नवऱ्याच्या खुनाचा बदला घ्यायचा होता म्हणून तिने नवऱ्याच्या खुन्याशीच लग्न केले

सूड, बदला, दुश्मनीच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील पण एका महिलेने जिच्या पतीची हत्या केली होती तिच्या पतीच्या खुन्याचा बदला घेण्यासाठी तिच्याशी लग्न केले. कल्पना करा की ज्या व्यक्तीचा ती इतका तिरस्कार करत होती, ती वर्षभर त्याची पत्नी राहिली.

3 वर्षांपूर्वी त्यांनी दिलेला नवस तीन वर्षांनी पूर्ण झाला.

पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी एका या बाईने असे काही जाळे विणले की सगळेच हैराण झाले. पतीच्या मारेकऱ्याचा बदला घेण्यासाठी ती तीन वर्षांपासून प्रयत्न करत होती आणि त्यासाठी तिने संपूर्ण योजना आखली होती. तिने मारेकऱ्याशी मैत्री केली, नंतर त्याच्याशी लग्न केले आणि शेवटी त्याला ठार मारले.

ही कथा अफगाणिस्तानपासून सुरू होते. पाकिस्तानच्या आदिवासी भागातील बाजौर जिल्ह्यातील. अफगाणिस्तानातील एक माणूस तिथला गोंधळ सोडून पाकिस्तानात कामासाठी आला. नाव होतं अफगाण शाह. अफगाण शाह जेव्हा अफगाणिस्तानातून पाकिस्तानात आला तेव्हा त्याने अफगाणिस्तान सीमेवरील बाजौर शहरात छोटे-मोठे व्यवसाय करण्यास सुरुवात केली.

बाजौरला असताना बराच वेळ गेला होता. स्थानिक लोकांशी ओळख झाली. अफगाण शाहचा विवाह येथील एका कुटुंबातील कन्या यास्मिनशी झाला होता.

दोघांचेही आयुष्य अतिशय शांततेत जात होते. दरम्यान, अफगाण शाहला एक मुलगी झाली, मुलगी झाल्यावर अफगाण शाहला वाटले की आता खर्च वाढतो आहे, तर त्यानेही चांगली नोकरी शोधावी जेणेकरून मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी पैशाची भर पडेल. हाच विचार करून अफगाण शहा नोकरी शोधण्यासाठी बाजौरहून पेशावरला आला. त्यांनी पेशावरमध्ये एक छोटासा व्यवसाय सुरू केला आणि लवकरच त्यांचा व्यवसायही सुरळीत झाला होता.

मात्र, पाकिस्तानात राहणाऱ्या अफगाण निर्वासितांचे आयुष्य काय सोपे नाहीये. ओळखपत्राच्या नावाखाली पाकिस्तानी पोलीस आणि इतर एजन्सी पाकिस्तानात राहणाऱ्या अफगाण लोकांना खूप त्रास देतात…लुटतात. 

ओळखपत्र नसल्याने अफगाणी लोकं बँकेत खाते उघडू शकत नाहीत. ओळखपत्र बनवण्यासाठी पाकिस्तानची एजन्सी कर्मचारी भले मोठे पैसे घेतात. अशा परिस्थितीत खूप गरीब लोक इतके पैसे देऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत ते हे पैसे पाकिस्तानी नागरिकांच्या बँक खात्यात जमा करतात.असाच प्रकार अफगाण शाह यांच्याबाबतही होत होता.

मग अफगाण शाह बाजौरमध्ये गुलिस्तान खानला भेटला. दोघांची चांगली मैत्री झाली.अफगाण शाह जे काही पैसे कमवायचे ते गुलिस्तानकडे ठेवण्यासाठी देत ​​असे. गुलिस्तान ते पैसेही ठेवायचा आणि गरज पडेल तेंव्हा घ्यायला सांगायचा.

दिवसा मागून दीवसं जात होते  आणि अफगाण शाहचा पैसा गुलिस्तानजवळ जमा होत होता. २०१८ मध्ये एक दिवस उजाडला. नेहेमीप्रमाणे अफगाण शाहने गुलिस्तानला पैसे द्यायला सांगितले. त्याची तब्येत बिघडली होती, त्यामुळे त्याला डॉक्टरांकडे जाण्यासाठी पैशांची गरज होती. गुलिस्तानने त्याला सांगितले की त्याच्याकडे अजून पैसे नाहीत पण हो तो त्याच्या औषधाची व्यवस्था नक्की करेल…

त्यासाठी अफगाण शाहला तो औषध घेण्यासाठी शहरातील एका नदीजवळ बोलावतो.

ठरल्या प्रमाणे दोघे भेटतात. गुलिस्तान नदीच्या काठी पोहोचतो, त्याने सोबत दोन इंजेक्शन आणि काही औषधे आणलेली असतात. तो अफगाण शाहला सांगतो की, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी डॉक्टरांना सांगितले, त्याप्रमाणे त्यांनी ही औषधे लिहून दिली होती जी मी आणली आहे. तो पुढे असेही म्हणतात कि, तो दुसऱ्या डॉक्टरकडे गेला असता, तर डॉक्टर त्याच्याकडून उपचाराच्या नावाखाली भरमसाठ फी घेतात.

