्यामध्ये मुक्तद्वार होत. बाजीरावांनी तिला दत्तक घेतले होते असं बोललं जायचं पण तसा प्रत्यक्ष उल्लेख मात्र कुठं नाही.

बाजीरावांच्या दोन मुलांचं नानासाहेब आणि रावसाहेब यांचे शिक्षण सुरु होतं. त्यांना शिक्षण देताना वाड्यात राहणारी इतर मुलं देखील त्यांच्या बरोबर शिकायला यायची. मनू देखील त्या सर्व मुलांबरोबर शिकत असे. ती बाळबोध मराठी मोडी लीपी लिहायला वाचायला शिकली. पण नानासाहेब आणि रावसाहेबांना ज्या  मर्दानी खेळांचं शिक्षण मिळायचं त्यात तिला जास्त रस वाटायचं.

त्या दोघांसोबत ती घोडेस्वारी शिकली. त्याचबरोबर घोड्याची पारख करण्याचे ज्ञान तिला मिळाले. वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षापर्यंत मनू तलवारबाजी, भाला, पिस्तूल, जांबिया चालवायला शिकली. विशेष म्हणजे ती मल्लखांब हा पुरुषांचा खेळ सुद्धा शिकली. बाजीरावाच्या आश्रयाला आलेल्या मल्लखांब या कसरतीचे शास्त्र बनवणारे बाळंभट देवधर होते. ते म्हणतात,

मनूचं शरीर आणि तिच्या हालचाली मध्ये पराकोटीचा लवचिकपणा आहे. तिनं खूप कमी वेळातच या कसरतीत प्राविण्य मिळवलंय. तिला दररोज या सगळ्या कसरतींचा रियाज करण्याचा नाद लागला होता.

अशा मर्दानी वातावरणात वाढलेल्या मनूला ती मुलगी आहे, इतर मुलांपेक्षा वेळी आहे असं कधीच वाटलं नाही. पण एकदा असं काहीतरी घडलं की,

असं कधीच एकदा नानासाहेब आपल्या हत्तीवरून फिरायला निघाले होते तेव्हा लहानग्या मनूनं  नानासाहेबांना म्हटले मला हि तुझ्या शेजारी बसून हत्तीवर फिरायच आहे. त्या वेळेस नानासाहेबांचे वय हि जास्त नव्हतं. त्यांनी मनूला आपल्याबरोबर हत्तीवर घेण्यास नकार दिला.

पण मनू हट्ट करत राहिली. नानासाहेब देखील हट्टाला पेटले, की मी मनूला बरोबर घेणार नाही. अखेरीस वैतागून मोरोपंत म्हणजेच मनूचे वडील मनूला रागे भरले. म्हणाले सोड हा हट्ट तुझ्या नशिबात हत्तीवर बसणे नाही. तेव्हा मनू ताडकन म्हणाली,

माझ्या नशिबात एकच काय पण दहा हत्ती आहेत.

मनूनं जणू भविष्यवाणीच केली होती. मनूचा हा किस्सा हकीकत म्हणून सांगितली जाते. ही खरी असेल किंवा नसेल पण त्यामधून मनूचा जिद्दी स्वभाव दिसून येतो.

आता किस्सा भविष्यवाणी कशी ठरली.

तर मनूचा विवाह झाशी संस्थानाचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. मनूच्या आवडीनिवडीं विषयी गंगाधरावांनी जाणून घेतले होते. त्याचवेळी मनूच्या हत्तीविषयीचा किस्सा त्यांच्या कानावर आला. त्यांनी मनूला दहा हत्ती देण्याचे मनोमन ठरवले.

विवाह समारंभ आटोपल्यानंतर गंगाधरराव मनूला घेऊन वाड्यावर परतले. गृहप्रवेशाच्या लक्ष्मीपूजनाच्या वेळी मनुचे नाव गंगाधरा रावांनी ठेवले लक्ष्मीबाई. आणि मनूची राणी लक्ष्मीबाई झाली. ती झाशीच्या किल्ल्यातील राजवाड्यात राहू लागले.

आपल्या नववधूला गंगाधर राव यांनी आपल्या राजेपदाला आणि तिच्या राणी पदाला साजेसा आहेर दिला. तो आहेर होता, दहा हत्तींचा. ते दहा हत्ती सोनं-चांदी मोत्यांच्या दागिन्यांनी सजवले होते. 

लहानपणी आपल्या वडिलांना तिने सांगितलं होतं माझ्या दारासमोर एकच काय पण दहा हत्ती झुलतील. तिचे रागारागाने बोललेले शब्द गंगाधररावांनी खरे करून दाखवले होते. आपल्या पत्नीच बोलणं खरं करण्यासाठी त्यांनी तिला सोन्या, मोत्यांनी मढवलेली दहा हत्ती आहेर म्हणून दिलेच. त्याशिवाय त्याच्या खाजगी खर्चासाठी त्यांनी दहा गावाचे इनाम ही दिले होते.

द. ब. पारसनीस यांनी झाशीची राणी हे चरित्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी या किश्श्याचा उल्लेख केलाय. १८९४ साली म्हणजे १८५७ च्या लढाईनंतर ३७ वर्षांनी तीच चरित्र प्रसिद्ध झालं. स्वतः पारसनीस यांनी राणी लक्ष्मीबाईला पाहिले होते. मुख्य म्हणजे पारसनीस यांच्या वडिलांनी १८५७  च्या युद्धात भाग घेतला होता. त्यांच्या आठवणी त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच द. ब. पारसनीस यांना सांगितल्या होत्या.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.