संघाच्या व्यासपीठावरून “गांधीजी” काय बोलले होते ?

प्रणव मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर जाणार या बातमीपासून सुरू झालेल्या चर्चा ते आज प्रणव मुखर्जींचं संघाच्या व्यासपीठावरुन देण्यात आलेलं बौंद्धीक भाषण हा आलाप नव्यानं राजकारणात घुमू लागला असला तर यामध्ये “प्रणव मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर आलेल होते” हे एकमेव बातमीमुल्य इतिहास म्हणून चघळले जाईल यात शंका नाही. प्रणवदा नागपुरला जाणार याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर गांधीने देखील संघाचं बौद्धीक घेतल्याचे दाखले देण्यात आले.

गांधी स्वयंसेवकांसमोर भाषण देण्यास गेले होते हे सत्यच आहे मात्र या बातमीवेळी ते कोणत्या पार्श्वभूमीवर गेले होते आणि काय म्हणाले होते ते पाहणं महत्वाचं आहे.

 

सन १९३४ चा डिसेंबर महिना.

जमनलाल बजाज यांनी महात्मा गांधीना वर्ध्यामध्ये बोलवलं होतं. गांधी आठवडाभर वर्धा मुक्कामी होते. गांधीच्या राहण्याची सोय एका भव्य मैदानासमोरील घरामध्ये करण्यात आली होती. याच काळात त्या मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिवाळी शिबीर भरवण्यात आलं होतं. देशभरातून सुमारे दिड हजारच्या वर स्वयंसेवक या शिबीरात  सहभागी झाले होते. गांधीच्या दिवसाची सुरवातच या मैदानाकडे पाहत होतं असे. आठवडाभराच्या मुक्कामत गांधीनी संघाची शिस्त पाहीली आणि आपले सहकारी महादेव देसाई यांना स्वयंसेवकांबरोबर संपर्क साधता येईल का अस विचारलं.

महादेव देसाई यांनी डॉ. हेडगेवार यांचे मित्र असणाऱ्या अप्पाजी जोशी यांच्याशी संपर्क साधला. त्यांना गांधींच्या मनातील इच्छा बोलून दाखवली. आप्पाजी जोशी यांनी लगेचच गांधीना स्वयंसेवकांशी संपर्क साधण्याची व्यवस्था केली.

महात्मा गांधी शिबीरामध्ये गेले. स्वयंसेवकांशी बोलेले. या भेटीत त्यांना समजलं की, अनेक स्वयंसेवकांना एकमेकांच्या जाती देखील माहित नाहीत. ते सर्वजण एकाच पंगतीत जेवतात. इतकच काय तर राहण्या खाण्याच खर्च देखील स्वयंसेवकांनी स्वत:च्या खिश्यातून केला आहे. महात्मा गांधीनी ते पाहिलं आणि संघाच्या शिस्तीच मनापासून कौतुक केलं.

हा किस्सा पांचजन्यचे संपादक देवेंद्र स्वरुप यांनी त्यांच्या एका लेखात सांगितला आहे. हे खर की खोटं हे पहायचं असल्यास आपल्याला गांधीचं ते भाषण पहायला हवं जे त्यांनी या घटनेच्या १३ वर्षांनंतर स्वयंसेवकांना संबोधित करत असताना केलं होतं. या भाषणात देखील गांधीची या घटनेचा संदर्भ देतात.

नुकतीच भारताची फाळणी झाली होती. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या मध्ये हिंदू मुस्लीम नावाची नवी लाईन आखण्यात आली होती. भारतात ठिकठिकाणी दंगली होत होत्या. अशीच एक दंगल काठियावाड येथे झाली. ते साल होतं १९४७ चं.

मुस्लीम लोक हिंदू समाजाने अत्याचार केल्याचं गांधीना सांगत असत तर हिंदू लोक मुस्लीमांनी त्यांची घरे पेटवून दिल्याचे किस्से गांधीना सांगत. दोन्ही समाजाकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या माहितीमुळे गांधी हतबल झाले होते. आपल्या याच देशात नव्यानं दरी निर्माण झालेली त्यांच्या अहिंसक मनाला सहन होणारी नव्हती.

मुस्लीम संघटना, कॉंग्रेस आणि हिंदू संघटना अशा समाजातील सर्वच संघटनांशी संपर्क साधून त्यांच्याशी बोलावं अशी योजना त्यांनी आखली व त्यातूनच नोव्हेबर १९४७ मध्ये गांधींनी संघाशी संपर्क साधला.

१६ डिसेंबर १९४७.

महात्मा गांधींचा मुक्काम दिल्ली येथील भंगी समाजाच्या वसाहतीमध्ये होता. याच दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शिबीर याच भागात भरवण्यात आलं होतं. गांधीनी देशातला वाढता हिंसाचार पाहून समाजातील सर्वच घटकांशी संपर्क साधण्याचा उपक्रम राबवला होता. अशातच जवळ असणाऱ्या संघाच्या शिबीरात जाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. संघाने देखील त्यांची विनंती तात्काळ मान्य केली.

महात्मा गांधी नेमक काय बोलले होते.

याच भाषणात गांधीनी माझा पहिल्यांदा संघाची संपर्क कसा आला ते सांगितलं होतं. गांधींनी स्वयंसेवकांच्या शिस्तीचं आणि त्यागाच कौतुक केलं. गांधी म्हणाले की, संघाच्या त्यागभावनेमुळ मला आनंद झाला आहे मात्र त्यागाची भावना देखील पवित्र असावी लागते. मी जेव्हा संघाच्या शिबीरामध्ये गेलो होते त्याहून आजचं हे संघाच अधिक विशाल स्वरुप पाहताना मला आनंदच होत आहे. मात्र विशाल स्वरुप मिळवणं हे कोणत्याही संघटनेचं यश नसतं तर सेवा आणि आत्मत्यागाची वृत्ती खऱ्या भावनेतून यावी लागते.

