बिग बॉस मध्ये सलमानला सुद्धा घाम फोडणाऱ्या डॉली बिंद्राने काही चांगली काम सुद्धा केलीयत

ऐ मेरे बाप में मत जाना

ही आयकॉनीक लाईन भारतभर गाजवली होती डॉलीने. डॉली बिंद्राने. २०१० सालात बिग बॉसच्या चौथ्या सिजन मध्ये गहजब माजवणारी ही डॉली. एका छोट्याश्या अंड्यावरून हिने मनोज तिवारीला फेकून मारलेली ही आयकॉनिक लाईन. हीच आयुष्य म्हणजे रानावनात चौफेर खुर उधळलेल्या म्हशीसारखी ही कोणत्याही व्यक्तीला भासते.

म्हणजे मला आठवतंय त्याप्रमाणे तर टिव्हीतल्या त्या बिग या भांडकुदळ्या लोकांच्या घरात डॉली एकदम मारक्या म्हशीप्रमाणे डोळ्यात भरायची. फक्त बिग बॉसच नाही बरं का, ह्या डॉलीने हीच सगळंच आयुष्य वादात, भांडणात घालवलय.

म्हणजे आधी तर बिग बॉसच्या घरातल्या भांडणांचा विषय निघाला की, आवर्जुन ती डॉली बिंद्राचं. तीच श्वेता तिवारी, राजा तिवारी सोबत कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यातल्या त्या शिव्या ऐकू वाटल्या की साहजिकच युट्यूबचा आधार मिळतो. कारण डॉलीच्या चाहत्यांनी ते व्हिडिओ युट्यूब वर टाकलेच आहेत.

आता बिग बॉसच्या घराबाहेरची तिची भांडणं सुध्दा चांगलीच गाजली आहेत.

म्हणजे आपल्याकडे कसं शेजारीपाजारी म्हणजे आपल्या अडीअडचणीला धावून येणारी लोक. पण काही वर्षांपूर्वी डॉलीने तिच्या शेजाऱ्यांना शिवीगाळ केल्याच्या बातम्या आल्या होत्या. २०१४ मध्या मालाड स्थित भूमी हाउसिंग सोसायटीने डॉली बिंद्राविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तिच्यावर शेजाऱ्यापाजाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप होता. एका रिपोर्टनुसार, डॉलीच्या गैरवर्तणुकीमुळे सोसायटीतील लोक त्यांच्या मुलांना गार्डनमध्ये खेळायला सुद्धा पाठवत नव्हते. यामुळे सुद्धा तिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार सुद्धा दाखल झाली होती म्हणे.

ते सोडा डॉलीने, स्वतःला देवीचा अवतार म्हणवणाऱ्या स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँला सुद्धा सोडलं नाही.

हुंड्यासाठी छळ, अश्लिलता पसरविणे आणि धमकी देण्याच्या आरोपानंतर राधे माँवर आरोप लावण्यात आला, जो तुम्हांला सुन्न करेल. तो आरोप केलाहोता डॉली बिंद्रा हिने.

डॉलीने आपल्या तक्रारीत म्हटलं होत की,

राधे माँ मला आपल्या बेडरूममध्ये घेऊन जात होती. तेथे आयपॅडवर पॉर्न फिल्म दाखवत होती. राधे माँचे भक्त तिच्यासमोर अश्लिल डान्स करत होते. तसेच माझे अंतर्वस्त्र काढत होते. डॉली बिंद्राने आरोप लावला की राधे माँ ड्रग्जचाही बिझनेस करत आहे. विशेष म्हणजे डॉली बिंद्रा एकेकाळी राधे माँची परम भक्त होती. जागरण आणि धार्मिक कार्यक्रमात ती राधे माँच्या शेजारी दिसत होती. यापूर्वी राधे माँने आपल्या जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही डॉली बिंद्राने केला. डॉलीच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी राधे माँ विरोधात अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

अशा या १९७० च्या दशकात जन्मलेल्या डॉली बिंद्राने खिलाडियों का खिलाडी, गदर: एक प्रेम कथा, यादें, जो बोले सो निहाल, डॉली की डोली अशी चांगली पण काम केली आहेत.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.