‘जन गण मन’ खरंच पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी लिहिलं होतं का ?

भारताचं राष्ट्रगीत  म्हणजे ‘जन गण मन’!! आपला अभिमान. पण बऱ्याचदा त्याच्या भोवती वाद निर्माण केला जातो. गेल्या काही दिवसापूर्वी सिनेमा थिएटर मध्ये कम्पल्सरी केलं म्हणून दंगा झाला, त्याच्या आधी खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियामध्ये राष्ट्रगीत चालू असताना चालू लागले म्हणून वाद झाले. कधी सिनेमामध्ये राष्ट्रगीत का वापरलं म्हणून वाद असे बरेच वाद झाले पण एक वाद आहे जो या गाण्याच्या सुरवातीपासून आहे.

काही जण म्हणतात कि रवींद्रनाथ टागोर नी हे गाणं इंग्लड चा राजा पंचम जॉर्ज  भारतात आला होता त्याच्या स्वागता साठी लिहिलं आणि नेहरूंनी ते गाणं आपल्या देशाचं राष्ट्रगीत बनवलं. तर चला जाणून घ्या नेमकं घडलं काय होतं ??

जन गण मन रविंद्रनाथ टागोरांनी शांतीनिकेतन मध्ये १९०८साली या गीताचा बंगाली ड्राफ्ट “भारतो भाग्य बिधाता ” लिहिला . पण ते पहिल्यांदा गायलं गेलं २७ डिसेंबर १९११ सालच्या कलकत्ता कॉंग्रेस अधिवेशनात.

झालं असं होत की तेव्हा ब्रिटीश सम्राट पाचवा जॉर्ज ज्याला आपण पंचम जॉर्ज म्हणून ओळखतो त्याचं नुकताच राज्यारोहण झालं होत. त्यानंतर लगेच तो भारत दौऱ्यावर आला होता.

यावेळी प्रजेला खुश करण्यासाठी पंचम जॉर्जने अनेक घोषणा केल्या होत्या यापैकीच एक म्हणजे बंगालची फाळणी रद्द करणे. बंगालमध्ये या घोषणेमुळे सर्वत्र आनंद साजरा केला जात होता. पंचम जॉर्जचा कलकत्ता दौऱ्यावर येणार होता.

याच दरम्यान काँग्रेसने सुद्धा कलकत्त्यामध्ये आपले अधिवेशन भरवले. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बिशन नारायण दार. अधिवेशनाची सुरवात नेहमीप्रमाणे ‘वंदे मातरम’ ने झाली.

दुसऱ्या दिवशी रविंद्रनाथ टागोर यांच्या पुतणी सरलादेवी यांनी शाळकरी मुलांच्या सोबत पहिल्यांदा हे गीत सादर केलं. या गीतानंतर रामभूज चौधरी यांनी बंगालची फाळणी रद्द केल्याबद्दल पंचम जॉर्जला धन्यवाद करन्यासाठी बादशाह हमारा हे गीत सादर केलं.

दुसऱ्या दिवशी ब्रिटन मधल्या वर्तमानपत्रात बातमी छापून आली कॉंग्रेसच्या अधिवेशनात जॉर्जसाठी स्वागत गीत सादर करण्यात आलं त्याचे कवी होते रवींद्रनाथ टागोर.

इथून बरेच वाद झाले. अखेर रवींद्रनाथ टागोरांनी स्पष्टीकरण दिल,

“हे गाण देशावर लिहिलं आहे. ते कुठल्याही चौथ्या पाचव्या जॉर्जवर लिहिलं नाही. तरीही तसं म्हणण माझ्या देशभक्तीवर घेतलेली शंका असून या विवादाच उत्तर द्यायला लागणे हा माझा अपमान आहे”

तेव्हा कुठे हे वाद शांत झाले.

रवींद्रनाथ टागोरांनीच या गीताला चाल दिली होती. स्वातंत्र्यलढयामध्ये लोकांच्या रक्तात भिनलेल्या वंदे मातरम् प्रमाणेच हे गीत सुद्धा लोकप्रिय झाले. सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेने सुद्धा याच गीताचं हिंदी भाषांतर “शुभ सुख चैन ” हे आझाद भारताचं राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं. 

या गीताच्या लोकप्रियतेचा फायदा उठवायचं ठरवला जेष्ठ दिग्दर्शक बिमल रॉय यांनी.

१९४४च्या दरम्यान बिमल रॉय आपला पहिला हिंदी चित्रपट ‘हमराही’ बनवत होते. गरीब घरातला मुलगा श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडतो अशी टिपिकल स्टोरी होती पण बिमलदांनी ती आपल्या स्टाईलमध्ये लिहिली होती. त्यांनी हाच सिनेमा बंगाली मध्येसुद्धा बनवला होता. कलाकार सुद्धा सगळे बंगाली होते. यामुळे हिंदी मध्ये तो गाजेल की नाही याची त्यांना खात्री नव्हती.

चित्रपटासाठी चालावा यासाठी त्यांनी आयडिया केली. दोन्ही भाषेतल्या पिक्चर मध्ये गाण म्हणून डायरेक्ट जन गण मन वापरलं. तेव्हा अजून आपण पारतंत्र्यात होतो आणि काँग्रेस सेशन मध्ये राष्ट्रगीत म्हणून वंदे मातरमच वाजवलं जायचं. यामुळे कोणी आक्षेप घेण्याचं कारण ही नव्हत.

हमराही सिनेमाचे संगीतकार होते रायचंद बोराल. त्यांनी टागोरांची चाल बदलली नाही. कोणा एका गायकाऐवजी अख्या कोरसकडून जन गण मन गावून घेतलं.

पिक्चर रिलीज झाला. बंगाली मध्ये तर तो गाजला होताच पण हिंदी मध्ये सुद्धा सिनेमाने जबरदस्त कामगिरी केली. पहिल्यांदाच सिनेमाघरात वाजल्या जाणाऱ्या जनगणमनने प्रेक्षकांवर मोहिनी घातली. समीक्षकांनी नोंद घेतली कोणी तरी बंगाली बिमल रॉय नावाचा भारी डायरेक्टर हिंदी मध्ये आला आहे.

१४ ऑगस्टच्या मध्यरात्री भारताला ब्रिटिशांच्याकडून स्वातंत्र्य जाहीर झालं. या सभेची सुरवात वंदे मातरम् तर अखेर जन गण मन ने करण्यात आली. संविधान सभेमध्ये अनेक चर्चेनंतर २४ जानेवारी १९५०ला राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी ‘वंदे मातरम’ ला राष्ट्रगान तर ‘जन गण मन’ ला राष्ट्रगीत जाहीर करण्यात आले.

हे ही वाच भिडू.

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.