राहूल गांधींना पप्पू नाव कसं पडलं ?

आम्ही पप्पू या नावाचा इतिहास शोधण्याच्या मोहिमेला निघालो तेव्हा वाटेत अनेक फेक व्हिडीओ आले. कोणी फॉटोशॉपचे अडथळे टाकले होते तर कोणी फेक न्यूजचे रखाने भरले होते. मात्र आमचे इतिहासतज्ञ बोलभिडू कार्यकर्ते या मोहिमेत यशस्वी व्हायचं ठरवूनच होते. त्यांनी ही मोहिम मनावर घेतली. इतिहासाच्या पानांवर पप्पूशीं संबधीत अनेक गोष्टी चाळल्या. बखरी शोधल्या. प्रचंड गुतागुतींच्या या महाजालात राहूल गांधीना पप्पू नाव कस पडलं याबाबत अनेक तर्क वितर्क आढळले. हे तर्क तुमच्यासमोर मांडत आहोत.

१) पहिला तर्क –
उत्तर भारतातलं “टोपणनाव”.

राहूल गांधी २००४ साली अमेठीतून लोकसभेसाठी निवडून आले. नव्यानं राजकारणात आलेले राहूल गांधी राजकारणाचे धडे गिरवू लागले तेव्हा. आईचे सुपुत्र, मॉं का लाडला वगैरे वगैरे शब्दांनी विरोधक त्यांचा उल्लेख करु लागले. याच दरम्यान आपल्या एकंदरित शैलीने राहूल गांधी आपली पप्पू ओळख निर्माण करु लागले होते.
पप्पू हे नाव आईचा पदर धरून राहणाऱ्या मुलासंबधात उत्तर भारतात प्रसिद्ध आहे. चाईल्डीश असणाऱ्या पण मनाने प्रेमळ असणारा मुलाला सर्रास पप्पू या टोपणनावानं ओळखलं जातं. राहूल गांधींची राजकारणातील समज पाहून सुरवातीचा काळात त्यांना हे नाव आपोआप पडल्याचा तर्क दिला जातो. मात्र पप्पू यादवचं नाव आठवलं की टोपणनावाचा इतिहास पुन्हा चेक करु वाटतो.

२) दूसरा तर्क –
पप्पू पास हो गयां.

राहूल गांधी आपल्या राजकारणाचे प्राथमिक प्रयोग दाखवू लागले होते त्या दरम्यानच कॅडबरीची पप्पू पास हो गयां हि जाहिरात प्रसिद्घ झाली होती. अमिताभ बच्चन यांना घेवून कॅडबरीने मोठ्ठ कॅम्पेन तयार केलं होतं. निमशहरांमध्ये शिरता येईल या हेतूने जाहिरात तयार करण्याची जबाबदारी Ogilvy & Mather या प्रसिद्ध कंपनीला देण्यात आली. या कंपनीच्या डोक्यातून आलेली सुपीक आयडीया म्हणजे “पप्पू पास हो गयां”. हि जाहिरात राहूल गांधीच्या राजकारणाच्या सुरवातीच्या काळातच हिट झाली. राहूल यांचे एकंदरीत हावभाव, भाषणशैली व यादरम्यानं भारतात सुपरहिट चालणारी पप्पू पास हो गयां हि जाहिरात यांमुळे राहूल गांधी आणि पप्पू हे नाव एक झालं अस अनेकांच म्हणणं आहे.

३) तिसरा तर्क –
विरोधकांचे कांड.

मुळात विरोधक तितके क्रिएटिव्ह असतील अस वाटतं नाही. हा प्रश्न कोरा या प्रश्नउत्तरांच्या साईटवर विचारण्यात आल्यानंतर उत्तर मिळालं ते नवज्योतसिंग सिधू यांनी सर्वप्रथम राहूल गांधीचा उल्लेख पप्पू असा केला होता. पण कुठे ते माहिती नाही. कसे ते माहित नाही. नाव येत ते फक्त सिंधू यांच. आत्ता सिंधूकडे पाहिलं तर तस वाटणं साहजिक आहे पण या सबळ पुरावा नाही. मात्र कोणकोणत्या राजकारण्यांनी राहूल गांधी यांचा उल्लेख पप्पू असा केला आहे याचा शोध घ्यायचा झाल्यानंतर सर्वात प्रथम नाव घ्यावं लागेल ते व्यंकय्या नायडू यांच. व्यंकय्या नायडू यांनी २०१५ मध्ये संसदेत राहूल गांधी यांचा पप्पू म्हणून उल्लेख केला होता. पण तोपर्यन्त राहूल गांधींनी देशभर पप्पू म्हणून ओळख निर्माण करुन स्वत:ला सिद्ध करुन दाखवलेलं. तरी देखील व्यंकय्या नायडू यांनीच सर्वप्रथम संसदेत पप्पू म्हणून उल्लेख केल्याची माहिती मिळते.

बास हे इतकेच तर्क मिळत आहे बाकी पप्पू नावाने मारुती सुझूकी ने केलेली जाहिरात. २००८ साली आलेलं जाने तू या जाने ना सिनेमातील “पप्पू कॉन्ट डान्स साला”. त्यानंतर इलेक्शन कमीशनने तयार केलंल पप्पू कॉन्ट व्होट सारख कॅन्पेन अशा अनेक गोष्टी पप्पू नावाची इमेज तयार करु लागल्या. आणि विरोधक या नावाच्या वापराने राहूल गांधीची इमेज तयार करु लागले. स्वत: राहूल गांधींनी देखील पप्पू नाव पडण्यासारखं अनेक कांड करु नावाचं सार्थक केलच.

Leave A Reply

Your email address will not be published.