पुण्यातला असा दगड, जिथे तुम्ही उभे राहिलात तर तुम्ही पुण्याच्या मधोमध उभे असता. 

पुणे किती किलोमीटर राहिलं आहे ? पुण्यात प्रवेश करताना प्रत्येकाला पडणारा प्रश्न. त्यानंतर पुण्याच्या किलोमीटरची पाटी दिसते. पण आपण जिथे पोहचणार असतो ते अंतर आणि पाटीवर दाखवणार अंतर बरोबरच आहे का हे कधी तपासून पाहीलं आहात का ? बऱ्याचदा हे अंतर चुकीच वाटतं आणि तुम्हाला प्रश्न पडतो प्रत्येक शहरामधलं हे अंतर कुठून कुठपर्यन्त मोजल जात असाव. तर हे अंतर मोजल जात झिरो स्टोन द्वारे. 

काय आहे झिरो स्टोन. 

इंग्रजांनी प्रशासनाच्या सोयीसाठी प्रत्येक शहरांमधलं अंतर अचूक असाव म्हणून सुधारणा करण्याच ठरवल. याच सुधारणांचा एक  भाग म्हणून प्रत्येक शहरात झिरो स्टोन उभारण्यात आले. हे स्टोन पोस्ट ऑफिसच्या परिसरात उभा करण्यात आहे. म्हणजेच पुणे ते कोल्हापूर किंवा पुणे ते मुंबई हे अंतर पुणे पोस्ट ऑफिस ते कोल्हापूर पोस्ट ऑफिस अस मोजण्यात येत. याच पोस्ट ऑफिसच्या परिसरात झिरो स्टोन बसवण्यात आले. जवळजवळ प्रत्येक शहरात असे स्टोन असावेत. काही झिरो स्टोन काळाच्या प्रवाहात रस्त्यांच्या खाली गाडले गेले तर अतिक्रमणच्या विळख्यात बुडाले.

Screen Shot 2018 06 15 at 3.29.02 PM 

पुण्याचा झिरो स्टोन कोठे आहे ? 

पुणे शहराचा झिरो स्टोन साधू वासवानी रस्त्यावरील पोस्ट ऑफिसच्या जवळ आहे. रस्त्याच्या बाजूस असणाऱ्या या दगडावर पुणे बंगलोर, पुणे सोलापूर, पुणे नाशिक, पुणे अहमदनगर, पुणे पौंड रोड असे उल्लेख करण्यात आलेले आहेत. याच दगडापासून पुणे शहराची हद्द मोजण्याची पद्धत असल्याच सांगितल जातं. 

हे ही वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.