पोलिसांनी जेव्हा छोटा शकीलचा मेल हॅक केला, तेव्हा त्याचं नवीनचं लफडं सापडलं

कुप्रसिद्ध गँगस्टर छोटा शकील. गुन्हेगार जगतात दाऊदच्या या राईट हॅन्डचं नाव टॉपला येत. आपल्या खुरापतीं आणि गुन्ह्यांसाठी तर तो चर्चित होताचं. पण सोबतचं त्याच्या पर्सनल लाईफमुळेही तो बऱ्याचदा गोत्यात सापडायचा. त्याच लग्न तर झालं होत, पण त्याला गर्लफ्रेंड्सची देखील कमी नव्हती. यातलीचं एक होती मिसेस पॉल.

मिसेस पॉल २८ वर्षांची, बुटकी, गोरी मस्लीम तरुणी. खरं नाव शमीम मिर्झा बेग. शकीलचा अत्यंत विश्वासू सहकारी अरिफ बेगची बायको. छोटा शकीलच्या अवैध धंद्यामधील साथीदार आणि त्याचं प्रेमपात्र होती ती.

गुप्तता बाळगण्यासाठी पोलीस इंटेलिजन्स एजन्सी आणि पोलीस खबरी सांकेतिक नावांचा उपयोग करतात, त्याचप्रमाणे माफियादेखील दिशाभूल करणारी नावं वापरून पोलिसांच्या डोळ्यांत धूळ टाकायचा प्रयत्न करायचे. छोटा शकीलनेही नेमकी हीच युक्ती वापरून शमीमला ‘मिसेस पॉल’ बनवलं.

अरिफ कोल्हापूरच्या तुरुंगात शिक्षा भोगत होता. त्याच्यावर बरेच आरोप होते. पाच-सहा खून, १९९८ साली भाडोत्री मारेकरी फिरोज कोंकणी ह्याला पळून जायला मदत करणं, मुंबईत १९९२-९३ साली पुन्हा एकदा जातीय दंगली उसळल्या होत्या, त्यामागे अरिफचाच हात होता.

त्यानेच आपल्या पत्नीची शकीलशी ओळख करून दिली होती. ‘माझ्या गैरहजेरीमध्ये ती सर्व प्रकारची मदत करील ‘ असं आश्वासनदेखील डॉनला दिलं होतं. अरिफला अटक झाल्यानंतर शर्मीम शकीलसाठी काम करायला लागली.

‘मिसेस पॉल’ हे टोपणनाव धारण करायचं कारण पोलिसांच्या डोळ्यांत धुळ फेकणं, हे होतं. ख्रिश्चन नावामुळे पोलिसांचं लक्ष शर्मीमकडे जाणार नाही आणि ती सुरक्षित राहील, असा विचार करूनच शकीलने हे नाव निवडलं होतं. लवकरच नेट-सॅव्ही, कॉलेज शिक्षण घेतलेली शमीम आणि शकील फोन आणि इंटरनेट चॅटवर बराच वेळ एकत्र राहायला लागले.

२००१ मध्ये क्राइम ब्रँचला  तत्काळ त्या दोघांचे फोन टॅप करण्यात आले. दोघांची ई-मेल आयडीसद्धा हॅँक झाली. ‘मिसेस पॉल’विषयी खबर करण्यात आली. त्यानंतर तात्काळ त्या दोघांचे फोन टॅप करण्यात आले. दोघांची मेल- आयडी सुद्धा हॅक झाली.

‘मिसेस पॉल’चं रहस्य उकलायला थोडा वेळ लागला, पण डॉन आणि मिसेस पॉल ह्या दोघांमध्ये फोन आणि ई-मेलद्वारे जे प्रेमप्रकरण चालू होतं, ते मात्र पोलिसांना लगेचच समजलं. वर्षभर त्यांच्या संभाषणाकडे पोलिसांनी बारीक लक्ष ठेवलं होतं. कराचीहून शकील दूर मुंबईत असलेल्या मिसेस पॉलचं इंटरनेटवरून प्रणयाराधन करायचा. दोघं एकमेकाना प्रेमळ चिट्ठ्या आणि फोटो पाठवायचे.

शकीलची आय.डी. होती – ‘handsomelovely@ hotmail.com’. शमीम ‘shams143@yahoo.com’वरून ई-मेल पाठवायची.

११ ऑक्टोबर २००१ रोजी त्यांचं नेटवरून संभाषण झालं. ते काहीस असं –

शकील: जानेमन, वो नाशिक में कपडे और सामान की लिस्ट ई-मेल कर दी है।
शमीम : सायबर कॅफे में जाकर देख लूंगी।
(नंतर थोडा वेळ धंद्याविषयी बोलणं झालं आणि मग त्यांचा प्रेमळ संवाद सुरू
झाला.)

शकील: जानेमन, मुझे तुम्हारी बहुत याद आ रही है, तुम्हारे आने का इंतजार

शमीम : जान, मैं भी आपको बहुत याद करती हूँ।

शकील : आय लव्ह यू

शमीम : आय लव्ह यू टू

मिसेस पॉल तीन वेगवेगळ्या मोबइल नंबरवरून शरकीलशी संपर्क साधते, हे पोलिसांना समजलं होतं. शकीलच्या अवैध धंद्यांमध्ये तिची नेमकी काय भूमिका आहे, हेदेखील संभाषणावरून दिसून येत होतं.

