मुंबईच्या डॉनने अंग्रेजन बाईला गंडवून तिचा बंगला हडपला होता.

साल १९९३.. मुंबई बॉम्बस्फोटानं हादरली. या धमक्यात दाऊद तर होताच. पण यात त्याच्या एका चेल्याच नाव आलं होत…इकबाल मिरची

या इकबाल मिरचीने ड्रग्जचा एवढा बाजार मांडला होता की, जगातल्या १० मोठ्या ड्रग्ज स्मगलर मध्ये या कुख्यात मिरचीच नाव आलं होत. 

आता अंडरवर्ल्ड माफियांच्या बऱ्याच लव्हस्टोऱ्या फेमस आहेत. यात हाजी मस्तान, दाऊद इब्राहिम, छोटा राजन आणि अबू सालेम सारख्या माफियांचा समावेश आहे. या सर्वांनी उघडपणे प्रेम केले आणि ते पूर्ण केले.

पण यात वेगळा होता तो इकबाल मिर्ची. त्यानं एका पोरीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिची प्रॉपर्टी लुटली. त्याच्या या गोष्टीतला सर्वात भारी विषय म्हणजे त्याला त्या प्रॉपर्टीचा अगदी थोडा पण आनंद घेता आला नाही.

इक्बाल मिर्चीचा जन्म मुंबईत झाला. त्याला इक्बाल मर्चंट उर्फ ​​इक्बाल मोहम्मद मेमन असेही म्हणत. तो मुंबईत एका छोट्याशा चाळीत मोठा झाला. त्याचे वडील आणि काका नळ बाजारात मसाल्यांचे घाऊक विक्रेते असल्याने त्याने आपले शालेय शिक्षण अपूर्ण ठेवले आणि दुकानात बसण्यास सुरुवात केली.

याच काळात तो मुंबईचा ‘भाई’ अनीस इब्राहिमला भेटला. ही भेट लवकरच मैत्रीत बदलली. येथूनच इकबाल ‘इक्बाल मिर्ची’ बनू लागला, असं म्हणतात. या प्रवासात तो पुढे दाऊदचा खास छोटा शकीलकडे गेला. इक्बालने चांगले शिक्षण घेतलेले नव्हते, परंतु ते अत्यंत हुशार होता. त्याने शकीलचे मन जिंकले.

राहिली साहिली कसर त्यानं लग्न करून भरून काढली. त्याने अनीस इब्राहिमच्या मेव्हणीशी लग्न केले.

आता तो अनीस इब्राहिमचा नातेवाईक झाला आणि त्याच्या मदतीने छोटा शकील नंतर दाऊदचा सर्वात महत्वाचा माणूस होण्यात यशस्वी झाला. त्याचा परिणाम असा झाला की त्याला काम मिळू लागले.

दाऊदच्या सांगण्यावरून त्याने ड्रग्सची तस्करीही सुरू केली. जेव्हा हा व्यवसाय चालू होता तेव्हा दाऊदशी त्याची मैत्री आणखी वाढली. तो त्याच्याबरोबर सावलीप्रमाणे राहू लागला. बर्‍याचदा तो ड्रग्जच्या मोठ्यामोठ्या डील करण्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जायचा.

एकदा असंच डील करण्यासाठी गेला असताना त्याला इरा नावाची १९ वर्षांची एंग्लो-इंडियन मुलगी भेटली.

सलाम अहमद यांच्या ‘नवाब के खंडहर’ या पुस्तकानुसार इक्बाल करार करण्यासाठी हॉटेलवर पोहोचला होता. तेथेच त्याची नजर इरावर पडली. ती खूप सुंदर असल्याने इक्बाल तिच्याकडे आकर्षित झाला. पुढे सरसावत तो इरा जवळ गेला आणि तिथंच बसला.

जरा संकोच करून त्याने इराशी संभाषण सुरू केले. त्याच्या लघवी बोलण्यानं लवकरच इरालाही कम्फर्टेबल वाटू लागलं. तिला इक्बालची मैत्रीपूर्ण वागणूक आवडली. या भेटीनंतर या दोघांची भेट होणे सामान्य झाले. जेव्हा जेव्हा या दोघांनाही वेळ मिळाला, तेव्हा दोघे एकत्र वेळ घालवत असत.

एक दिवस इरा खूप अस्वस्थ झाली. इक्बाल इराला भेटण्यासाठी क्लबमध्ये पोहोचला. जिथे इराने सांगितले की तिची आई खूप आजारी आहे आणि तिला भोपाळला जावे लागेल. इराने सांगितले की तिची आई जॉय पेटरसनने भोपाळमध्ये नवाब हमीदुल्ला खानचा राजवाडा विकत घेतला आहे आणि ती तिथेच राहते.

हे ऐकून इक्बालच्या होश उडून गेले. वास्तविक तो बंगला खूप किंमती होता. इक्बालने त्याच्याबद्दल आधीच ऐकले होते. मग काय होते, त्याच्या मनातली लबाडी जागी झाली.आता त्याला कस ही करून तो बंगला घ्यायचा होता. यासाठी त्याने इराचा विश्वास जिंकण्यास सुरुवात केली.

आधी त्याने इराप्रती आपले वागणे वेगाने बदलले. नंतर हळूहळू त्याने तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न सुरू केला. लवकरच त्याने मैत्रीच्या नात्याला प्रेमाचे नांव नाव दिले.

