“शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे” या नावाचा फायदा होणार की तोटा ?

शिवसेनेचा कार्यध्यक्ष करण्याची वेळ आली, नाव आलं उद्धव ठाकरे. शिवसैनिकांला मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तेव्हाही नाव आलं उद्धव ठाकरे. मी, माझ आणि मला.. या मी पणामुळे शिवसेनेत अभूतपुर्व बंड झालं असा आरोप बंडखोर आमदारांनी केला. कुठेतरी या आरोपांना प्रत्युउत्तर देण्याची वेळ आली होती. निमित्त होतं शिवसेनेचं नवीन नावं. अशा वेळी शिवसेनेला नवं नाव मिळालं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.. पुन्हा एकदा मी, मी आणि मीच..

साहजिक सोशल मिडीयावरून आरोप होवू लागले. स्वत:च नाव देण्याची उद्धव ठाकरेंना गरज नव्हती. बाळासाहेबांच नाव दिलं असतं तरी चाललं असतं. पण आत्ता झालं ते झालं. या नव्या नावाचा उद्धव ठाकरेंना फायदा होणार की तोटा हे सोशल मिडीयावरच्या ट्रोलिंगच्या पुढे जावून पहायला हवं.

नव्या नावाचा नेमका फायदा होणार की तोटा हे ठरवण्यासाठी काही मुद्दे विचारात घ्यावे लागतात, तेच या व्हिडीओमधून पाहुयात…

 

Leave A Reply

Your email address will not be published.