चंद्रकांत दादा पाटील मराठा, जैन की लिंगायत ?

दादा जोरात सुटल्यात. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कोल्हापूरच्या चंद्रकांत दादांची हवा आहे. बारामतीत भाड्यानं घर घेवून राहणार इथपासून ते थेट कॉंग्रेसचे कार्याध्यक्षच आपल्या संपर्कात असल्याची त्यांची विधान राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरु लागलेत. ज्या प्रमाणे कॉंग्रेस आणि विशेषत: राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याच ऑपरेशन चंद्रकांत दादांनी मनावर घेतलं आहे तो चर्चेचा विषय ठरू शकतो.

असो पश्चिम महाराष्ट्रातला नेता, त्यातही जैन आणि इतकी हवां असा मॅसेज व्हॉटस्एप वर आला. दूसरा लगेच म्हणाला अरे दादा मराठा आहे. इतक्यात विषय थांबला असता तर ठिक पण तिसरा म्हणाला अरे दादा लिंगायत आहे. तसही पुरोगामी महाराष्ट्रात जात हा विषय लपून राहिलेला नाही. जातीची चर्चा उघडउघड होतेच.

मग आम्ही पण ठरवलं, करुया उघड उघड चर्चा. सांगूया “बोलभिडू” वाचकांना चंद्रकांत दादा नक्की कोण ते.

साल २०१४. 

मोदीचं देशातलं वारं राज्यात सुरू झालं. राज्यातील निवडणुका झाल्या. अचानकपणे चंद्रकांतदादांना कॅबिनेट मंत्री करण्यात आलं. तीन महत्वाच्या खात्यांचा कारभार चंद्रकांत दादांच्या हाती आला. राज्यातल्या आणि विशेषत: सांगली कोल्हापूरच्या जनतेसाठी हा धक्का होता. सांगली जिल्ह्याला यासाठी कारण सदैव दोन तीन कॅबिनेट भूषवणाऱ्या या जिल्ह्याकडे एकही मंत्रीपद नव्हतं. आणि कोल्हापूरकरांना यासाठी कारण कोल्हापूर करांना चंद्रकांतदादा नेहमीच व्हॅगोनआर मधून फिरणारा, राजकिय मुल्य नसणारा साधा माणूस होता.

 • चंद्रकांत दादांचा प्रवास चालू होतो तो मुंबईतल्या रे रोड रेल्वे स्टेशनच्या जवळील नारवाडीपासून. आई आणि वडिल दोघेही मजूर. गिरणी मजूरांहून खालच्या दर्जाची कामे करावी लागत असल्यानं घरात अठराविश्व दारिद्र असल्याचं दादा सांगतात.
 • सन १९७७ ते ८० दरम्यान ते परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम पाहू लागले. ८० नंतर त्यांनी अभाविपचं पुर्णवेळ कार्यकर्ता होण्याचा निर्णय घेतला.
 • १९८० ते ८२ साली जळगाव जिल्ह्याचे जिल्हा मंत्री म्हणून अभाविपचं काम पाहू लागले. पुढच्या दोन वर्षात म्हणजेच ८२ साली ते अभाविपचे प्रदेशमंत्री झाले. पुढच्या टप्यात ते अभाविपचे क्षेत्रीय संघटन मंत्री झाले. १९८४ साली त्यांनी  राज्यभर लढवल्या जाणाऱ्या विद्यापीठीय निवडणुकांचा चेहरा मोहरा बदलण्यास सुरवात केली. चंद्रकांत दादांच्या याच गोष्टीमुळे त्यांची दखल अभाविप मध्ये घेतली गेली.

Screen Shot 2018 07 29 at 6.15.56 PM

मराठवाड्याचा अपघात !

