संजय दत्त डॉन बरोबर फोनवर बोलताना सापडला आणि त्याची फिल्म गोत्यात आली

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आणि वाद यांचा फार जवळचा सबंध आहे. संजय दत्तच्या आयुष्यात चित्रपटांसारखे अनेक ट्विस्ट आले आहेत. 

आपण पाहतोच आलो आहोत..नेहेमीच कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेला असतो. जर ज्यांना कुणाला त्याबाबतीत माहिती नसेल तर त्यांनी त्याच्या आयुष्यावर आलेला ‘संजू’ हा मुव्ही नक्की बघा…सगळं कळेल. त्याचं आयुष्य एखाद्या वादग्रस्त पिक्चर पेक्षा कमी नाहीये. त्याच्या याच वादग्रस्त आयुष्याचा परिणाम बऱ्याचवेळा त्याच्या फिल्म्स वर देखील पडला आहे.

त्यातलाच एक पिक्चर म्हणजे ‘कांटे’

कांटे देखील वादग्रस्त चित्रपट ठरला मात्र त्याला कारणीभूत होता तो म्हणजे छोटा शकील !आणि याचमुळे त्याच्या पिक्चरची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.

हा किस्सा होता तसा २००० मधला पण याची चर्चा त्याच्या दोन वर्षानंतर म्हणजेच २००२ मध्ये जास्त झाली होती.

त्याचं झालं असं कि,  कुरुक्षेत्र हा पिक्चर रिलीज झाल्यानंतर महेश मांजरेकर, संजय गुप्ता, हरीश सुगंधा आणि संजय दत्त शिर्डीला साईबाबांचं दर्शन घ्यायला गेले होते. तेथून परत येत असतांना त्यांनी मुक्काम केला नाशिक मधल्या एका हॉटेल मध्ये. तो दिवस होता १४ डिसेंबर २०००.

हे सर्व मंडळी एकाच हॉटेलमध्ये थांबली होती.

आणि त्याचदरम्यान या सर्वांचं कुख्यात अंडरवर्ल्ड छोटा शकील याच्याशी फोनवर बोलणं झालं. त्यावेळेस हा या गोष्टीचा जास्त गाजावाजा झाला नाही. परंतु  पोलिसांनीही या प्रकरणात हस्तक्षेप केला होता, परंतु काही काळानंतर हा विषय मिटलाही होता.

परंतु २००२ च्या ऑगस्टमध्ये संजयच्या ‘कांटे’ पिक्चरची रिलीज डेट निश्चित झाली होती. पण त्याचदरम्यान एकच गोंधळ उडाला कारण त्याच्या एक महिना अगोदर म्हणजेच जुलैमध्ये त्याच्या आणि छोटा शकीलच्या फोनवर झालेल्या संभाषणाची टेप पोलिसांनी जाहीर केली होती.

हि रिकॉर्डिंग समोर आली आणि उघड झालं कि, संजय दत्त आणि महेश मांजरेकर चे अंडरवर्ल्ड च्या दुनियेसोबत खास कनेक्शन आहे.

रिकॉर्डिंग समोर आल्यामुळे दोघेही मोठ्या अडचणीत सापडले होते. त्या संभाषणात छोटा शकील बॉलीवुड मध्ये अंडरवर्ल्ड दुनियेचा धाक कमी होत जात असल्याचं म्हणला. त्यात संजय दत्त ने फिल्म इंडस्ट्री मध्ये काय काय आतल्या घडामोडी चालू आहेत हे सांगितले. त्यात त्याने गोविंदा ची तक्रार देखील केली.

अबू सालेम करिश्मा कपूरला त्रास देतोय हे देखील संजय दत्त फोनवर सांगतो. संपूर्ण संभाषणात सलमान खान प्रीती झिंटा यांचे टोपणनावाने उल्लेख येऊन जातात.

एवढं नाही तर संजय दत्त डॉनला भाई तुमच्या साठी मी एक टीशर्ट खरेदी केला आहे हे सुद्धा सांगतो. एकूणच संजूबाबा लडिवाळपणा करताना दिसतो.

संजय दत्त नंतर महेश मांजरेकर देखील छोटा शकील बरोबर बोलतो आणि आपण एका डॉनवर आधारित असलेला पिक्चर बनवतोय हे देखील सांगतो.

हा वाद इतका वाढत गेला की ‘कांटे’ च्या रिलीजची तारीख सारखीच वाढत होती आणि बर्‍याच वादांनंतर ती २० डिसेंबर २००२ रोजी हा पिक्चर शेवटी रिलीज झाला.

परंतु मध्यात झालेल्या वादामुळे हा पिक्चर तितकाच गाजला.

म्हणजेच ‘कांटे’ च्या मार्गात अनेक काटे-कुटे आलेत परंतु  शेवटी चित्रपट कसाबसा प्रेक्षकांसमोर आलाच. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.