बलात्काराचे व्हिडीओ तीनशे रुपयांना विकले जात आहेत.

 

नुकताच सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. एका मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणारा तो व्हिडीओ. बिहार मधल्या जहानाबाद येथील एका मुलीला रस्त्यात सात ते आठ जणांच्या टोळक्यानं पकडलं. तिचे कपडे काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ती जोरजोरात किंचाळत होती, मदतीची भिक मागत होती पण मदत होत नव्हती तर व्हिडीओ काढला जात होता ?

कधी विचार केला हे व्हिडीओ नेमके का काढले जात आहेत –

 

डेक्कन क्रॉनिकलची एक बातमी होती. नोव्हेंबर २०१७ मधील. बलात्कारांच्या व्हिडीओेच लोकल मार्केट नेमकं कस चालत याच वर्णन करणारा हा रिपोर्ट होता. यामध्ये हि धक्कादायक माहिती देण्यात आली होती.

Screen Shot 2018 05 14 at 1.10.45 PM
सोर्स- डेक्कन क्रॉनिकल. दिनांक २३ नोव्हेंबर २०१७.

उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात बलात्काराचे व्हिडीओ खरेदी विक्रीचं मार्केट उभा राहिलं आहे. एक व्हिडीओ साधारण तीनशे रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यन्त विकला जातो. ज्या व्हिडीओ मध्ये नरकयातना जास्त असतील तो व्हिडीओ महाग. पाच मिनिटांपासून ते अर्धा तासांपर्यन्त हे व्हिडिओ असतात. जितका जास्त लांब वेळातला बलात्कार तितके जास्त पैसे अस एकंदरीत याच स्वरुप असतं.

हे मार्केट कस चालतं –

गावागावातून असे व्हिडीओ खुद्द बलात्कार करणारे लोकच आणून देतात अस सांगितलं जातं. त्यानंतर लोकल मार्केटमध्ये ते व्हिडोओ विक्रेत्यासमोर क्लिन केले जातात. क्लिनचा अर्थ जो बलात्कार करतोय त्याचा चेहरा मॉर्फ केला जातो. न की बलात्कार होणाऱ्या मुलींचा. साधारण पाच ते सहा हजार रुपयांना ग्राहक हा व्हिडीओ विकतो. त्यानंतर तो आजूबाजूच्या भागातील दूकांनामध्ये पेन ड्राईव्ह मधून वितरीत करण्यात येतो. त्यानंतर या व्हिडीओंना लोकल व्हिडीओ असा कोडवर्ड भेटतो. ग्राहक येतात आणि लोकल व्हिडीओची मागणी करतात. दूकानदार व्हिडीओच्या तीव्रतेवर किंमत ठरवून हे व्हिडीओ वितरीत करतात.

मार्केटमधून या व्हिडीओंना मोठ्ठी मागणी असल्यानं अशा व्हिडीओचं प्रमाण वाढल्याच चित्र दिसत असल्याचं सांगितलं जातय. अनेक अल्पवयीन मुलांनी झटपट पैसे मिळवण्याचा मार्ग म्हणून हा पेशाच म्हणून स्वीकारला असल्याची माहिती मिळते.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.