आणि पिंपरीच्या किराणा दुकानात काम करणाऱ्या पोराला बाळासाहेबांनी खासदार केलं !

पुण्याचं मावळ म्हणजे शिवसेनेचा गड. नव्वदच्या शतकात इथं शिवसेना रुजवली एका किराणा मालाच्या दुकानात काम करणाऱ्या पोरानं. आणि पुढं या पोराला आमदारापासून खासदार करण्यासाठी बळ दिलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी.

या मुलांचं नाव होतं गजानन बाबर.

कट्टर शिवसैनिक मावळचे माजी खासदार आणि पिंपरी-चिंचवडमध्ये खऱ्या अर्थाने शिवसेना रुजविणारे जुने निष्ठावंत शिवसैनिक म्हणजे गजानन बाबर.

बाबर यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातल. पण कामानिमित्त त्यांचं कुटुंब पुण्याच्या पिंपरी चिंचवड मध्ये रहायला आलं. त्या काळात तरुण मुलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांचे फॅन होते.
पण त्याही पेक्षा बाळासाहेबांच्या महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या भूमिकेमुळे त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते जोडले गेले. यातलेच एक होते पिंपरी चिंचवड मधले बाबर.

यातूनच बाबर यांनी नव्वदच्या दशकात पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात स्थान निर्माण केले होत. ते स्वतः किराणा दुकानात काम करत होते. यातूनच छोटे व्यावसायिक, दुकानदार, व्यापारी आदींच्या ४० संघटनांवर बाबर त्यांच वर्चस्व येत गेलं. पिंपरी-चिंचवडमधली शिवसेनेची पहिली शाखा बाबर यांनी काळभोरनगरात सुरू केली. येथील पारंपरिक प्रस्थ काळभोरांना हादरा देत बाबरांनी पहिल्यांदा इथं भगवा फडकवला.

पिंपरीत केलेला विरोधकांचा कार्यक्रम बघून बाळासाहेबांची बाबर यांच्यावर मर्जी बसली. याच बळावर त्यांना तीन वेळा नगरसेवक झाले. विरोधी पक्षनेते पद मिळाले. पुढे ते खासदार ही झाले.

खासदार होतानाचा त्यांचा एक किस्सा मावळ मध्ये खूप गाजला. तो किस्सा म्हणजे २००९ च्या मावळ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आझम पानसरे आणि शिवसेनेच्या गजानन बाबर यांच्यात थेट लढत झाली होती. त्या वेळी ‘बाबर की अकबर’ (आझम) असा धार्मिक प्रचार करण्यात आला होता. पण मतदारांनी बाबर यांची निवड केली.

या सर्वांची परिणीती बाबर यांना शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणूनही जबाबदारी मिळाली. मात्र २०१४ मध्ये त्यांना शिवसेनेने लाेकसभेची उमेदवारी दिली नाही. त्यामुळे नाराज होत बाबर यांनी मनसेत प्रवेश केला होता. मनाने शिवसैनिक असणारे बाबर तिथ फार काळ रमले नाहीत. यातूनच त्यांनी महापालिका निवडणुकीच्या ताेंडावर त्यांनी अखेर भाजपला जवळ केल. पण भाजप मध्ये जाताना ही ते म्हणत,

‘किराणा दुकानात काम करणाऱ्या पोराला बाळासाहेबांनी आमदार-खासदार केले’

भाजप मध्ये जाऊनही बाबर यांचं मन काही रमलं नाही. शेवटी २०१९ मध्ये बाबर यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. असं म्हणतात की कट्टर शिवसैनिक दुसऱ्या कोणत्या पक्षात रमत नाही. बाबर यांचं अगदी तसंच झालं. त्यांनी शेवटपर्यंत स्वतःची ओळख कट्टर शिवसैनिक म्हणूनच ठेवली.

हे हि वाच भिडू.

   

Leave A Reply

Your email address will not be published.