इंदिरा गांधींपासून दिग्विजय सिंहांपर्यंत अनेक बडे नेते बाबा- बुवांचे भक्त होते

गेल्या काही दिवसांपासून नॅशनल स्टोक एक्सचेंज (NSE) च्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण जास्तचं चर्चेत आहेत. सेबीने एनएसईमध्ये गडबड झाल्याचे अनेक खुलासे केले असून चित्रा रामकृष्ण यांच्यावर गुप्त माहिती सामायिक केल्याचा आरोप केला. असं म्हंटल जातंय कि, चित्रा यांनी हिमालयातल्या कोणा बाबाला ही सगळी गुप्त माहिती सांगितलेली, तसेच सगळे नियम मोडीत काढून आपल्या एका ओळखीच्या माणसाला स्टोक एक्सचेंजमध्ये वशिला लावलेलं.

चित्रा रामकृष्ण यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या २०१३ ते २०१६ पर्यंत नॅशनल स्टोक एक्सचेंजच्या सीईओ होत्या, यादरम्यान २०१५ साली त्यांची तथाकथित हिमालयातल्या बाबीशी ओळख झाली आणि त्यांनी NSE च्या आर्थिक आणि व्यवसाय योजना, लाभांश दृष्टीकोन आणि बरीच महत्वाची माहिती त्या बाबाला सांगितली. सेबीने या सगळ्या प्रकारांचा खुलासा केला असून सेबीने चित्रा रामकृष्ण यांना ३ कोटींचा दंड ठोठावला आहे.

आता तसं पाहिलं तर बाबा- बुवांवर विश्वास ठेवून आपली काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करणारी मंडळी काही नवीन नाही. मग ती सामान्य असोत किंवा मोठं-मोठे उद्योजक आणि राजकीय मंडळी. तथाकथिक बाबांवर विश्वास ठेवून ही मंडळी आपली बाजी लावतात आणि चुकून काम झालं कि,  त्याला  चमत्कार मानून त्या बाबांची पूजा करतात.

यातलं पाहिलं नाव म्हणजे भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी. इंदिरा गांधी यांचे धीरेंद्र ब्राह्मचारी  यांच्यासोबतचे फोटो आजही आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. असं म्हणतात कि, इंदिरा गांधी आणि धीरेंद्र ब्राह्मचारी यांची भेट जम्मूच्या एका गेस्ट हाऊसवर झाली होती. पुढे ते इंदिरा गांधींच्या सल्लागार होते. धीरेंद्र महाराज गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जायचे. निवडणुकीच्या वेळी बहुतेक सभांमध्ये सुद्धा धीरेंद्र महाराज पाहायला मिळालेत.

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव उत्तर प्रदेशातील मिर्झापूरचे रहिवासी असलेले नारायण सिंह अर्थात पागल बाबा. लालू यांनी खुलेआम सांगितले होते कि, आपण पागल बाबांचे भक्त आहोत. लालू यादव प्रत्येक संकटात आणि चांगल्या वेळी ​​पागल बाबा यांचे आशीर्वाद घेण्यासाठी यायचे. लालू यादव मुख्यमंत्री झाल्यानंतर १९९० मध्ये पहिल्यांदा यूपीतील मिर्झापूर येथील पागल बाबांच्या आश्रमात पोहोचले होते. लालू यादव यांच्यासोबत त्यांचे कुटुंबही पागल बाबांचे भक्त होते.

काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि कम्प्युटर बाबा ही जोडी कोणापासून लपून नाही. या कम्प्युटर बाबांचं खरं नाव नामदेव दास त्यागी होत. पण त्यांच्या फास्ट बुद्धीमुळे दिग्विजय यांनीच त्यांना कम्प्युटर बाबा असं नाव दिलेलं. कम्प्युटर बाबा काँग्रेसमध्ये सुद्धा सामील झालेले. 

त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव. मुलायम सिंह इटावामध्ये राहणाऱ्या जय गुरुदेवांचे भक्त होते. मुलायमसिंह यादव यांच्यासोबतच अनेक बडे नेतेसुद्धा जय गुरुदेवांकडे हजेरी लावायचे आणि राजकीय सल्ला घेत होते.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.