पहिल्यांदा व्हेनेझुएला पोरी सोडून इतर विषयामुळे चर्चेत आला आहे…

 

डोक्यावर हिऱ्यांनी मढवलेलं क्राउन घालून गळ्यामध्ये मिस वर्ल्ड किंवा मिस युनिव्हर्स किताब अडकवलेली कन्या डोळ्यासमोर आली की आठवतो तो व्हेनेझुएला. तसही मराठी असणारा एक समानअर्थी शब्द आणि या देशातील मुली या समीकरणामुळं या देशावर कळत्या वयापासून आपलं जीवापाड प्रेम. आज हा देश एका वेगळ्याच कारणामुळ चर्चेत आलाय ते कारण म्हणजे आज या देशात कॉफी प्यायची झाली तरी ठिक्कभरून पैसै द्यायला लागत आहेत. एवढं सुंदर नाव असणाऱ्या या देशाचे नेमके बारा कसे वाजले हे आपण सोप्या भाषेत जाणून घेवूया..

तर परस्थितीचं गांभिर्य मेन्टेन करण्यासाठी आपण सुरवात करूया नोटबंदीच्या दिवसापासून. तर तेव्हा तुमचे जसे दिवस होते त्याहून वाईट अवस्था आज या देशातील नागरिकांची झाली आहे. आज तेथील बॅंकांनी पैसे देण्यासाठी निर्बंध लावले आहेत त्याचं मुख्य कारण म्हणजे आत्ता पैसै मोजून देण्याऐवजी त्यांना वजनावर द्यायला लागत आहेत.

20067036 140545393191781 173450046635769856 n
https://www.instagram.com/jbarreto1974/

नक्की मॅटर काय आहे –

  • व्हेनेझुएला हा लॅटिन अमेरिकेतील खनिज तेलाचे भांडार असलेला देश आहे. आजच्या घडीला जगातील सर्वात जास्त क्रूड ऑइल या देशात आहे. १९९० च्या दशकापासून समाजात असलेले दरी ? दूर करण्यासाठी कम्यूनिस्ट राजवटीने मोठ्या प्रमाणात कल्याणकारी योजनांवर पैसा खर्च केला.
  • देशाची अर्थव्यवस्था वाढत नसताना देखील मोठ्या प्रमाणावर पैशाचा पुरवठा होत राहिल्यामुळं महागाईने जोर पकडला. आणि जेव्हा महागाई वाढते तेव्हा पैशाची क्रयशक्ती (ताकद) कमी होते मग वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी मोठया प्रमाणात नोटा छापल्या जातात.
  • व्हेनेझुएला मध्ये नेमकं हेच घडलं. तत्कालीन हुगो चव्हेज सरकारने मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला. ह्यूगो चव्हेज गेल्यानंतर या डाव्या नेत्याचा डावा हात समजला जाणारे निकोलस मड्यूरो उत्तराधीकारी झाले. त्यांनी देखील त्याचीच बाजू लावून धरत तसाच कारभार चालू ठेवला.
  • त्यांनी महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी मिनिमम वेजेस किमान वेतानामध्ये भरमसाठ वाढ केली. २०१४ नंतर कच्च्या तेलाच्या किमती गडगडल्याने देशाची अर्थव्यवस्था बिघडण्यास सुरवात झाली. वस्तू व सेवायांचा तुटवडा निर्माण झाला त्याला गाठण्यासाठी टॉम अँड जेरी सारखा नोटा छापण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू झाला.
  • त्याची तीव्रता एवढी वाढली की व्हेनेझुलन बोलव्हर म्हणजेच तिथल्या रुपयाने आपली किंमत 96% ने गमावली. सीएनएन मनीच्या बातमीनुसार एका डॉलरसाठी तब्बल १,९१,००० व्हेनेझुएलन बोलव्हर मोजावे लागतात. अमेरिकेत एवढ्या नोटा मोजणाऱ्यास सहज पाच दहा डॉलर दिले जात असतील.
  • याच बातमीनुसार व्हेनेझुएलाची चलनवाढ ही ४०००% आहे. आतंरराष्ट्रीय मानांकन संस्था मूडी नुसार हा आकडा १३०००% पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. असे झाले तर व्हेनेझुएलाच्या नागरिकांना पावशेर साखर घेणं देखील अशक्य होईल.
17881565 191540634688111 4020032605293379584 n
https://www.instagram.com/jbarreto1974/

अधिकच्या माहितीसाठी, चलनवाढ म्हणजे नेमकं काय असत

  • वाचणाऱ्यापैकी अनेक जणांनी MPSC केलच असेल. रंजन कोळंबेचे क्लास केले नसतील तर सांगतो चलनवाढ काय असते.
  • तर चलनवाढ हे महागाई मोजण्याचे मापक आहे. एका विशिष्ट कालखंडात वस्तू व सेवा यांच्या किमतीत झालेली वाढ म्हणजे म्हणजे चलनवाढ होय. ( १ गुण )
  • जेव्हा बाजारामध्ये मुबलक चलन असते तेव्हा वस्तू व सेवा यांची मागणी वाढते. त्यामुळे त्यांच्या किमती वाढू लागतात. या वाढलेल्या किंमतीत एक ठराविक वर्गच खरेदी करू शकतो. त्यामुळे इतर वर्गात असंतोष पसरू लागतो.
  • थोडक्यात काय तर चलनवाढ आणि विकासदर हे संघ आणि मोदिसारखं असावं. हातात हात घालून हे चालू लागले की एका दिशेनं जातात पण श्री मोदि जड झालां की गणित फसतं. नेमकं या देशात तेच झालं चलनवाढ झाली पण विकास शुन्य.
2 Comments
  1. Suraj Khade says

    कोलंबे केला नाय तरीपण माहित आहे.

    बाकी भारी लिहिलंय तुम्ही…

  2. Kiran says

    Lytuns gang dillhi baddal mahiti purva

Leave A Reply

Your email address will not be published.