याच व्यासपीठावर गांधींची ओळख हिंदू म्हणून करुन देण्यात आली होती.

यावर गांधी म्हणतात, मी स्वत:ला सनातनी मानतो. सनातन या शब्दाचा जो मुळ अर्थ आहे तोच अर्थ मला आपली ओळख सांगण्यासाठी मला महत्वाचा वाटतो. हिंदू हा शब्द आपणाला दूसऱ्यांनी दिलेली ओळख आहे. आपण जर हिंदू शब्द मान्य करत असाल तर आपणाला दूसऱ्यांनी दिलेली ओळख मान्य असायला हवी. ज्या अर्थी आपण ती ओळख मान्य करतो त्या अर्थी आपण प्रत्येक धर्मातील चांगल्या गोष्टी स्वीकारल्या आहेत हे आपणास मान्य करावे लागते. खऱ्या हिंदू धर्माला दूसऱ्यां धर्माचा तिरस्कार करण्याची कोणतीच गरज नाही.

गोलवलकर गुरूजींच्या भेटीचा उल्लेख.

महात्मा गांधी पुढे म्हणाले, मी काहीदिवसांपुर्वीच गोलवलकर गुरुजींना भेटलो होतो. गोलवलकर गुरूजींना मी जेव्हा भेटलो तेव्हा त्यांना कोलकत्ता आणि दिल्लीत संघाच्या स्वयंसेवकांनी मुस्लीम समाजावर हल्ला केला असल्याचं सांगितलं होतं. तेव्हा मी त्यांना हे देखील सांगितल की स्वयंसेवकांना तुम्ही रोखावं. तेव्हा गोलवलकर गुरूजी म्हणाले, मी प्रत्येक स्वयंसेवकांवर लक्ष ठेवू शकत नाही. आम्ही अहिंसेला मानत नाही पण मुद्दामहून दूसऱ्यावर हल्ला करण्याचं देखील मी समर्थन करत नाही. संघात आत्मरक्षा करण्याबद्दल शिकवण दिली जाते न की बदला घेण्याबद्दल.

या घटनेचा उल्लेख ते प्रार्थना समाजाच्या व्यासपीठावर देखील करतात ते म्हणतात, मला अनेकांनी सांगितल आहे संघाचे हात रक्ताने माखले आहेत आणि तस मी गोलवलकर गुरूंजीना देखील बोललो आहे. त्यांनी मला संघ हा आक्रमण करण्यासाठी नाही तर हिंदूस्थानाच्या रक्षणासाठी असल्याचं सांगितलं होतं. गांधीनी आपल्या हरिजन साप्ताहिकात देखील या घटनेचं वर्णन केलं.

स्वयंसेवकांच्या प्रश्नांना उत्तर.

भाषणाच्या वेळी गांधींजींना अनेक स्वयंसेवकांनी प्रश्न विचारले होते. त्यामध्ये एका स्वयंसेवकाने विचारलं की, हिंदू धर्मात पापी लोकांना मारण्याची परवानगी आहे की नाही ? जर नाही तर भगवतगीतेत कृष्ण अर्जूनाला पापी लोकांना मारण्यास का सांगतात ? आपणाला हा उपदेश मान्य आहे का ?

यावर उत्तर देताना गांधी म्हणाले, पापी माणसाला मारण्याचा अधिकार आहे पण आणि नाही पण. आपणाला त्याअगोदर आपण दोषमुक्त आहोत का याचा विचार करायला हवां. जो स्वत: पापी असेल त्याला दूसऱ्या पापी व्यक्तीला मारण्याचा अधिकार कसा काय प्राप्त होईल. त्याअगोदर आपण पुण्यवान आहोत का हे पुर्णपणे तपासायला हवं. राहतां राहिलं तुम्ही स्वत:ला पुण्यवान मान्य करुन एखाद्या पापी व्यक्तीस मारण्याचा निर्णय घेतला तर ते देखीव भगवत गितेनुसार चुकीचच ठरेल. कारण एखाद्या पापी व्यक्तीला मारण्याचा अधिकार हा योग्य कारणाने एकत्र आलेल्या व्यक्तीसमुहाचा आहे. जर आपणाला भारत देशावर विश्वास असेल तर हा अधिकार सर्वमान्य असणाऱ्या शासनास द्यायला हवा. तो अधिकार आपला नाही.

नंतरच्या काळात म्हणजेच १३ जानेवारी १९४८ मध्ये वाढत जाणाऱ्या दंगली पाहून गांधीनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. आपल्या सात अटी सर्वच धार्मिक संघटनांनी मान्य करुन त्यावर सही करावी अशी अट त्यांनी घातली. सहा दिवसांनी ऐतिहासिक कागदपत्रांवर सह्या झाल्या यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा आणि मुस्लीम संघटनांचे देखील प्रतिनिधी उपस्थित राहिले होते.

त्यानंतरच्या काहीच दिवसात गांधींची हत्या करण्यात आली. गांधीच्या या आंधळ्या विश्वासावर अनेकांनी टिका देखील केली. त्यांच्या मते संघावर विश्वास ठेवणं हि गांधीची चुक होती मात्र गांधीचं म्हणणं होतं की संघ आणि हिंदूमहासभा आपल्या संस्कृतीचं प्रतिक आहे. त्यांना विश्वासाने आपली संस्कृती समजावून सांगण्याची गरज आहे. गांधींच हेच मत त्यांच्या शेवटच्या दिवसापर्यन्त टिकून होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.