अर्थातच अफगाण शहाला गुलिस्तानचे म्हणणे पटते. गुलिस्तानने अफगाणला सांगतो की, आता एक इंजेक्शन आणि उद्या दुसरे इंजेक्शन घ्यावे लागेल. इंजेक्शननंतर औषधे देखील घेतली जाऊ शकतात. अफगाण शाहला विश्वासात घेतल्यानंतर, गुलिस्तान त्याला एक इंजेक्शन देतो आणि त्याला पैसे देण्याचे आश्वासन देऊन लवकरच निघून जातो.

इंजेक्शननंतर अफगाण शाह औषध घेऊन घरी पोहोचतो, पण घरी पोहोचल्यावरच तो बेशुद्ध होतो. त्याची पत्नी यास्मिन शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला दवाखान्यात घेऊन जाते पण जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा डॉक्टर त्याला सांगतात की त्याचा मृत्यू झाला आहे.

अफगाण शाहच्या आकस्मिक मृत्यूने यास्मिनला धक्काच बसतो. त्याचा मृत्यूही सर्वांना नैसर्गिक वाटत होता. अफगाण शाह यांची प्रकृती ठीक नसल्याचं यास्मिनने सांगितलं होतं. मात्र, त्यांची प्रकृती एवढी खराब नव्हती की त्यांचा मृत्यू होईल. यास्मिनला असे वाटते की अफगाण शाहच्या मृत्यूला कारणीभूत काहीतरी आहे. त्यावेळी हे लोक राहत असलेल्या बाजौरच्या परिसरात एकही पोलीस ठाणे नव्हते.

दुसरीकडे, कुटुंबातील सदस्यही त्याला कायदेशीर अडचणीत येण्यापासून दूर राहण्याचा सल्ला देतात. त्यावेळी यास्मिन लोकांच्या उपदेश पाळत अफगाण शाहचे अंतिम संस्कार करते, पण अफगाण शाहच्या मृत्यूचे सत्य जाणून घेण्याची तळमळ त्यांच्या हृदयाच्या कोपऱ्यात राहते. ती औषधे आणि इंजेक्शन तपासते. तो एक सामान्य वेदनाशामक होतं हे निष्पन्न होते.

पण तरी यास्मिनला गुलिस्तानवर संशय असतो आणि ही शंका दूर करण्यासाठी ती अफगाण शाहने तिच्याकडे जमा केलेले पैसे गुलिस्तानकडून मागायला जाते. गुलिस्तान यास्मिनला सांगतो की त्याने काही दिवसांपूर्वी अफगाण शाहला सर्व पैसे परत केले आहेत. मात्र, अफगाण शाह यास्मिनला एक गोष्ट सांगायचा आणि त्याने गुलिस्तानकडे जमा केलेल्या पैशातून अजून एक पैसाही परत घेतलेला नाहीये. 

गुलिस्तानचा हे उत्तर ऐकल्यानंतर गुलिस्ताननेच आपल्या नवऱ्याची हत्या केली असल्याचं तिला स्पष्ट होतं. गुलिस्तानने अफगाण शहासाठी औषध आणले होते याचीही यास्मिनला माहिती होती. त्यांनी गुलिस्तानमधून डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन मागते तेंव्हा डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देण्यासाठी टाळाटाळ करतात.

मग मात्र तिचा संशय खरा ठरतो….मग मात्र यास्मिन आपल्या नवऱ्याचा खून झाला आणि त्याचा सूद घेण्यासाठी काय प्लॅन करता येईल याचा विचार करते….अनेक विचार डोक्यात येतात पण ते सक्सेसफुल होतील कि नाही याची गॅरंटी नसते म्हणून अखेर ती एका निर्णयावर येते…तो निर्णय म्हणजे गुलिस्तानसोबत लग्नाचा. 

२०२० सालात यास्मिनने गुलिस्तानला लग्नाची खुली ऑफर दिली.

तिने गुलिस्तानला सांगितले की अफगाण शाहच्या मृत्यूनंतर ती खूप एकटी पडली होती. तिच्या मुलाचे संगोपन नीट होत नाही म्हणून तिला लग्न करणं गरजेचं आहे.पण होतं असं कि, गुलिस्तानने तिच्याशी लग्न करण्यास स्पष्ट नकार देतो. गुलिस्तानचे आधीच लग्न झाले होते आणि त्याला मुलगाही होता. त्यामुळे तो लग्न करण्यास तयार नव्हता. यास्मिनने विणलेल्या जाळ्यात गुलिस्तान फसला नाही.

