रोजा सिनेमा गाजवणारी मधु अचानक कुठे गायब झाली ?

काही हिरो हिरोइनच्या आयुष्यात इतकी सुंदर गाणी येतात की ते गाणं लागलं रे लागलं की त्या हिरो हिरोईनचा चेहरा समोर येतो.

त्यापैकीच एक हिरोईन म्हणजे मधु. 

दिल है छोटासा, छोटीसी आशा असो नाहीतर मग ये हसी वादिया , धीरे धीरे प्यार को बढाना है अशी कायम ऐकू वाटणारी गाणी मधुच्या वाट्याला आली. या गाण्यांमुळे मधु बॉलिवूडमध्ये कायमची हिट झाली पण एकेकाळी तरुण पिढीला वेड लावणारी ही मधु अचानक गायब झाली.

मधूच ओरिजनल नाव बऱ्याच लोकांना माहिती नाही तर मधुच पूर्ण नाव आहे मधुबाला रघुनाथ. अभिनेत्री मधुला ओळखल जातं ते म्हणजे तिच्या करिअरमधील अजरामर फिल्म अजय देवगण सोबतची फुल ओर काटे आणि मणिरत्नमची फिल्म रोजा. मधूला ‘रोजा’ या सर्वांगसुंदर सिनेमासाठी भारत सरकारचा सीन क्षेत्रातला मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 

2019 साली डी डी नॅशनल वर येणाऱ्या रंगोली या कार्यक्रमाची ती निवेदक होती आणि असंही म्हणतात की जेव्हा मधु निवेदक म्हणुन आली तेव्हा कार्यक्रमाची टीआरपी वाढली होती.

26 मार्च 1972 रोजी मधुचा तामिळनाडूमध्ये वडील रघुनाथ आणि आई रेणुका यांच्या पोटी जन्म झाला. मधूच्या जन्मानंतर त्यांचे आई-वडील मुंबईत शिफ्ट झाले. नात्याने मधु ही हेमामालिनी यांची पुतणी आहे तर ईशा देवल ही तिची चुलत बहीण आहे. हे झालं एका बाजूचं सगळ. शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सिनेमा क्षेत्रात आपण काहीतरी करायला हरकत नाही असं मधुला वाटून गेलं. महाविद्यालयीन काळात नाटकांमधून भाग घेणे मोडेलींग करणे ऍड्स फिल्म करणे त्यामुळे काही काही ठिकाणी तिची दखल घेण्यात आली.

त्यावेळी बॉलिवूडमध्ये अजय देवगन डेब्यू करणार होता आणि त्या सिनेमाचं नाव होतं फुल और काटे

या सिनेमासाठी बऱ्याच अभिनेत्रींना विचारणा करण्यात आली होती. पण तारखांचा घोळ असल्याकारणाने कोणीही हा सिनेमा करायला तयार नव्हतं. अशावेळी मधु ही त्यावेळी परफेक्ट कास्टिंग मानली गेली. अजय देवगनच्या विरुद्ध मधूची कास्टिंग झाली. मधु सुद्धा या सिनेमा निमित्त बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. हा सिनेमाही जबरदस्त हिट ठरला. अजय देवगन आणि मधु ही जोडी सुपरहिट ठरली. सिनेमातली गाणी सुद्धा गाजली.

1991 साली हा सिनेमा आला आणि अजूनही तो चर्चेतच आहे. यातली गाणी अजय देवगनचा बाईकवरचा सीन हे जसंच्या तसं प्रेक्षकांना आठवत.

फुल और काटे पेक्षाही जास्त चर्चेत ठरला तो मणिरत्नम यांचा रोजा हा सिनेमा. या सिनेमाने मधूला प्रेक्षकांच्या काळजाला जाऊन बसवलं. अनेक सिनेरसिकांच्या रोजा हा आजही आवडता सिनेमा आहे. पण मधूची सुरुवात अभिनयक्षेत्रात खऱ्या अर्थाने मल्याळम इंडस्ट्रीत झाली.

1992 साली मणिरत्नम यांचा रोजा आला. या तमिळ सिनेमाने लोकप्रियतेचे सगळे उच्चांक मोडले. या सिनेमासाठी मधूला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

नंतर दिलजले, हतकडी, यशवंत, एलान अशा एकूण 55 सिनेमांमध्ये काम केलं आणि सहा टीव्ही सिरीयल मध्ये काम केले. 2002 नंतर म्हणजे तिच्या लग्नानंतर ती सिनेइंडस्ट्रीत पासून दूर गेली. मनाजोग्या भूमिका न मिळाल्यामुळे तिने बॉलिवूडला रामराम केला. अधून मधून मुलाखतीमध्ये ते सांगते की चांगली भूमिका मिळाली तर ते पुन्हा बॉलिवूडमध्ये येण्याचा प्रयत्न करेन. पण आजही मधुची इमेज रोजा या सिनेमातली नायीकाच आहे….!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.