मनुष्यावर उपचार करणारी होमिओपॅथी, आता शेतपिकांवर देखील उपचार करणार

तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल की, होमिओपॅथिची औषधं घेऊन एखादा रोग, आजार दुखणं कमी झालं. आता जर तुम्हाला आम्ही असं सांगितलं की, शेतीमधील पिकांवर देखील आता होमिओपॅथिच्या औषधांचा उपचार होणार.

होय अगदी खरंय हे… बारामतीतील शारदानगर येथील कृषी विज्ञान केंद्रात स्कॉच बोनेट या ढोबळी मिरचीच्या वाणाची लागवड करण्यात आली आहे. या संपूर्ण मिरचीवर होमिओपथीची औषधं वापरून वाढवण्यात आली आहेत. हा महाराष्ट्रातील पहिला वहिला प्रयोग आहे. आजपर्यंत आपण पाहत आलो कि, रासायनिक, जैविक, सेंद्रिय, एकात्मिक शेतीचे प्रयोग आणि प्रकार पाहिले आहेत. पण या होमिओपॅथिक शेतीचं वैशिष्ट्य म्हणजे, होमिओपॅथिची औषध फवारणी करण्यात आलेली हि मिरची चवीला तिखट नाही तर गोड लागते. आणि मिरचीचे उत्पादन खर्च हा रासायनिक खतांच्या तुलनेत ३ पट कमी आहे, अत्यंत कमी खर्चात ही मिरची उत्पादित करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

हे लाल गोड लागणाऱ्या मिरचीचे उत्पादन यशस्वी झाल्यानंतर याच होमिओपॅथि तंत्रज्ञानाचा वापर इतर सगळ्या पिकांवर होतोय असं देखील सांगण्यात येतं…

हे झालं होमिओपॅथिक शेतीचं…पण आपल्यातल्या अनेक जण होमिओपॅथी हे फक्त ऐकूनच असतात. पण होमिओपॅथी म्हणजे काय ? होमिओपॅथीमध्ये दिल्या जाणाऱ्या शाबुदाण्यासारख्या बारीक पांढऱ्या रंगाच्या गोळ्या ह्या सगळ्या आजारांवर सारख्याच कशा असतात ? त्या ओळखायचा कश्या ? याबाबत काही माहितीच नसते…

सर्वप्रथम १७९६ मध्ये सॅम्युअल हॅनेमन यांनी होमिओपॅथिक औषध जर्मनीमध्ये आणले होते. आज ते अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनीमध्ये खूप प्रसिद्ध आहे, परंतु जागतिक पातळीवर पाहायचे झाले तर, भारत यात आघाडीवर आहे. इथे होमिओपॅथी डॉक्टरांची संख्या जास्त आहे, तर होमिओपॅथीवर विश्वास ठेवणारे लोकंही जास्त आहेत. भारत सरकारही या वैद्यकीय व्यवस्थेकडे  आहे म्हणूनच तर होमिओपॅथीला आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत महत्व देण्यात आले आहे.

  • पण होमिओपॅथी म्हणजे काय ? 

होमिओपॅथी ही देखील अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेदाप्रमाणेच एक औषध प्रणाली आहे. यामध्ये अॅलोपॅथीप्रमाणे औषधांचा प्रयोग प्राण्यांवर होत नाही. त्याची चाचणी थेट मानवांवरच केली जाते. होमिओपॅथीची औषधं ॲलोपॅथीपेक्षा जास्त सुरक्षित मानली जातात.

होमिओपॅथीचे साईड इफेक्ट होतात का?

होमिओपॅथीचे साईड इफेक्ट तसे खूप कमी आहेत. कधीकधी असं होतं की, एखाद्याला तापाचे औषध दिलं जातं आणि त्या व्यक्तीला जुलाब, उलट्या किंवा त्वचेची ऍलर्जी होते. खरं तर, ही समस्या त्या औषधांच्या साइड इफेक्ट्समुळे होत नसते तर होमिओपॅथीच्या उपचाराचा तो एक भाग आहे, परंतु लोकं होमिओपॅथीचे साईड इफेक्ट म्हणूनच गैरसमज करून घेतात आणि हा उपचार घ्यायचं टाळतात. या प्रक्रियेला ‘हिलिंग कायसीस’ म्हणतात ज्याद्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात…तो आजार समूळ पोटंटाउनच काढला जातो.

  • पण होमिओपॅथीचे उपचार आणि त्याचे परिणाम खूप स्लो असतात.

८० टक्के केसेसमध्ये, असं होतं कि जेंव्हा लोकं ॲलोपॅथी किंवा आयुर्वेदाने उपचार घेऊन घेऊन थकून जातात तेंव्हा ते होमिओपॅथकडे वळतात. अनेक वेळा १५ ते २० वर्षांपासून इन्सुलिन घेणारे शुगर पेशंट वैतागून होमिओपॅथकडे वळतात. अशा परिस्थितीत उपचारास वेळ लागू शकतो. कारण अगोदर पेशंट च्या शरीरात ॲलोपॅथीचा मारा झालेला असतो.

  • होमिओपॅथीचे उपचाराची पद्धत वेगळी असते, का पण ?