अनेक महिने उलटले आणि यावेळी यास्मिनने गुलिस्तानकडे दुसरा प्रस्ताव ठेवला. ती गुलिस्तानला सांगते की जर त्याने तिच्याशी लग्न केले तर तिच्याकडे असलेल्या पैशातून ती त्याला एक कार आणि घर खरेदी करू शकते…

गुलिस्तान तिच्या या अमिषामध्ये अडकतो. गुलिस्तानने लग्नाला होकार दिला पण जेव्हा गुलिस्तानच्या पहिल्या पत्नीला लग्नाची बातमी कळली तेव्हा तिला राग आला. त्यामुळे त्याला यास्मिनला स्वतःच्या घरात ठेवता आले नाही. यास्मिन, गुलिस्तान आणि यास्मिनची मुलगी आता गुलिस्तानच्या एका नातेवाईकाकडे राहू लागली होती.

काही दिवस नातेवाईकासोबत तर उरलेले दिवस दुसऱ्या कोणाकडे तरी. असेच दिवस जात होते…पण यास्मिनला संधी मिळत नव्हती.

तिने गुलिस्तानला इतर कुठं भाड्याचे घर का घेत नाही, अशी गळ घातली. किती दिवस नातेवाईकांकडे राहणार? त्यावर गुलिस्तानने बाजौरमध्येच घर भाड्याने घेतले. तिघेही आता त्या भाड्याच्या घरात राहू लागले. गुलिस्तानही त्याची पहिली पत्नी आणि मुलाला भेटायला जायचा. कधी-कधी तो व्यवसायाच्या निमित्ताने दुसऱ्या शहरातही जात असायचा. 

एके दिवशी यास्मिनने त्याला सांगितले की, तू बरेच दिवस कामानिमित्त बाहेर गावी असतोस आणि आम्ही एकटे असतो. घरातली पैसे आणि कुटुंब सुरक्षित नाही. सुरक्षा म्हणून गुलिस्तानने पिस्तूल खरेदी करावी जेणेकरून सुरक्षेसाठी कामी येईल. 

हा मुद्दा गुलिस्तानलाही पटतो. तो बाजौर येथूनच तेरा हजार रुपयांना पिस्तूल खरेदी करतो. गुलिस्तानकडूनच यास्मिन ते पिस्तूल चालवायला शिकते. यास्मिन आता पिस्तूल चालवायला शिकली होती. गेल्या तीन वर्षांपासून वाट पाहत होती तो प्लॅन सक्सेसफुल करायचा होता.

१४ जुलै २०२१ रोजी रात्री गुलिस्तान घरात झोपलेला असतांना यास्मीनने पिस्तुल घेऊन त्याच्याकडे जाते. तिने पिस्तूल त्याच्यावर रोखते आणि त्याचा ट्रिगर अनेक वेळा दाबते पण त्यातून काय फायर होत नाही. तिला भीती असते कि ट्रिगरच्या आवाजाने गुलिस्तानला जाग तर येणार नाही ना…ती पुन्हा दुसऱ्या खोलीत गेली. पिस्तुलाच्या चेंबरमध्ये अडकलेल्या गोळ्या काढते अन  पुन्हा एकदा ते पिस्तूल  गुलिस्तानच्या कवटीवर रोखते.

ट्रिगर दाबताच पिस्तुलातून सुटलेली गोळी गुलिस्तानच्या डोक्यात घुसली. यानंतर यास्मिनने गुलिस्तानच्या छातीत दुसरी गोळी झाडली. रात्रभर ती गुलिस्तानच्या काठावर बसून राहिली. सकाळ होताच तिने पतीला कोणीतरी मारले असल्याची ओरड सुरू केली. आतापर्यंत बाजौरच्या त्या भागात पोलिस ठाणे सुरू होते. हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तपासाअंती पोलिसांना वाटले की, खूनी आतली व्यक्ती आहे.

यास्मिन आणि गुलिस्तानचा शोध लागल्यावर यास्मिनचा पहिला नवरा अफगाण शाह याच्या मृत्यूची कहाणी समोर आली. पतीच्या मृत्यूसाठी गुलिस्तानला जबाबदार धरणाऱ्या यास्मिनने अखेर त्याच्याशी लग्न केल्याची धक्कादायक घटना घडली.

पोलिसांनी यास्मिनच्या घराची झडती घेतली असता, ज्या पिस्तुलातून ही हत्या करण्यात आली होती, तेही पोलिसांना सापडले. गुलिस्तानच्या शरीरातून जप्त करण्यात आलेली गोळी घरातून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलातूनच गोळी झाडण्यात आली होती, असेही फॉरेन्सिक तपासातून समोर आले आहे. यास्मिनने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्यासाठी तिला कसलाही पाश्चाताप नव्हता उलट समाधान होते. तुरुंगात गेल्यानंतर यास्मिनच्या मुलीची काळजी कोण घेणार हा प्रश्न समोर आलेला.

यास्मिनला ज्या पद्धतीने अटक  तेथीत्यानंतर रहिवाशांनी तिच्या अटकेचा निषेध केला होता. कारण यास्मिनला अटक करतांना कोणतीही महिला पोलीस तिथे नव्हती. बाजौर आदिवासी जिल्ह्यात महिला पोलिस कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी आणि महिला आरोपींसाठी स्वतंत्र लॉकअप उभारावे, अशी मागणी या रहिवाशांनी सरकारकडे केली होती. 

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.