 • १९९० नंतर अभाविपचं काम जोरात चालू झालं. बाबरी मशिद, रथयात्रा यांसारख्या देशपातळीवर होणाऱ्या घटनांमुळे अभाविपची दखल घेतली जात होती. यातच दादांनी भारतीय महामंत्री म्हणून जबाबदारी घेतली. राज्यातील दौरे देशभर होवू लागले. नवीन ओळखी झाल्या.
 • १९९३ मध्ये दादांनी आपलं मुळगाव गाठलं. त्यांच मुळगाव गारगोटी तालुक्यातील खानापूर.
 • त्याला कारण होतं घरातील आर्थिक परस्थिती. अभाविपच्या कामातून मोकळे झाले पण पुढं काय हा प्रश्न होता. गावात जावूनच काहीतरी करावं अस वाटलं. वडिलांनी मुंबईतील खोली विकली. दादा गारगोटीत स्थायिक झाले.
 • गारगोटीत काजू प्रक्रिया केंद्र, कोल्हापूरात स्पर्धा परिक्षा करणाऱ्या मुलांसाठी विद्या प्रबोधिनी क्लास सुरू झाले.
 • १९९५ ला दादा संघात सक्रिय झाले. १९९५ ते १९९९ संघाचे कोल्हापूर विभागाचे कार्यवाहक म्हणून ते काम पाहू लागले. चांगल काम करणाऱ्या या तरुण कार्यकर्त्यांला हेरलं ते प्रमोद महाजन यांनी. नितीन गडकरी, प्रमोद महाजन यांनी त्यांना पक्षाचं काम करण्यास सांगितलं. २००४ ला ते भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस झाले.
 • या दरम्यान पुणे पदवीधर मतदारसंघातून जावडेकर यांचा पराभव झालेला. नारायण वैद्य यांच्यापासून असणारी विजयाची परंपरा मोडली. २००८ साली दादांना मैदानात उतरवण्यात आलं. त्यांनी शरद पाटलांचा ९ हजारांनी पराभव करत मैदान मारलं
 • २००९ साली ते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस झाले तर २०१३ ला ते उपाध्यक्ष झाले. जून २०१४ ला ते पुन्हा विधानपरिषदेवर निवडून आले.
 • त्यानंतर त्यांच्या उपयोगी आलं ते त्यांनी अभाविप पासून सुरू केलेलं काम. हे काम करत असतानाच त्यांची आणि अमित शहा यांची ओळख. त्यातूनच अमित शहा यांनी दादांवर विश्वास टाकला.  त्यांना मंत्री करण्यात आलं.

आत्ता या सगळ्या गोष्टीत दादांची जात कोणती हा प्रश्न बाजूलाच राहिल. सांगितल काय तर चंद्रकांत दादांच करियर तर चला अगोदर खाजगीत जात विचारणाऱ्यांना उत्तर देवू. 

तर दादांची जात मराठाच.

त्याचा हा पुरावा. 

DADA

चंद्रकांत दादांचा गाव गारगोटी मधील खानापूर. तळेमाऊली मंदिर वास्तुशांती व कलशारोहन सोहळ्या निमित्ताने खानापूरचे ९१ वर्षाचे कृष्णात पाटील यांनी चंद्रकांत दादा पाटील आणि त्यांच्या कुळाची वंशावळ सांगितली आहे. त्यात ते म्हणतात, “पाटील घराण्याचे मुळ जावळीच्या चंद्रराव मोरेंच. १८ व्या शतकात ते खानापूर गावात स्थलांतरीत झाले. देसाई पाटील चंद्रकांत पाटील यांच्या वंशाचे आहेत”. 

गावच्या जत्रेत मान असणाऱ्या पाटील घराण्याचा इतिहास यामध्ये सांगितला आहे यावरून ते मराठा हे सिद्ध झालं आत्ता पुढे काय ?

पुढे अस की,

राजकारणात प्रत्येक नेत्याची जात ठळकपणे माहित असताना,

चंद्रकांत दादांची जात माणसांना शोधावी लागते यात त्यांच यश म्हणावं लागेल कारण पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात जातीबद्दल शंका असणारा माणूस सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतो. मराठाकेंद्री राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादीला नडतो हे तस मोठ्ठचं काम.

हे हि वाच भिडू. 

1 Comment
 1. Pradip Bhatmare says

  Great personality

Leave A Reply

Your email address will not be published.