बावरिया गँग: देवीचा आशीर्वाद मिळाला तरच दरोडा टाकणारी देशातली सर्वात क्रूर टोळी.
भारतामध्ये अश्या अनेक खुप जाती जमाती आहेत ज्या अजुनही मुळ प्रवाहात नाहीत. त्यांच्याकडे त्यांची कागदपत्रे नाहीत ना रहाण्याचे कुठले ठोस ठिकाण नाही. अशीच एक जात म्हणजे ‘घुमंतू जाती’. घुमंतू म्हणजे इकडे तिकडे भटकणारी, आपला ठोस ठिकाणा नसलेली, जिथे जागा मिळेल तिथे आपले बस्तान बसवणारी जमात. त्याच घुमंतू जातीतील एक समाज म्हणजे बावरिया समाज.
स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरुद्ध लढा देण्यास भारतातील सर्व जाती जमाती एक झाल्या होत्या. त्यामध्ये घुमंतू व इतर भटक्या जातींचा सुद्धा समावेश होता.
हळूहळू लढा तीक्ष्ण झाल्यानंतर इंग्रजांनी सर्वांवर कारवाई केली. परंतु भटक्या जातीतील लोक इंग्रजांना सापडले नाहीत. कारण कुठलाच कागदोपतत्री रेकॉर्ड त्या लोकांचा उपलब्ध नव्हता. त्यामुळे ब्रिटिशांनी एक कायदा काढला त्यानुसार सर्व भटक्या जातीतील लोकांना कायम स्वरूपाचे क्रिमिनल म्हणून ठरवण्यात आले.
नंतर भारत स्वतंत्र झाला. हळूहळू सर्व मूळ प्रवाहात येऊ लागले. पण काही भटक्या जमातींनी आपला कागदोपत्री कोणताही पुरावा नसल्याचा फायदा घेत क्राईमकडे वळण्याचे ठरवले.
त्यामधीलच एक म्हणजे बावरिया जमात.
बावरिया गॅंगचे उगम स्थान हे राजस्थानमधील चित्तोडगड हे मानले जाते. तिथूनच ही गँग पुढे भरतपुर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली येथे जाऊन मोठ्या प्रमाणात वसाहत करू लागली.
बावरिया लोक मोठ्या प्रमाणात कर्मकांड मानणारे लोक आहेत. त्यांच्या प्रत्येक गावात एक कुलदैवताचे मंदिर ते बांधत. दरोडा टाकण्याच्या आधी ते आपल्या कुलदैवताच्या मंदिरासमोर एक बकरी नेऊन सोडत. ती बकरी जर मंदिराकडे चालत केली तर देवीचा आशीर्वाद आहे असं ते समजतात आणि गुन्हा करायला तो दिवस ते निवडून दरोडा टाकायला जात.
पण जर ती बकरी पुन्हा मागे वळून आली तर देवीचा आशीर्वाद नाही असे समजून तो दिवस ते गुन्हा करायचे टाळत. जोपर्यंत बकरी मंदिराकडे चालत जात नाही तोपर्यंत रोज असेच चालू राहत आणि तोपर्यंत ते कुठलाच गुन्हा करत नाहीत. दरोडा टाकताना हे संघटित होऊन करत.
दरोड्यावर जाताना त्यांच्या सर्व बाया गावातच थांबून एक विशिष्ट पूजा दरोडा यशस्वी होण्यासाठी घालत. मोहिमेवर फक्त पुरुष मंडळीच जातात. तीन ते चार ग्रुप करून एकाच दिवशी हे वेगवेगळ्या ठिकाणी दरोडे टाकतात. हे करताना त्यांच्या ग्रुपमध्ये फक्त सम अंकीच सदस्य ते ठेवत. म्हणजे २,४,६,८ किंवा १० अश्या सम अंकीच आकड्याने ते दरोडा टाकत. विषम अंकी संख्येला ते अपशकून मानतात.
ज्या घरावर दरोडा टाकायचा आहे तिथे हे आधीच भिकारी, भंगारवाला इत्यादी वेषात येऊन घराची रेखी करून जात. घर निवडताना हे कोपऱ्यातील घर निवडत आणि ज्या कोपऱ्यातल्या घराशेजारी झाड असेल त्या घरावर ह्यांनी दरोडा टाकलाच म्हणून समजा. कारण झाडावरून घरात शिरण्याची पद्धत त्यांना चांगलीच अवगत होती. दरोडा टाकायच्या दिवशी हे त्या ठिकाणच्या जवळच्या चित्रपटगृहात नाईट शो तिकीट काढून पिक्चर बघून मगच दरोडा टाकत असे. बावरिया गँग दरोडा टाकायला जाताना कधीच कुठले हत्यार घेऊन जात नाही. ते आजूबाजूला पडलेल्या वस्तूंचा उपयोग हत्यार म्हणून करतात. उदा.दगड, लोखंडी रॉड, पाईप इ.
घरात घुसण्याच्या आधी ते अंधारात जाऊन पाहिले आपल्या अंगावरचे सगळे कपडे काढून फक्त बनियन आणि चड्डीवरच दरोडा टाकायचे. त्यामुळे त्यांना बहुतांश ठिकाणी कच्छा बनियन गँग म्हणून सुद्धा ओळखतात. दरोडा टाकताना त्यांनी स्वतःसाठी काही नियम तयार केलेले आहेत.
१. दरोडा टाकल्यावर फक्त दागिने आणि पैसेच चोरायचे. तिसऱ्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही. तिसऱ्या वस्तूला हात लावणे म्हणजे अपशकुन असे ते मानत.
२. घरातील सर्व लोकांना फक्त डोक्यावरच घात करून मारून टाकायचे. जर त्यांना मारले नाही तर देवी नाराज होईल असे ते मानत.
३. घरातून निघताना ते घरात लग्वी व संडास करून घर घाण करून जात. असे करणे ते चांगला शकुन मानत.
४. दरोडा टाकून सगळे मेंबर आल्याशिवाय ते तिथून जात नाही.
५. जर काही प्रसंग आलाच तर वेगवेगळ्या दिशेत पळुन पक्षी व प्राण्यांचा आवाज काढून ते एकमेकांशी संपर्क साधत विशिष्ट ठिकाणी पोहचत.
नाईलाजाने पोलिसांनी बावरिया समाजाच्या वस्ती असलेल्या ठिकाणी जाऊन तिथले तरुण मुलं उचलुन घेऊन जाऊन त्यांना कैदेत ठेवले. पण त्याचाही काही एक उपयोग झाला नाही. अश्याने आमच्यावर अन्याय होतोय म्हणून बावरिया समाज हा अजुन हिंसक बनला.
नंतर काही पोलिसांनी ह्या समाजाला मुळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. पण आजही दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान स्थान या ठिकाणी असे गुन्हे घडत असतात. मध्यंतरी एका केस मध्ये दिल्ली पोलिसांनी काही बावरिया गँग मेंबर ला पकडले होते. एकाकडून तर १०० करोड रुपयांची संपत्ती जप्त केली गेली होती. आजही बऱ्याच ठिकाणी ह्या गँगची दहशत आहे.
- कपिल जाधव
हे ही वाच भिडू.
- अंडरवर्ल्डचा अमजद खान, याच्या हत्येचा बदला म्हणून शर्मांनी राजनची निम्मी गॅंग संपवली..
- दंडुपाल्या गॅंग : दक्षिण भारताच्या आजवरच्या इतिहासात ही टोळी सर्वात क्रुर समजली गेली..
- बिहारच्या राजकारणात भूकंप करणारं बॉबी हत्याकांड अशाप्रकारे दाबण्यात आलं होतं