खरं तर होमिओपॅथीचे उपचाराच्या पद्धतीमध्ये यामध्ये रुग्णाचा इतिहास खूप महत्त्वाचा असतो. एखाद्याचा आजार जुनाट असेल तर डॉक्टर त्याला संपूर्ण इतिहास विचारतात. रुग्णाला काय वाटते, त्याला कोणती स्वप्ने पडतात असे प्रश्नही विचारले जातात. अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेतल्यानंतरच रुग्णावर उपचार सुरू होतात.

  • कोणते रोगांमध्ये होमिओपॅथीची ट्रीटमेंट जास्त उपयोगी पडते ?

खरं तर होमिओपॅथीमध्ये जवळजवळ सर्व रोगांवर उपचार आहेत. विशेष जे जुनाट आणि असाध्य रोग आहेत त्यांवर हा सर्वोत्तम उपचार मानला जातो. असाध्य रोग असे आहेत जे ॲलोपॅथीच्या उपचारानंतरही पुन्हा डोकं वर काढतात. रोगांवर होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटने ते रोग मुळापासूनच बरे  केले जातात असा दावा हि औषध प्रणाली करत असते. अशी काही रोग म्हणजे, एखादी त्वचेची ऍलर्जी, एक्जिमा, दमा, कोलायटिस, मायग्रेन इत्यादी. पण अशी काही रोग ज्यावर होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटचा परिणाम होत नाही असं मानलं जातं ते म्हणजे, कॅन्सर. कॅन्सर वर होमिओपॅथीमुळे आराम मिळू शकतो पण पूर्णपणे कँसरचे निराकरण करणे कठीण आहे… शुगर, बीपी, थायरॉईड इत्यादींच्या नवीन केसेसमध्ये ते अधिक प्रभावी आहे.

उपचारासाठी, काही डॉक्टर शाबुदाण्यासारख्या पांढऱ्या गोड गोळ्या आणि काही लिक्विड देतात.

होमिओपॅथी औष प्रणाली नेहमी किमान डोसच्या तत्त्वावर कार्य करते. यामध्ये औषध शक्य तितके कमी देण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणूनच बहुतेक डॉक्टर गोड गोळीत भिजवून औषध देतात, कारण थेट लिक्विड दिल्यास त्याचे प्रमाण जास्त प्रमाणात तोंडात जाते. त्यामुळे योग्य उपचारात अडथळा निर्माण होऊ शकतो. होमिओपॅथीमध्ये अशीही काही औषध असतात की रुग्णाला फक्त वास घेण्यास सांगितले जाते. उदाहरणार्थ, सायनुसायटिसची समस्या आणि नाकात गाठ असल्यास, डॉक्टर त्याच पद्धतीने उपचार करतात. आणि कोणाला ५ प्रकारची आजार असतील तर त्याला ५ प्रकारची औषधे दिली जात नाहीत तर एकच औषध दिलं जातं. 

  •  होमिओपॅथीच्या उपचारादरम्यान लसूण-कांदा खात नसतात हे खरंय का ?

१०-१५ वर्षांपूर्वी होमिओपॅथिक औषधं लिहून दिल्यानंतर डॉक्टर नक्कीच सांगत असत की लसूण, कांदा यांसारख्या गोष्टी खाऊ नयेत, कारण त्यांच्या वासाने औषधाचा परिणाम कमी होतो असा समज होता. पण नवीन संशोधनाने ही विचारसरणी बदलली आहे. आता डॉक्टर या गोष्टी खाण्यास मनाई करत नाहीत. पण हो, होमिओपॅथिक औषध घेताना एक गोष्ट सक्तीने निषिद्ध आहे ती म्हणजे कॉफी. वास्तविक, कॉफीमध्ये कॅफिन असते. कॅफिन होमिओपॅथिक औषधाची प्रभावीता लक्षणीयरीत्या कमी करते. काही डॉक्टर डीओ आणि परफ्यूम लावायलाही नकार देतात. असे मानले जाते की त्यांच्या सुगंधाने औषधाचा प्रभाव देखील कमी होतो. त्यामुळे या होमिओपॅथिचे उपचार घेताना लोकं टाळाटाळ करतात. 

या होमिओपॅथिक डॉक्टरची पदवी काय असते हे देखील अनेकांना माहिती नसते.

होमिओपॅथीतील उपचारांसाठी साडेपाच वर्षांची बीएचएमएस पदवी आवश्यक आहे. हे ॲलोपॅथीच्या एमबीबीएस पदवीच्या समतुल्य असल्याचं म्हणलं जातं. याशिवाय डॉक्टरांकडे MD अशी ३ वर्षांची डिग्री घेता येते. मटेरिया मेडिका (औषधांबद्दल), मानसोपचार (रुग्णाची मानसिक स्थिती समजून घेणे), रिपोर्टी (औषधे शोधण्याच्या पद्धती) अशा MD च्या अनेक फॅकल्टी यात असतात. 

आम्ही सगळं मनाचं सांगत नाहीये तर त्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टरकडून अशी सोप्यात माहिती काढून घेतली आहे जी सामान्य माणसांना माहिती नसते. 

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.