ती त्याला हवालाचे पैसे पाठवायची. त्याच्या वकिलांबरोबर सल्लामसलत करणं आणि देशात ठिकठिकाणी शकीलचा माणस तुरुंगाची हवा खात होती, त्यांच्या गरजांकडे लक्ष पूरवणं, ही कामही ती करीत असे. छोटा शकीलच्या मुंबईमधील सर्व कामांवर नजर ठेवणं, देखरख करण ही मिसेस पॉलची जबाबदारी होती.

अखेर मिसेस पॉलला २००२च्या मार्च महिन्यात मोकाखाली अटक करण्यात आली.  त्यानंतर तीन महिन्यानी तिच्यावर आरोपपत्र ठेवण्यात आलं. आरोपपत्रामध्ये या जोडीच्या फोन-संभाषणाचे भागही उद्धृत केले होते. आधुनिक काळातील  रोमिओ- ज्युलिएट किंवा लैला- मजनूप्रमाणं त्यांचे प्रेमालाप होते.

नुकताच  प्रेमात पडलेली तरुण-तरुणी कोणाला कळू नये, म्हणून कुजबुजत्या, हळवार आवाजात बोलतात, तसंच दोघेही बोलायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनसार ती आपल्या घरातल्या बाथरूममध्ये जाऊन शकीलशी बोलायची. आपल्या सासू- सासऱ्यांसोबत राहत असल्याने, तिला ही खबरदारी घ्यावी लागायची.

त्यांची प्रेमकहाणी जगावेगळी होती.  ह्या सगळ्या काळात ते दोघे एकदाही भेटले नहते. असं असलं तरी इतरांप्रमाणे त्यांच्यातही रुसवे-फुगवे, मत्सर आणि भांडणं  होत असायची. उदाहरणार्थ, ८ जानेवारी २००२ ह्या दिवशीच्या त्यांच्यामधील संभाषणातून शकीलच्या पत्नीला मुलगा झाला असल्याची बातमी क्राइम ब्रँचला  समजली. ह्या बातमीमुळे मिसेस पॉल अत्यंत अस्वस्थ आणि नाराज झाली, हेही समजलं.

त्यांच्या चॅटिंगचा काहीसा भाग असा  –

शकील: जानेमन, तबीयत कैसी है?

शमीम : मेरी छोडिये, आपका बच्चा कैसा है?

शकील : बहुत मन्नतों के बाद पैदा हुआ है, उसकी फिक्र तो करनी पडेगी।

शमीम : उसकी फिक्र में आप मेरी फिक्र छोड देंगे?

शकील : नहीं जानेमन, उसकी जगह और है और तुम्हारी और।

सायबर-सॅव्ही पोलिसांनी दोघांचे ई-मेल अकाउंटसुद्धा हॅक केले होते. त्यामध्येही दोघांचे प्रेमालाप आढळले. १२ मार्च २००२ च्या ई-मेलमध्ये शरकीलने एका हिंदी सिनेगीताच्या पंक्ती लिहून पाठवल्या होत्या. शर्मीमच्या अटकेपूर्वींची ही गोष्ट.

तुझको सुनने को दिल चाहता है
तुझको मिलने को दिल चाहता है
तरी जो एक झलक आ जाये नजर
तुझ पर मर जाऊँ ये दिल चाहता
याद बहुत आती हो
तकलीफ का लम्हा है।
तुम्हारी आवाज सुनने को दिल चाहता है

बरेच दिवस शमीमने संपर्क साधला नाही म्हणून शकीलने हे पत्र लिहिलं असावं. असा अंदाज पोलिसांनी बांधला.

गंमत म्हणजे, शमीमच्या ई-मेल अकाउंटवरून ही सामान्य रूपाची स्री कमालीची चॅप्टर होती, हे स्पष्ट झालं. गँगस्टरची पत्नी, डॉन प्रियकरवर प्रेमाचा वर्षाव करत असूनही शर्मीमचं समाधान होत नव्हतं. तिचे इतर ठिकाणी देखील प्रेमसंबंध होते. तिचे अनेक आशिक होते. त्यापैकी एकाचं नाव होतं परवेझ बटकी.

तो तिला pbatki@hotmail.com वरून ई-मेल पाठवायचा. पत्राच्या शेवटी तो ‘तुम्हारा पागल प्रेमी’ असं लिहायचा. त्यामुळे शकीलच दुसऱ्या आय.डी.वरून हे मेल पाठवतोय, असा पोलिसांचा संशय होता.

पण शरमीमने ‘तो शरकील नसून, माझ्या अनेक चाहत्यांपैकी एक आहे’ असं स्पष्ट केलं. कोणाही व्यक्तीची ओळख पटवणं, हे मोठं वेळखाऊ आणि किचकट काम  असतं,  पण मिसेस पॉलच्या बाबतीत मात्र पोलिसांना उलटाच अनुभव आला. शकीलबरोबरच्या तिच्या प्रेमवार्ता वाचून त्यांची बरीच करमणूक व्हायची.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.