कधीकाळी गोमुत्राने शुद्धीकरण करणारे छगन भुजबळ आज सरस्वतीला विरोध करतायत

सर्व शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची?”

अखिल भारतीय समता परिषदेच्या व्यासपीठावर बोलताना भुजबळांनी हे विधान केलं आणि त्या वक्तव्याची राज्यात जोरदार चर्चा झाली. भुजबळांच्या या ‘पुरोगामी’ स्टॅन्डवरून त्यांच्यावर जोरदार टीका देखील करण्यात येत आहे.

मात्र सत्यशोधक समाजाला १०० वर्षे झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात भुजबळांनी असं वक्त्यव्य करणं काय वेगळी गोष्ट नाहीये. विशेष म्हणजे व्यासपीठावर आ. ह. साळुंखे, रावसाहेब कसबे,बाबा आढाव,कमल विचारे,उत्तम कांबळे,भारत पाटणकर, प्रा.हरी नरके या ब्राह्मणेतर आणि दलित चळवळीत काम केलेल्या विचारवंतांच्या सत्कारादरम्यान भुजबळांनी हि भूमिका मांडली. 

त्यामुळेच ब्राह्मण्य व्यवस्थेतील प्रतिकांवर टीका करत भुजबळांनी बहुजनांची प्रतीकं समोर आणण्याची भाषा केल्याचं सांगितलं जात आहे. कधी काळी बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण अडवाणी यांच्या सोबत स्टेज शेअर करून हिंदुत्वाचे गोडवे गाणाऱ्या भुजबळांच्या विचारातील मात्र हा मोठा बदल आहे. भुजबळांच्या भूमिका नेमक्या कशा बदल्यात गेल्यात हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.