इकबाल इराबरोबर भोपाळला पोहोचला. येथे येऊन त्याला समजले की इराची आई राहत असलेला राजवाडा म्हणजे भोपाळ राज्याचे शेवटचे नवाब हमीदुल्ला खान यांची मालमत्ता होती. फाळणीनंतर हि मालमत्ता खान यांचा मोठा भाऊ जनरल ओबैदुल्ला खान याच्या ताब्यात आली. नंतर राजवाड्याचा काही भाग तुकड्यांमध्ये विकला गेला. सुमारे ८३४३ चौरस फूट बंगला त्यांच्या मुला नवाबजादा रशीदुल्लाच्या नावावर होता.

राशिदुलाने ती मुंबईतील देवराज सरद यांना विकली. देवराज यांनी ही मालमत्ता जॉय पॅटरसन यांना १९७१ मध्ये विकली होती. ती एंग्लो-इंडियन महिला असल्याने बंगला ‘अंग्रेजन बंगला’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

श्यामला टेकड्यांच्या डोंगरावर वसलेल्या या बंगल्यात तलावाचे सुंदर दृश्य होते. ते सौंदर्य बघून इक्बालला तो बंगला हवाहवासा झाला. त्याने हा बंगला मिळावा म्हणून इराला फूस लावायला सुरुवात केली.  त्याने इराच्या आईला मुंबईत चांगले उपचार मिळतील म्हणून सांगितलं.

आईला मुंबईला घेऊन जाण्यासाठी इराजवळ इतका पैसा नाही हे त्याला माहित होतं. अशा परिस्थितीत, तिच्याकडे कोणताही मार्ग शिल्लक राहणार नाही आणि तिला कोणत्याही किंमतीत तो बंगला गहाण ठेवावा लागेल. त्याची योजना यशस्वी झाली आणि इरानेही तसंच केलं.

सुरुवातीला इराची आई ‘जॉय पॅटरसन’ यासाठी तयार नव्हती. परंतु इक्बालने तिला विश्वासात घेतले. त्यांना आर्थिक साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. अशा रीतीने इरा आईबरोबर परत मुंबईला आली.

मुंबईत पोहोचताच त्याने इराच्या आईला मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल केले. इराने तिची पूर्णपणे काळजी घेतली. तिला पैशासारख्या इतर गोष्टींबद्दल चिंता नव्हती. कारण तीच प्रेम इक्बाल जो तिच्या बरोबर होता.

सुरुवातीला इकबालनेही इराला मदत केली. त्यानंतर, तो हळूहळू दूर जाऊ लागला. इरा इक्बालला भेटायचा प्रयत्न करत राहिली, परंतु त्याने काही ना काही सांगून तिला टाळले. या सर्वांच्या दरम्यान इराला इकबालच्या मित्राकडून कळले की इक्बालचे आधीच लग्न झाले आहे. हे समजल्यानंतर इराचे मन खट्टू झालं. तिला इक्बालकडून फसवणूकीची अपेक्षा नव्हती. इराकडे दवाखान्यात देण्यासाठी आणखी पैसे नव्हते, म्हणून ती आपल्या आईसह भोपाळला परत आली.

बंगल्याची कागदपत्रे इक्बालकडे असल्याने इराच्या आईने तिला सांगितले की तू ते कागदपत्र इक्बालकडून परत घेऊन ये. तिच्या आईच्या सल्ल्यानंतर इरा पुन्हा मुंबईला आली आणि इक्बालला भेटण्याचा प्रयत्न केला पण इक्बाल तिला भेटला नाही.

पुढच्या काही दिवसांत इराच्या आईचा मृत्यू झाला. इरा एकटीच राहिली होती. तिला बंगला विकायचा होता आणि परत आपल्या देशात जायचे होते. पण, तोपर्यंत तो बंगला इक्बालच्या नावावर झाला होता. असं म्हणतात की इराकडे तिच्या देशात परत जाण्याइतका ही पैसा नव्हता. तिच्या काही मित्रांच्या मदतीने ती भारत सोडून जाण्यात यशस्वी झाली.

असे म्हणतात की इरा गेल्यानंतर इक्बालने इराचा शोध काढण्याचा आणि संपर्क साधण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. खरं तर, तो तिच्याकडून मिळालेल्या बंगल्याच्याच तिच्या प्रेमात पडला होता. पुढे तो गुन्ह्याच्या मार्गावर चालू लागला.

१९९३ मध्ये जेव्हा दाऊदने मुंबईत बॉम्बस्फोटांचा कट रचला होता, तेव्हा इक्बालही त्याच्यासोबत होता. स्फोटांच्या फक्त एक दिवस आधी तो भारत सोडून पाकिस्तानमध्ये स्थायिक झाला. नंतर तो तेथून लंडनला गेले.

आश्चर्यकारक गोष्ट अशी होती की इराकडून फसवून घेतलेल्या बंगल्यात तो एक रात्रही घालवू शकला नाही. तो बंगला ओसाड पडला. इकबालने बंगल्याच्या नूतनीकरणाचा प्रयत्न केला, पण जॉय पेटरसनच्या आत्म्याने तस घडू दिलंच नाही.

असे म्हणतात की जॉय पेटरसनचा आत्मा आजही त्या बंगल्यात आहे.

हे हि वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.